तुझं माझं वेगळंय….
सतत म्हणायचीस तू….
हो… वेगळं आहे खरं….
माझं नाही…तुझं….. सगळंच वेगळंय….
कपाळावर टिकली नाही, कानातल्या कुड्या नाहीत, हातातल्या बांगड्या तर तुला कधीच आवडल्या नाहीत …. बांगड्यांचं काय … तर म्हणे…. “त्या किणकिणत राहील्या की झोपमोड होते माझी” प्रत्येक कारण आई बाबांना अगदी पटवून द्यायचीस तू….. झोपेवर प्रचंड प्रेम करणारी आणि बांगड्यांचा तिरस्कार करणारी तेव्हा माझ्यासाठी एकमेव तूच….
अप्रुप वाटायचं मला….
चटचट सगळी कामं करायचीस…. भरपूर नाही…. पण… मन लावून अभ्यास करायचीस…. शारीरिक व्यायाम तर कधीही चूकला नाही तुझा….. मलाही अभ्यासात मदत करायचीस… जिन्स आणि टि-शर्ट घालून दोन मिनिटांत तयार व्हायचीस….
आयुष्यात करायचं काय…???
या प्रश्नाचं ठरलेले उत्तर …..
“सदरक्षणाय खलनिग्रहणाय”
तुला तेव्हा पोलिस खात्यात जायचं होतं…. बाबांसारखं समाजासाठी काहीतरी करायचं होतं… आई बाबांना तुझा, तुझ्या जिद्दीचा, तुझ्या हुशारीचा खुप अभिमान वाटायचा….
माझ्यासाठी तू…… सतत शिस्तबद्ध, हुशार, ध्येयवेडी, तडफदार….. “हिटलर दिदी”
“हिटलर दिदी” म्हणून मीच तुझं नाव सगळीकडे बदनाम केलं होतं…. म्हणून कधीही चिडली नाहीस तू…. मला कधीही अंतर दिलं नाहीस…..
उलट मलाच पाठीशी घालायचीस… मला काय म्हणायचीस….??? तर “मम्माज बॉय आहे नुसता….. अरे आईचा पदर सोड…” असं म्हणता म्हणता ते आईपण आईकडून तुझ्यात कधी रुजलं तुझं तुलाच कळलं नाही.
आईचा पदर सोडला तेव्हा माझ्या हातात तुझाच हात होता….. आईला ” अगं करेल तो…. त्याच्या आवडीचं काहीतरी….” असं म्हणताना मी ऐकलंय तुला….. तेव्हाही तुझा खूप आधार वाटायचा….
तू आहेस हा विश्वास वाढायचा….
तुझ्या स्वबळावर पहील्याच फटक्यात पोलिस खात्यात नोकरी मिळवलीस तू.
तो दिवस आपल्या कुटुंबातला सगळ्यात आनंदाचा दिवस…. विसरताच येणार नाही.
वर्षेभर मिळणाऱ्या पगारातून तू स्वतःसाठी मला आवडणारी Royal Enfield घेतलीस…. कारण काय दिलंस…. तर…. “पोलीस झाले… मग रुबाबदार दिसायला हवं….”
तुझ्यापाठी बाईकवर बसलं की… खूप टेंशन यायचं मला…. दिसताना मांजरीपाठी उंदीर बसलाय असंच दिसायचं ते …. लोकं उघड उघड बोलली नाहीत…. तुला घाबरायची सगळीच…. पण त्यांच्या डोळ्यात दिसायचं मला….
Tom & Jerry मधल्या मांजरीनं उंदराला नेहमीच त्रास दिलाय…… पण या मांजरीनं उंदरावर भरभरुन फक्त प्रेमच केलंय…. अविरत…. आणि अखंड.
मागच्या वर्षी मला पहीली नोकरी लागली तेव्हा किती आनंद झाला तुला…. तु रक्षाबंधनाला भेटल्यावर राखी बांधून, कष्ट करुन घेतलेल्या तुझ्या Royal Enfield बाईकची चावी हातात ठेवत हसून म्हणालीस… “अरे तुझ्यासाठीच घेतली होती…. आज तुला देतेय…. एवढचं”
“रक्षणाय मम रक्षणाय…” या उक्तीला जागून तू माझी आजवर रक्षाच केलीयस….
कधी बोललो नाही … पण आज थोडं बोलायचंय…… शब्दांत मांडायचंय…. तुला बांधायचंय….
दरवर्षी तू बांधतेस…. यंदा मी बांधणारय….
उद्या रक्षाबंधन….
राखी रक्षण करणाऱ्याला बांधावी….
उद्या राखी तू मला नाही….. मीच तुला बांधणारयं…
माझ्यासारख्या अनेक भावांच सदैव रक्षण करतेयस तू….
मलाही अभिमानच वाटतो तुझा… तेव्हाही वाटायचाच…. आणि आजही….
मलाही तुझ्यासारखं व्हायचंय गं….
ध्येयासाठी बेभान व्हायचंय…
अजून थोडं पुढे पळायचंय….
माझंही कर्तुत्व उजळायचंय…
मला माहीतीय….
हे सगळं मी लिहीलं म्हणून तू नक्की वाचशील… आणि …. उद्याही नक्की येशील….
रक्षाबंधनाच्या खुप खुप शुभेच्छा….
हिटलर दिदी …
कृष्णार्पणमस्तू
©™ श्री. अनुप साळगांवकर
August 23, 2021 at 6:18 pm
॥फार सुंदर. राखीचे खरे महत्व आणि खरा उद्देश सांगीतला आहे ॥
September 10, 2021 at 4:53 pm
।। श्री गुरूदेव दत्त।।फार सुंदर लेख, अनुप जी।आजकाल अशीच स्त्री शक्तीची गरज आहे।आत्मनिर्भर होण्याची।फार समर्पकपणे विचार मांडले।
September 10, 2021 at 6:19 pm
धन्यवाद सर
August 29, 2023 at 5:36 pm
सुंदर
August 29, 2023 at 4:42 pm
अनुप फार सुंदर
August 29, 2023 at 5:06 pm
💐बहिण भावाच्या अतूट प्रेमाबद्दल खूप छान लिहिलंय 👌👌
August 29, 2023 at 5:17 pm
खुपच सुंदर लिहिल आहेस दादा …बहिण भावाचं नातंच तस असतं…एकमेकाशी एकमेकासाठी भांडणार पण आणि तितकच प्रेम हि करणारं….अतुट नातं.
August 30, 2023 at 3:39 am
Very nice 👌👌
Heart touching ❤️
Keep it up Anup 👍
God bless you 🙏
August 30, 2023 at 5:36 am
Khup chaan lihilay …👍😊
August 30, 2023 at 8:47 am
रेशमी, नाजूक पण दृढ नात्याचे सुंदर वर्णन.🙏💐
September 1, 2023 at 5:55 pm
👌👌🙏🙏 फार सुंदर मेसेज.आपल्या संकट समयी रक्षण फक्त पुरुषच करू शकतो असे नाही. ती एक स्त्री ही असू शकते. रक्षाबंधन चा हाच भावार्थ आहे की जो आपले संकट समयी रक्षण करतो त्याला कृतघ्न राहण्यासाठी आपले भाव रक्षाबंधनातून प्रकट करतो🙏🙏
September 3, 2023 at 8:04 am
खूप सुंदर लिहिले आहेस
August 19, 2024 at 3:23 am
Khup chan.