लग्न.. लग्न… लग्न…
उटसुट सगळेच लग्न करतायत.
लॉकडाऊनमधे आणि लॉकडाऊन नंतर Productive काही करण्यासारखं असेल तर ते…. लग्नच. मलातरी सध्या असंच वाटतंय
अहो… Bold and Beautiful कतरीनानं केलं.
आत्ता तर बालविवाहाची जाहिरात म्हणून कि काय….. आलियाचंही झालं.
आमच्या नशिबी काय…?
तर फक्त …. आलिया भोगासी…

इतरांचा लग्न करण्याचा उत्साह पाहून माझा आत्मविश्वास जरा जास्तच वाढलाय
” काय नाय होत बे…..  करून टाकू “ मनानंही उजवा कौल दिलाय
मी जरा उशीरच केला का.. ? या दोघींना विचारायला
जरा लवकर विचारलं असतं तर आमच्याही लग्नाचे कॉपीराईट्स करोडोंना विकले गेले असतेच की. माझं हे नेहमीअसंच होतं….
हिंदी सिनेमात कसं….
वेळ निघून गेली…
हिरोने विलनला धू धू धूतला…
हिरॉईनबाई मारामारी बघून अवाक झाल्या…
हिरोवर जाम लट्टू झाल्या… की मग…” पुलीसने इस जगहको चारों तरफसें घेर लिया हैं.!”
असं म्हणत पोलिसकाका येतात ना….
अगदी तस्संच…
एखाद्या मुलीच्या डोक्यावर अक्षता पडल्या की….., माझ्या डोक्यात कुक्करच्या शिट्ट्या वाजून त्याच अक्षतांचा भात शिजून तयार होतो आणि वाटतं….
“हिला विचारायला हवं होतं.”
पण….. काय होतं ना
मुलगी समोर आली की मला बुवा काहीच सुचत नाही.
विचारीन.. विचारीन म्हणतो… पण धाडस होत नाही…
हो …हो ….एकटाच आतल्या आत कुढतो मी…
एकतर्फी प्रेमात बुडतो मी…
जे अपेक्षित आहे …. ते काहीच घडत नाही… विचारीन.. विचारीन म्हणतो… पण धाडस होत नाही…

तुम्हाला म्हणून सांगतो … मलाही भरभरून प्रेम करायचंय …
“अजूनही सिंगल का ?” या प्रश्नाला सडेतोड द्यायचंय
पोटातलं ओठावर हळूवार आणायचंय
तिच्यावर कविता करून … तिच्यावर Lifelong मरायचं
दिवस जाईल हो कसापण …. रात्रभर तिच्यासाठी झुरायचंय
ते तासन-तास चंद्राकडे बघून, तिचा चेहरा चंद्रात दिसतो का ?कि या फक्त अफवा आहेत …. या निष्कर्षापर्यंत पोहोचायचंय.
डोळे गच्च मिटून….  तोंडातल्या तोंडात गणपती स्तोत्र पुटपुटून…..
पार्कातल्या गणपतीला आमच्या प्रेमाच्या शपथांसाठी साक्षीदार बनवायचंय 
“ती आत्ता काय करत असेल ?” असा प्रश्न स्वतःला विचारून … तिच्यात क्षणा-क्षणाला गुंतायचंय
आयुष्यात बाकी काही नाही हो  …
पण एकदा तरी निस्वार्थ प्रेम करायचंय
होईल …
होईल …
सगळं होईल ….
मी ठरवलंच आहे
जिच्यासाठी सहज Postpone होतील ऑफिसच्या Meeting
तिच्याशीच करीन रात्र जागून Chating
घरातून बाहेर पडताना जी आठवणीने देईल मला रुमाल
बाजारातून भाजी आणण्यासाठी मी होईन तिचाच हमाल
जी उजळवेल माझ्या देवघरातल्या वाती
माझा सगळा वेळ फक्त तिच्याचसाठी

पाडवा, दसऱ्याला जी कुंकू वाहील कार वर
तिच्यासाठीच मी होईन तिचा ड्राइवर
अहो येईल ….
ती वेळ नक्कीच येईल
चेहरा गुलाबी होईल 
दिवसही नकळत छान Smile येईल मनात हळूच गुदगुदली होईल
अंगात वीज चमकून शिरशिरी येईल
कुणा -कुणाच्याही बोलण्याचं वाईट वाटणार नाही
ती भेटण्या आधी वेळ सरता सरणार नाही

आणि भेटल्यावर….
वेळ सरूच नये ….  असं वाटतं राहील
अगदी अस्संच होईल
पण नक्की होईल ना …. ?

कारण …..  मुळात कस करावं प्रेम तिच्यावर हेच मला कळत नाही
सतत Online – Offline काम करण्यात वेळ मात्र मिळत नाही
“प्रेम उबदार असतं.” असं म्हणतात
माझ्या मनात असलेली असलेली प्रेमाची लाकडं … काही केल्या जळत नाही
कस करावं प्रेम तिच्यावर हेच मला कळत नाही

“देवाकडे जे मागू ते मिळत” असही म्हणतात
डझनभर आंबे चोपडून देव झोपलाय का? आम्हाला खबर मिळत नाही
कळतंय हो सगळं … पण वळत नाही
कस करावं प्रेम कुणावर हेच मला कळत नाही

जाऊ द्या …. फार व्यथा लिहीत नाही
त्या कथा सांगायला ती काही केल्या भेटत नाही
पण …. हे मान्य करतोच
मनात हीच दंगल
व्हावे शुभमंगल
कारण अजूनही ….
मी Single

शुभं भवतू …
कल्याणमस्तू
श्री. अनुप साळगांवकर