शब्द ब्रम्ह आहेत. हे विश्वच ध्वनिनिर्मित शब्दांच आहे. जिथे शब्द संवाद साधतात, शब्द हास्य खुलवतात, शब्द गालावर ओघळतात, शब्द व्यक्त होतात, शब्द ठाव घेतात, शब्द चित्र रंगवतात, शब्द निःशब्द होतात. श्री. अनुप साळगांवकर यांचा ब्लॉग

Category कथा

अशी शिकविते वारी

ओढ लागली की इच्छा उत्पन्न होते. इच्छा असली कि मार्ग सापडतो.या सापडलेल्या मार्गावर नामसाधना करत, अविरत चालत राहायचंपायाची गतिज ऊर्जा डोक्यापर्यंत पोहोचली कि सुरु होतो तो शक्तीचा प्रवासमग आपण चालत नाही …ती शक्ती आपल्याला चालवते, मार्ग दाखवते आणि गंतव्यस्थानापर्यंत पोहचवते…. Continue Reading →

जन्मांगम ( गूढकथा ) – भाग दूसरा

जन्मांगम – भाग १ चिमे पाठोपाठ अनंताही देवळाच्या पायऱ्यांपाशी येऊन धडकला. तिच्या डाव्या हाताला उभा राहीला. डोक्यात चांदणं चमकल्यागत तो ही देऊळभर उजळ दिव्यांचा प्रकाश पाहून थक्क झाला. चिमेला पडलेले तेच प्रश्न त्यालाही पडले…… मंदिरभर हे जीवंत दिवे… आज….कूनी….काहून….?????अनंताने आधारासाठी… Continue Reading →

जन्मांगम ( गूढकथा ) – भाग पहिला

“पौर्णिमेला म्हसोबाला त्याचा मानाचा नारळ व्हायलास न्हाय, तर जल्माला येनारं मूल आंधळं होईल.” दारावर थाप मारुन, असा जळजळीत शाप देऊन, हाताची बोटं कडाकडा मोडून दारावर आलेली आक्काबाई आज काहीही दान न घेता पुढं चालती झाली. क्षणभर तर काय झालं हे… Continue Reading →

पिंपळ – गूढ कथा – भाग २

पिंपळ – गूढ कथा – भाग १ आज दिवसभरात अधीरचा सूर काही लागत नव्हता. त्याच्या अस्वस्थ मनाची प्रचंड चिडचिड होत होती. आजीने जे काही सांगितले त्याचा आणि “मला वाचवं” या विनवणीचा काहीच संबंध लागत नव्हता. “घरातून बाहेर पडायचं नाही,” असं… Continue Reading →

पिंपळ – गूढ कथा – भाग १

घाटाच्या शंभर-दिडशे पायऱ्या उतरून अधीर चर्णावतीच्या पाण्यात पाय बुडवून बसला. मुंबईहून नुकताच प्रवास करून आल्यामुळे थोडा थकला होता. गावात जाताना वाटेवरच्या नदीच्या घाटाच्या सौंदर्याने त्याला मोहीत केलं होतं. पाण्यात पाय घातल्यावर पायाला जाणवणारा थंडगार पाण्याचा स्पर्श त्याला सुखावत होता. पायाच्या… Continue Reading →

घुबड – भयकथा

लहानपणापासूनच माझ्या कोकणातल्या न उलगडणाऱ्या रहस्यमयी गोष्टी कानावर पडत पडतच मोठा झालो, म्हणूनच मनावर एक प्रकारचं दडपण होतं, मन अस्वस्थ करणारं, थरकाप उडवणारं त्यामुळेच कदाचित गावी लग्न करायला माझं मन तयार होत नव्हतं, पण घरच्यांच्या आग्रहापुढे मला नमते घ्यावे लागले आणि… Continue Reading →

मल्लमा – गूढ कथा – भाग २

मल्लमा- गूढ कथा – भाग १ कोसळणा-या धबधब्याचा आवाज कानाला दडे बसवणारा होता. गुहेतला अंधूक प्रकाश शरण्यला आत गुहेत आकर्षित करत होता. त्या प्रकाशाकडे पाहून गुहेबद्दल वेगळंच कुतूहल त्याच्या मनात निर्माण झालं. त्या प्रकाशाचाच मागोवा घेण्याची दुर्दम्य इच्छा त्याच्या मनात… Continue Reading →

चेटकी – भयकथा

चंद्रमौळीच्या अरण्या शेजारी आसलेल्या आदिवासी पाड्यात एका नवशिक्या पोलिस पाटलाची नियुक्ती झाली. उंचपुरी, अत्यंत कर्तबगार आणि धडाडीचं व्यक्तिमत्व. दुपारच्या कडकडत्या उन्हात इतकी वर्षे या पाड्यावरचा पोलिस ठाण्याचा बंद दरवाजा आज काय तो उघडला. पाड्यावरची दोन चार मंडळी लागलीच पोलीसाच्या सोबतीला… Continue Reading →

मल्लमा – गूढ कथा – भाग १

मल्लारण्याच्या कड्यावरुन कोसळणा-या धबधब्या शेजारी शरण्यला काजव्यांसारखा मंद प्रकाश जाणवला. त्या प्रकाशाचा मागोवा घेताना त्याला काहीच अंतरावरच एक गुहा दिसली. गुहेपाशी जाताच आत दूरवर प्रकाशाचा अंधुक ठिबका दिसू लागला. रात्रीच्या गही-या अंधारात गुहेतून बाहेर पडणारा हा प्रकाश शरण्यला त्या गुहेत… Continue Reading →

वाडा – भयकथा (Wada- Horror Story)

पहाटे माजघरातल्या उंची फळीवर हळदीच्या कापडात गुंडाळलेली तीन शेंदूर फासलेली  लिंबा सापडली तसो म्होरक्या गावभर बोंबलत फिरलो, “तात्यांच्या वाड्यावर कुणीतरी करणी केली.” तात्यांची जरब इतकी कि, सगळ्या गावात शांतता पसरली. भल्या पहाटे ह्या काय कानावर पडला म्हणून गाव नि:शब्द झालो…. Continue Reading →

© 2024 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑