शब्द ब्रम्ह आहेत. हे विश्वच ध्वनिनिर्मित शब्दांच आहे. जिथे शब्द संवाद साधतात, शब्द हास्य खुलवतात, शब्द गालावर ओघळतात, शब्द व्यक्त होतात, शब्द ठाव घेतात, शब्द चित्र रंगवतात, शब्द निःशब्द होतात. श्री. अनुप साळगांवकर यांचा ब्लॉग

Month May 2020

वाडा – भयकथा (Wada- Horror Story)

पहाटे माजघरातल्या उंची फळीवर हळदीच्या कापडात गुंडाळलेली तीन शेंदूर फासलेली  लिंबा सापडली तसो म्होरक्या गावभर बोंबलत फिरलो, “तात्यांच्या वाड्यावर कुणीतरी करणी केली.” तात्यांची जरब इतकी कि, सगळ्या गावात शांतता पसरली. भल्या पहाटे ह्या काय कानावर पडला म्हणून गाव नि:शब्द झालो…. Continue Reading →

पाणीपुरी -कविता

आपलं नातं म्हणजेआहे चवदार पाणीपुरीतिखट, गोड, आंबट, तुरटजिभेला चव येते न्यारी जास्त पाणी भरता जशीकोलमडून पडते पुरीनात्याचंही तसंच काहीसंते जपण्याचीच कसरत खरी उतावीळपणे घाई करतातिखटाचा हा जातो ठसकाभांडण, तंटा, रुसवे, फुगवेनात्यात थोडा मारू मस्का सगळे जिन्नस प्रमाणात असताजिभेवर चव रेंगाळते… Continue Reading →

हेच तर हवं होतं….(This is what we want)

आपल्याला हेच तर हवं होतं ना…….मोबाईल, इंटरनेट विदेशातून येऊन त्यांनी आपले पाय आपल्या मायभूमीवर घट्ट रोवून धरल्यावर आपण त्यालाच तर सर्वस्व मानत आलोय. श्वासागणिक एक मेसेज येतोच येतो. तो आला की पाहण्याच मोहही होतो. प्रियजनांचा असेल तर डोळ्याखालून नक्की जातो,… Continue Reading →

अनुभूती – भाग १ (Experience-1)

दिनांक. २२ मे २०२०अनेक विचारांच्या झंझावातात साधारण सायंकाळी ७. ३० वा. मांडी घालून, भिंतीला पाठ टेकून घरात बसलो होतो. एक अर्ध्या तासापूर्वीभाच ऑफिस मधल्या दोन सहका-यांचा फोन येऊन गेला. त्यांच्याशी बोलून झाल्यानंतरच या लॉकडाऊनच्या काळात पुढे काय वाढलंय याची प्रचंड… Continue Reading →

गुलाबजाम – कविता

गोल गरगरीतमाव्याचा गोळारंग दुधाळीदिसायला भोळा पिठ मळतानाथोडं घालू दूधपाकाला साखरफक्त चार मुठ मंद अलवारपरतू तुपातगुलगुलेल गोळाबदामी रुपात पाकात घालूजायफळ वेलदोडामूरु दे सावकाशधीर धरा थोडा इतर मिष्ठान्नावरयाचाच धाकटया याला पोहायलाएकतारी पाक विसरु डाएटकरु क्लुप्तीखाऊ मनभरमिळवू तृप्ती चवीने चाखूनविसराल दामनाव तयाचेगुलाबजाम©अनुप साळगांवकर

ऋषीमुनी (Sage)

नुकतेच काही कलाकारांचे इंटरव्हू घेतले होते. इंटरनेटवर प्रसिद्धही झाले होते. रोजच्या रडगाण्याला कंटाळून संध्याकाळी मी एका प्रेसच्या पार्टीत गेलो. कदाचित् माझं असं अचानक जाणं आणि “ते” भेटणं विधीलिखीतच होतं. त्या दिवशी पार्टीत “ते” अगदी सहज भेटले, समोर येऊन हॕण्डशेक करत… Continue Reading →

काळे ढग- पांढरे ढग (Black clouds- white clouds)

इंद्र देवाच्या दरबारात दोन गंधर्व गायक होते. दोघेही आपापल्या सुरांचे पक्के आणि गाण्यात तरबेज. दोघांकडे सुरांची अशी काही जादू जी समोरच्याला मंत्रमुग्ध करेल, इंद्र दरबारी दोघे अप्रतिम गाणं सादर करायचे. दरबारातीलच नाही तर स्वर्गलोकीचे सर्व देवही भान हरपून त्यांचं गाणं… Continue Reading →

जीवनदायी नदी (Life-giving river)

एक नदी अनेक गावं , शहरं आणि प्रांतांचा प्रवास करत अविरत वाहत असते. खळखळ आवाज करून नाद करत असते. स्वच्छ, मधुर पाणी साऱ्यांना निस्वार्थ देत असते. अनेक प्राणी, पक्षी आपली तहान भागवण्यासाठी नदी तीरावर येत असतं, पाणी पिऊन तृप्त होऊन परतत… Continue Reading →

कावळा (Crow)

एका घरात एक आजीबाई एकटाच राहत होत्या. कुणीही नातेवाईक नाही कि कुणी सांगे सोयरे नाहीत.दिवसभर त्या घरात एकट्याच असायच्या. वेळ घालवण्यासाठी खिडकीपाशी उभं राहायच्या, खिडकीत येणाऱ्या प्रत्येक पक्षांशी बोलायच्या, त्यांच्या आवडीची फळे, खाऊ त्यांना खाऊ घालायच्या. कावळे दादांची आणि आजीची… Continue Reading →

पावसाचे थेंब (Rain Drops)

पावसाची नुकतीच सुरवात होती. शाळा सुरु व्हायला अजून अवकाश होता. ढगां आडून सुर्य किरणांनी डोके थोडे वर काढले म्हणून आस्था आणि तिची आई नेहमीप्रमाणे बाहेर फेरफटका मारायला निघाली. अवघ्या दहा वर्षाच्या कोवळ्या वयात आस्थाची प्रश्न मालिका काही केल्या संपत नव्हती…. Continue Reading →

© 2024 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑