आज झरझरत्या पावसात ती दिसली….. कॉलेज संपल्यावर…. बहुतेक पहिल्यांदाच….. तेव्हा जी गायब झाली होती….. ती तिच, जवळजवळ दोन वर्षांनी…माझी बाईक दोनच मिनिटे सिग्नलला थांबली, बाजूच्याच बस स्टाॕपवर माझी नजर वळली…. तर ती…. हो तिच…
मोरपिशी रंगाची साडी… गालावर अलगद मोरपिस फिरावं तशी वाऱ्यावर अलवार फिरत होती. पावसात भिजलेले मोकळे कमरेपर्यंत केस, बस स्टॉपच्या आडोशाला झाडत, चेहऱ्यावर तेच खळखळणारं स्वतःत स्वतःला आनंदी ठेवणारं हसू घेऊन उभी….. मोरालाही पहिल्या पावसात पिसारा फुलवून आनंदाने डोलायचा मोह आवरता येणार नाही. तुला पाहून तोच आठवणींचा पिसारा माझ्या अंगावर पडणाऱ्या पावसाने रोमरोमात फुलला….. तेव्हा माझा आपला वेडाच अट्टहास असायचा…. कॉलेजचा साडी-डे असो वा ट्रॉडीशनल-डे… तीला सगळ्यात आधी मीच बघणार. “मी घरुन निघालीय हं…” पासून “इथं पोहोचली रे…” “तु वेळेत आहेस नं…” पर्यंत मला प्रत्येक क्षणाची अपडेट देत …. सगळ्यांच्या नजरा चूकवत…. तू माझ्याआधी ठरलेल्या ठिकाणी पोहोचायचीस. तुला बघून तुला खुप चिडवायचो नं मी…. तु चिडायचीस ही….” पुन्हा तुझ्यासाठी धावत येणार नाही….” असं म्हणायचीस……तेव्हाही तु सुंदरच दिसायचीस….. अनं ….. आजही.
मला माहीतीय …. तुला ते चिडवणं खुप आवडायचं …. हवं हवंस वाटायचं…. म्हणून पुढल्याही वर्षीही न चूकता माझ्या आधीच तू हजर. दूसरं तिसरं काही नसून …. प्रेम होतं…. मला जाणवतही होतं…. माझं माझंच उमगत होतं….. पण, कबूल करण्याचं तेव्हा धाडस होत नव्हतं …. मी कदाचित् नवा होतो…. तेव्हा बंधनात अडकायचं नव्हतं ….. ते विश्व कल्पनांचे पंख लावून उडण्याचं होतं… परिस्थिती बदलायचीय…… ध्येय गाठायचंयं….. काहीतरी करायचंय …. स्वतःला सिद्ध करायचंय….. या अंगभर रोमांच उभ्या करणाऱ्या ….. गालातल्या गालात हसवणाऱ्या भावना मलाही अनोळखी होत्या…. रंगीबेरंगी इंद्रधनुष्यात रंगवणार होत्या…. क्षितीजापलीकडचं विश्व दाखवणार होत्या…. हसता हसताही रडवणार होत्या…. एक वेगळाच “मी” घडवणार होत्या…. समजत होत्या…. हव्याशा वाटत होत्या…. कदाचित् फक्त माझ्या माझ्याच असतील म्हणून मनाच्या एका कप्यात बंद होत्या….
चावी होती….. हो होतीच…. फक्त तुझ्याकडे …. तू कधी उघडायचा प्रयत्न केला नाहीस… आणि…. मी….. मीही…. स्वतःहून कधी तुझ्याकडे असलेल्या चावीचं बंद कुलूप माझ्याचजवळ आहे असं मोकळेपणानं सांगितलं नाही…. राहीलं….
अरे यार……. कोण हॉन वाजवतंय ….. ओह…. सिग्नल सुटला….. या दोन मिनिटाच्या सिग्नलनं मला दोन वर्ष पाठी नेलं. शेवटी सिग्नलच तो…..क्षणभरात सुटणारचं….पण तुझ्या या आठवणी…. आजही माझ्या आयुष्यात सिग्नल म्हणून लागतात….. सुटत मात्र नाहीत. पडत राहूदे दरवर्षी असा हा…. परतीचा पाऊस…. तू अशीच छान, आनंदी …. हसत रहा…. माझ्या आठवणीत….. मला सोडून नको जाऊस.
©™ श्री. अनुप साळगांवकर
September 25, 2021 at 4:25 pm
छान आहे
September 25, 2021 at 6:52 pm
Khup chan….. paus dole bharun aala
September 25, 2021 at 9:56 pm
अप्रतिम
September 26, 2021 at 11:11 am
⚘फार सुंदर शब्दात वर्णन
November 24, 2024 at 3:36 pm
Awaiting moderation
гѓ—гѓ¬гѓ‰гѓ‹гѓійЊ 40 mg еј·гЃ• – гѓ‰г‚シサイクリン通販 安全 г‚ўг‚ュテインは薬局で買える?