आजच्या दिवशी तुझा फोन आला नाही. असं कधीच झालं नाही…..
वर्षेभर पहावी लागणारी वाट …. आजच्या दिवशी मला अजीबात पहावी लागली नाही….. खात्रीच होती तशी.
वर्षीतून एकदा तू फोन करतोस… नाही रे…. तक्रार नाही माझी ….विश्वास आहे…..उलट अभिमानच वाटतो तुझा…. तुझ्या वाचासिद्धीचा.
आज हेच सांगायचंय तुला…
हे जे कठीण आहे, ते तू किती साधं आणि सोपं केलंयस…. आपल्या मैत्रीला तू नेहमीच वेगळं सिद्ध केलंयस…
आत्ता या क्षणाला…. लहानपणीचे सगळे दिवस आठवतात मला….
पान हलायचं नाही माझं….
काही सुचायचंच नाही….
तुझ्याशिवाय…
तू होतास म्हणून सारं… पडणं…. धडपडणं…. रुसणं … फुगणं… हट्टपणा… खोडकरपणा… “पाहीजे म्हणजे पाहीजेच…” तूच द्यायचंस…
“आत्ताच्या आत्ता…” तूच करायचंस …
तू सगळं केलंसही… मागून सारं दिलंसही…
माझा प्रत्येक शब्द किती अलगद झेलायचास तू …. माझ्यासकट.
तू मोठा आणि मी लहान….. वर्षेभराने.
लहान असल्याचा पुरेपूर फायदा घेतलाय मी…. तू घेऊही दिलास… मला माहीतीय… तुला आवडायचं ते मोठेपण… मोठा आहेसच तू… वयानं आणि मनानं सुद्धा …
तुला परदेशी जायचं होतं… तुझं तेच स्वप्न होतं… नेहमीच बोलायचास तू….. ” मी नाही हं… आयुष्यभर सांभाळायला…”
तेव्हा खुप राग यायचा तुझा. मला तुला कुठेही जाऊ द्यायचं नव्हतं. मला ते पटणार नव्हतं असं नाही रे…. त्याहीपेक्षा पचणार नव्हतं … कोण होतं रे … ??? माझं…. इतक्या आपलेपणानं …. काळजीनं लाडीवाळपणे करणारं…. तुझ्याशिवाय…
समोरचा हट्ट पुरवतो… म्हणून तो हट्ट करण्यात मजा आहे…
देणारा प्रेमानं देत गेला… की घेणाऱ्याला त्याचं कधीच ओझं वाटत नाही.
प्रेम करता आलं पाहीजे…. तसं ते करुन घेताही आलं पाहीजे…..
मी ते हक्कानं करुन घेतलं आणि तू निरपेक्ष केलंस इतकचं….
तू दिलंयस मला… भरभरुन दिलंयस…
आजही देतोयस… स्वतःचा शब्द जपतोयस….. मला जगवतोयस …
तु एअर-पोर्टवर डबडबलेल्या डोळ्यांनी, गालात हसत, शेवटचं मला कडकडून मिठी मारुन माझ्या कानात हळूच म्हणाला होतास, ” फ्रेंडशिप-डे ला तुला नक्कीच फोन करीन.”
तुझे ते शब्द … शब्द नाहीत रे… तुझ्यासाठी भिष्मप्रतिज्ञाच ती….
आणि … माझ्यासाठी …. जगण्याची उमेद.
कँलेंडरची पानं वाऱ्यावर फडफडून पलटतात रे… दरवर्षी….
आजचा दिवस उगवतो… पण मावळतो तो तुझ्या फोनवरच्या आवाजानं… आपल्या संभाषणानं….
जादूगार आहेस तू…
हे तुलाच जमू शकतं…
तु मला दिलेला शब्द आजन्म पाळशील … याचं विश्वासानं तुझी ती शेवटची मिठी सोडवून तुला मोकळं केलं… तुझ्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी… अनोळखी आकाशात….. माझ्यापासून… दूर… दूर देशात….. परदेशात.
हे सगळंच सांगायचं होतं तुला….
दरवर्षी त्या फोनवर… थोडं थोडकं … मांडायचं होतं… राहीलंच…
आज लिहीलं….
तुझ्या मनातलं आकाशही निरभ्र व्हावं म्हणून ….
मी राहीन अरे…. तू जे दिलंस …. जे सांगितलंस…. जे शिकवलंस …. ते उराशी कवटाळून…
खरंच राहीन….
पण….
दरवर्षी याच दिवशी तुझ्या फोनची वाटही पाहीन…..
मैत्री दिनाच्या शुभेच्छा…. तुलाही….
दि. ३१ आॕगस्ट २०२१
©™ श्री. अनुप साळगांवकर
September 12, 2021 at 10:44 pm
।। श्री गुरूदेव दत्त।।
थोडया शब्दात आशयपूर्ण लिखाण करतात तुम्ही।नुकतीच माझ्या एक जिवलग मित्राने मला फोन न करता exit घेतली।त्याची आठवण झाली।असो।
September 13, 2021 at 5:31 am
धन्यवाद सर
September 12, 2021 at 10:51 pm
Great words.
September 13, 2021 at 5:31 am
Thx mitra
September 13, 2021 at 1:26 pm
अप्रतिम, अतिसुंदर , हृदयस्पर्शी लिखाण
September 13, 2021 at 1:30 pm
धन्यवाद
September 25, 2021 at 6:51 pm
Khup khup chan
August 4, 2024 at 11:22 am
Chan ahe
November 22, 2024 at 11:57 pm
Awaiting moderation
гѓ—гѓ¬гѓ‰гѓ‹гѓі и–¬е±ЂгЃ§иІ·гЃ€г‚‹ – г‚ўг‚гѓҐгѓ†г‚¤гѓійЊ 40 mg еј·гЃ• г‚ўг‚ュテイン通販で買えますか