तिने नऊ रंगाच्या नऊ साड्या कधीही नेसल्या नाहीत. रंगांचं आकर्षण मुळातच नव्हतंच तिला…. कधीही … पण समोरच्या व्यक्तीने रंगून जावं असं बहुगुणी, आयामी व्यक्तिमत्व.
सणा-वाराला ठरलेली हिरव्या रंगाची काठापदराची साडी नेसून यायची. त्या हिरव्या रंगाच्या साडीत तिचा हसरा चेहरा हिरव्या पानांमध्ये नुकत्याच उमललेल्या गुलाबासारखा दिसायचा …. प्रसन्न आणि टवटवीत. दिवसभर ते चैतन्य लेऊन इकडून तिकडे वावरत असायची.
काम करत असताना सतत “राम राम ..” म्हणत असायची. काम झालं की ….. कृष्णार्पणमस्तू.
हा मनात जन्मभर जपलेला राम आहे ना…… हा रामच तुझा रक्षणकर्ता आहे बाई …….. आणि कार्यभार सांभाळणारा कृष्ण, हाच तुझा मार्गदर्शक.
दिवस उगवला की, सकाळी आठ ते रात्री आठ, सतत उभी दिसायचीस. घरातली, बाहेरची सगळीच कामं चटचट करायचीस. कोणतेही सणवार असो, घरात गणपती असो…. नवरात्रीत घट बसूदे….. “आईंनू… हाना मी करते… ” असंच म्हणायची. तुझ्यासारख्या सद्गुणी मोलकणीचं मोल करता यावं एवढी पात्रताच नाही आमची. काही माणसं भेटण्यापेक्षा ती लाभावी लागतात…. खरंय ना….!!!
आंधळ्याने अंधारात चाचपडत राहावं आणि त्याच्या हाताला एखादं अनमोल रत्न लागावं …. जे अनमोल आहे….दुर्मिळ आहे… त्याचीच तर किंमत जास्त आहे. तुझ्याबतीत अशीच अवस्था आहे आमची.
मला आठवतं …. आम्ही शाळकरी असताना, आम्हाला सोडायला, आणायला तूच यायचीस…. स्वतःच्या हातानं जेवण भरवायचीस…. नाही जेवलो तर रागे भरायचीस… आईने फक्त लाड केले… मनं जपलीस तूच… स्कंदाची माता….. स्कंदमाता.
गणपतीला भजनमंडळी जमली की, तुझा चूलीसमोर वरचा “सा” लागलेला असायचा. तुझी गुणगुण घर भरुन टाकायची आणि मन भारुन टाकायची….. देवासमोरचं भजन गोड की, तुझा गळा गोड … मला प्रश्नच पडायचा… त्या विद्या देवीने आपली वीणा छेडावी आणि त्या दैवी स्वरांनी स्वर्ग मंत्रमुग्ध व्हावा, तोच स्वर गळ्यात जागवणारी तूच…. गान सरस्वती.
नवरात्रातलं कन्यापूजन असो अथवा गंगा दशहराचं कन्याभोजन… किती सहज … सोप केलंस तू सारंच… काहीही उपास-तपास न करता आशिर्वाद मात्र भरभरुन मिळाले … मुलींच्या आवडीनुसार त्यांच्या खाण्याची चंगळ पूर्ण करुन त्यांची तृषा भागवणारी तूच… अन्नदात्री …. अन्नपूर्णा.
कितीही काम पडलं तरी कधीही तक्रार केली नाहीस तू…. तिन्हीसांजेला आईने देवघरी दिवे उजळवले की तू तिच्या मागे मागे घंटा वाजवत घरभर फिरायचीस… “घंटा घणाणली की वाईट शक्ती पळून जातां” असंच काहीसं बडबडायचीस. भाषा कोणतीही असो…. तुझ्या वाणीतल्या आपलेपणानं आमचं घर देऊळ झालंय…. तुझ्या कपाळावरच्या चंद्रकले इतकीच शांती इथे आजही लाभते मला…. ती शांती देणारी शांतीप्रिय दात्री तूच आमची …. चंद्रघंटा
मागच्या नवरात्रीत ताईला अचानक प्रसव कळा सुरू झाल्या… तू लगोलग सगळ्यांना फोनाफोनी करुन … ताईला धीर देत…. कसलीही वाट न पहाता तिला वेळेत इस्पितळात नेलंस सूद्धा…. एरवी कौटुंबिक सिरियल बघून डोळ्यातून टिपं गाळणारी तू…. त्या एका क्षणासाठी परिस्थितीचं गांभीर्य जपून …. तो क्षण तारुन नेणारी तूच…. महादूर्गा
“ताईंनूं…. पोरीचा नाव शांभवी ठेवां हं” असं हक्कानं सांगणारी… त्या लहानग्या बाळाचं गोड कौतुक करणारी, काय हवं नको ते जातीनं पहाणारी, जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत ती खरी तूच … कात्यायनी.
गौर म्हणजे गोरा, पांढरा रंग शुद्धतेचे प्रतिक आहे. शुद्धता निरागसतेमधून येते. ज्या व्यक्तीच्या मनात पाप नाही ती व्यक्ती निरागस. तुझ्या हातून झालेलं कोणताही काम “कर्म” म्हणून नाही “धर्म” म्हणून स्वीकारणारी तूच …. महागौरी
असं म्हणतात, दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने शुभ शक्ती मिळते, अनिष्ठाचा नाश होतो, सुख समृद्धी प्राप्त होते.
दुर्गा सप्तशती कधीही वाचलं नाही मी… पण ती सप्तशक्ती अनुभवली हे मात्र नक्कीच….. तुझ्या रूपात.
आईसाठी तू विश्वास आहेस….. बाबांसाठी घास आहेस….
ताईसाठी आस आहेस…
आणि …
माझ्यासाठी ??? ….
माझ्यासाठी तू माझ्या घराचा श्वास आहेस.
जिच्या नावालाच दैवी आशिर्वाद आहेत….
जी विष्णू विलांसिनी आहे …
ती तूच …
आमची …लाडकी
सौ. लक्ष्मी विष्णू देव.
शुभं भवतू
कल्याणमस्तू
श्री. अनुप साळगांवकर
१४ ऑक्टोबर २०२१ ( दुर्गाष्टमी )
October 13, 2021 at 10:19 pm
।। श्री गुरूदेव दत्त।।
अप्रतिम लेखन।
म्हागौरी — कर्म म्हणून नाही धर्म म्हणून स्वीकारणारी
विश्वास,घास,आस आणि श्वास — ओघवत्या शब्दांची सुरेख पेरणी,
आणि नामकरण तर अती सुरेख –
सौ लक्ष्मी विष्णू देव
खूप सुंदर, असच लिहीत रहा ……
October 13, 2021 at 11:19 pm
फार सुंदर. प्रत्येक स्त्री ही देवी समान असते. प्रत्येकाने तिच्याकडे आदराने पाहिले पाहिजे तिच्या त्यागाचा सन्मान केला पाहीजे.
स्त्री शिवाय माणसाचे जीवन अपूर्ण आहे. जीवनाच्या प्रत्येक पावलावर तिची साथ असते
हे ज्याला कळले तोच खरा माणूस.
फार सुंदर शब्दात सांगितले आहे.
धन्यवाद.
October 21, 2023 at 9:44 am
अतिशय सुंदर लेख. अशा कितीतरी लक्ष्मीमुळे , दुर्गामुळे आपली आयुष्य समृद्ध झाली आहेत. मूर्तित देव शोधताना त्यांची पूजा करायची राहूनच जाते. तुमच्या शब्दरूपी सुमनानी ही पूजा संपन्न झाली आहे. 🙏🙏
October 17, 2021 at 7:51 pm
khup chan lihilay
October 2, 2022 at 4:45 am
वाह फारच छान लेख आणि अर्थ पूर्ण विश्लेषण
November 30, 2022 at 12:22 am
दुर्गा सप्तशती बदल च लेखन खूपच छान , (देवीने आपली वीणा छेडावी आणि त्या दैवी स्वरांनी स्वर्ग मंत्रमुग्ध व्हावा, तोच स्वर गळ्यात जागवणारी तूच…. गान सरस्वती) है तर इतकं मस्त की no words 🥀🤌🏻✨
October 20, 2023 at 4:52 pm
फार सुंदर. प्रत्येक स्त्री ही देवी समान असते. प्रत्येकाने तिच्याकडे आदराने पाहिले पाहिजे तिच्या त्यागाचा सन्मान केला पाहीजे.
स्त्री शिवाय माणसाचे जीवन अपूर्ण आहे. जीवनाच्या प्रत्येक पावलावर तिची साथ असते
हे ज्याला कळले तोच खरा माणूस.
फार सुंदर शब्दात सांगितले आहे.
धन्यवाद.
October 20, 2023 at 4:52 pm
फार सुंदर. प्रत्येक स्त्री ही देवी समान असते. प्रत्येकाने तिच्याकडे आदराने पाहिले पाहिजे तिच्या त्यागाचा सन्मान केला पाहीजे.
स्त्री शिवाय माणसाचे जीवन अपूर्ण आहे. जीवनाच्या प्रत्येक पावलावर तिची साथ असते
हे ज्याला कळले तोच खरा माणूस.
फार सुंदर शब्दात सांगितले आहे.
धन्यवाद.
October 20, 2023 at 6:12 pm
अनुप सर
अप्रतिम लिखाण
पौराणिक आणि आधुनिक देवींचा फरक दाखवून दिलात.
जय माता दी……..
October 21, 2023 at 5:14 am
खुप छान, शब्दातीत शब्द ब्रम्हाचा अनुभव.
October 21, 2023 at 4:16 pm
Khup chaan lihilay…👍😊
October 22, 2023 at 5:39 am
अप्रतिम लेखनशैली, लवकरच पुस्तक प्रकाशित होवो याच शुभेच्छा 👍💐
October 23, 2023 at 3:14 am
।। श्री गुरूदेव दत्त।।
।। श्रीकृष्णाच्या बासरीतून मधुर स्वर निनादावेत, पारिजातकाच्या झाडाने टपटप फुलांचा वर्षाव करावा असा हा तुमचा शब्द प्रपंच।अगदी अनोखा।खऱ्या दुर्गेची ओळख सांगणारा।शब्दच नाहीत।लिहत रहा।
January 18, 2025 at 2:07 am
Awaiting moderation
cheap amoxil without prescription – order combivent 100mcg online cheap combivent 100mcg tablet