“फादर्स डे” च्या निमित्ताने एक खूपच छान विडिओ पाहण्यात आला.
आयुष्यात कुणाला हि बापाची किंमत कळावी असा काहीसा ….
काय आहे या व्हिडिओत … ?
सोनेरी रंगाचे नर आणि मादी मासा आनंदाने पाण्यात विहार करत असतात.
त्यातली मादी पाण्याच्या तळाशी जाऊन ३०-४० अंडी देते.
अंडी देऊन …. मादीने आपलं काम पूर्ण केलेलं असतं
या पुढे सुरु होते ती त्या बापाची म्हणजेच नर माशाची कसरत
एका अव्यक्त प्रेमाची गोष्ट
नर मासा ती सगळी अंडी एकएक करून गिळतो.
आपले पोट भरण्यासाठी नाही हं ….
तर त्यांना जगवण्यासाठी …. आपल्या मुलांना जिवंत ठेवण्यासाठी
पुढचे ५० दिवस …..आणि तितक्याच रात्री
तो ती अंडी आपल्या पोटात ठेवतो … काहीही न खाता… तोंड न उघडता.
त्या पन्नास दिवसात ती अंडी त्या नर माशाच्या पोटातल्या ऊर्जा शक्तीवर फळतात आणि कार्यकाळ पूर्ण झाल्यावर, नर मास्याच्या तोंडून लहान लहान बाळं आपलं सर्वस्व घेऊन बाहेर पडतात.
जिवंतपणी आपल्याला लाभलेलं …. आपलं अस्थित्व टिकवण्यासाठी
पुढचे दोन आठवडे … ती पिल्लं छान स्थिर-स्थावर होतात आणि एका नव्या आयुष्याला सुरुवात करतात.
सदर विडिओ इकडे संपतो …..
पण खरा, दुर्दैवी आणि मनाला हेलकावून सोडणार प्रसंग पुढे आहे.
नर मासा ज्याने पन्नास दिवस काहीही खाल्ले नाही … तो मासा पिलांना तोंडातून बाहेर काढल्यावर अन्नावाचून काही काळातच मरतो. ….. असं का होतं ??कारण तो बाप असतो.
आपल्यातलं आपलंसं आपल्या पिल्लांना हे असं निस्वार्थी देता आलं पाहिजे ….. रिकामी होता आलं पाहिजे
एक कर्तव्यनिष्ठ पित्याचं काम करून असंच कायमचं मोकळं होता आलं पाहिजे.
मुल जन्माला घालणं आणि ते जगवणं या दोन्ही गोष्टी एकमेकांना समांतर अशाच आहेत.
जन्माला घालताना जशा वेदना होतात तसेच जगवतानाही चिमटे बसतातपण तो जाणवू देत नाही …. मागून स्वतःसाठी काही घेत नाही
कधी कुणाला प्रश्न पडला का …???
बाप मक्ख चेहऱ्याने जेवतो …. तो कधी का हसत नाही
उन्हाने तापलेल्या डोक्यावर … टोपी कधीच दिसत नाही
काळजी करणारं घड्याळ …. बंद कधीच पडत नाही
आपलं सर्वस्व देऊन …. मिळालेलं रिकामीपण कधीच का छळत नाही
अहो …..
बाप अश्रू ढाळत नाही …. म्हणून तो कुणालाच कळत नाही.
शुभं भवतू …
कल्याणमस्तू
श्री. अनुप साळगांवकर
June 21, 2022 at 4:51 pm
Nice bro
February 21, 2025 at 12:56 pm
Awaiting moderation
buy clavulanate pills – generic nizoral cymbalta order