सुरुवातीला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक खूप जुनी आख्यायिका आहे. देवानेच निर्माण केलेला मानव जेव्हा स्वतःला सर्वश्रेष्ठ मानू लागला तेव्हा, हे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी मानवच देवांशी कडाक्याचं भांडण झालं. आपल्या सामान्य बुद्धीप्रमाणे देव हेच सर्वश्रेष्ठ. पण, या अहंकारी मानवाने आपल्या लोभाने आणि क्रोधाने देवांनाही पराभूत केले. या उन्मत्त झालेल्या मानवापासून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी देवाने एक छान युक्ती लढवली आणि ते माणसाच्याच मनात लपून बसले. तेव्हापासून …. अगदी तेव्हापासूनच माणूस हा देवाच्या शोधात इतरत्र भटकत आहे. अर्थ स्पष्ट आहे. “अतिपरिचायत अवज्ञा“आपल्यालाच माहित नसते आपल्या जवळ काय आहे. काखेत कळस आणि गावाला वळसा असे म्हणतो, ते हेच.
तेवायला हवा अंतरीचा दिवा
जपायला हवा अंतरीचा ठेवा
उघड कवाड आपल्या मनाचे
येतील कवडसे आतून प्रकाशाचे
हा आपल्या आतला प्रकाशच महत्वाचा, तो सारं काही स्पष्ट करतो, अंतरीचा अंधार नष्ट करतो. हा अंतरंगातला दिवा सतत तेवत ठेवायला हवा, म्हणजे मनाची कवाडं उघडली कि आतून बाहेर पडेल तो फक्त प्रकाश. जगात पाप आहे म्हणून पुण्य पदरात पडून घ्यावंसं वाटतं. जगात रावण आहे, कंस आहे म्हणून राम आणि कृष्णाची पूजा बांधावीशी वाटते. जगात वाईट प्रवृत्ती आहेत म्हणूनच चांगुलपणाचा हात अगदी घट्ट धरावासा वाटतो. याच सर्व काट्याकुट्यातून मार्ग जातो तो अध्यात्माचा. ज्या वाटेवर अनेक संतसज्जन भेटतात. आपल्याला भेटणारा संत ही या हिरव्या चाफ्यासारखा असतो. सुवास येतो पण त्या हिरव्या पानांत ते फुल शोधूनही सापडत नाही. संत आहेत तिथे आनंद आहे, समाधान आहे. पण ते आपल्या सर्वसामान्यांप्रमाणेच असल्याने आपल्या त्यांच ते वेगळेपण ओळखता येत नाहीत.
दैव हे अफाट समुद्रासारखे खोल आणि विस्तीर्ण आहे. पं. महादेवशास्त्री जोशी म्हणतात, “देवाजवळ काहीही मागितले तर देव म्हणतो हवे तेवढे घ्या. आपलीच ओंजळ लहान असते, म्हणून मागू नका, तो देईल यावर फक्त विश्वास ठेवा.”
सत्य, त्रेता, द्वापार आणि कली या चार युगांपैकी आता कलीयुग चालू आहे. कली हा रंगाने काळा आहे. त्याचा मुख्य गुण मनात गोंधळ निर्माण करणे, जे व्यवस्थित चालू आहे त्याचा नाश करणे आणि मानवी जीवनात एकूणच अस्थिरता निर्माण करणे. या सर्व प्रपंचातून, मायाजालातून आपल्याला तारून नेते, आपला उद्धार करते तीच “ईश्वरशक्ती “ होय.
पूर्वी घराघरांमध्ये धार्मिक वातावरण होते. लोक ध्यानधारणा, पूजा-अर्चा आवर्जून करत. आता पैसा, प्रसिद्धी, शिक्षण आणि अधिकार यातून श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. आत्मिक समाधान लोप पावत आहे. म्हणूनच गरज आहे ती अंतरातील देव ओळखण्याची, त्याला साद घालण्याची, साथ देण्याची आणि हे देवाशी निर्माण झालेलं नातं दृढ करण्याची.
आपल्या पुण्याईने आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे. चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून हा मनुष्य जन्म मिळतो असे म्हणतात. हा जन्म स्विकारताना मन, बुद्धी आणि वाणी या विशेष गोष्टी आपल्याला लाभल्या आहेत. यांचा योग्य उपयोग करून आपल्याला या जन्माचे सार्थक करता आले पाहिजे. या जन्मामध्ये आपण कोण आहोत? कुठून आलो ? आपल्या जन्माचा उद्देश काय ? जीवनाचे अंतिम सत्य काय ? या प्रश्नांची उत्तरं बुद्धीच्या बळावर जाणून घेण्याची असीम शक्ती आपल्यात असते आणि त्या प्रमाणे आपण वागू शकतो. या शक्तीचे ज्ञान लवकर होऊ नये म्हणून मानवाला मायारूपी अहंकार आहे. आपण विनाकारण यात अडकून राहतो. हा अहंकार क्षमण महत्वाचं, तो क्षमण्यासाठी देवाचे दर्शन घेणे आवश्यक आहे.
“अध्यात्म” म्हणजे शरीर. ज्या शरीराला ईश्वराची ओढ लागते. ईश्वर आहे हे मान्य असते. त्यालाच “अध्यात्म” असे म्हणतात. नामसाधनेनें प्रत्येक माणसात असणाऱ्या शक्ती प्रमाणे त्या भोवती वलय निर्माण होत असतात. ज्यांना अंतरंगातल्या ईश्वराचा साक्षात्कार झाला आहे, तेच ही तेजोवलय पाहू शकतात. संसार व व्यवहार या जंजाळातून ते विनासायास मुक्त होऊ शकतात. मानसिकतेच्या उच्च स्थिती पर्यंत जाऊन पोहोचू शकतात. म्हणूनच श्री रामदास स्वामी आपल्या मनाच्या श्लोकात म्हणतात…..
मना सदगुरुंचे नाम हे फार गोड ! तया गोडीला या नसे दुजी तोड !!
तया गोडीच्या काय वर्णू सुखाला ! मना चिंत तू सदगुरूच्या पदाला !!
समुद्रकिनाऱ्यावरची वाळू आपण कितीही घट्ट पकडण्याचा प्रयत्न करा ती हळुवार हातातून निसटून जाते. हात रीता होतो. माणसाला जडलेली नाती-गोती हि देखील अशीच असतात. कितीही घट्ट पकडण्याचा प्रयत्न करा….. निसटून जातात….. शेवटी एकाच नातं उरतं ते म्हणजे “देव आणि मानवाचं ” आपण या नात्यात समरसून जायचं, अद्वैत व्हायचं.
कलियुगात आपण जिवंत असेपर्यंत देव न्यायदान करतो असे म्हणतात. तुम्ही सात्विक गुणांनी जगा, कुणाचेही वाईट चिंतू नका, कुणालाही त्रास देऊ नका, कुणा मार्फतही त्रास देऊ नका, तुम्हालाही कुणी त्रास देणार नाही, न्याय नेहमी सत्याच्याच बाजूने राहणार. देव सगळी काळजी घेणार. तुमची चांगली कर्म तुमचं भविष्य घडवणार.
हे देवाचं नातं का दृढ व्हावं, त्यावर श्रद्धा का असावी ? तर आपल्याला वाईट वागायची बुद्धी होऊ नये. अनवधानाने जर एखादी वाईट चूक घडली तर ते प्रारब्ध भोग भोगण्याची शक्ती मिळावी, जीवनात काहीतरी आधार मिळावा, म्हणून ईश्वरावर श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे. देवाशी एकनिष्ठ राहण्यासाठी तत्पर राहा. कोणतेही अपराध करू नका, जमेल तेवढे देवाचे नाव घ्या, स्तुती करा. कधीही त्याला बोल लावू नका, अपशब्द बोलू नका. कारण तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द व केलेल्या प्रत्येक कृत्याची अप्रत्यक्षरीत्या त्या देवाच्या दरबारी नोंद होत असते, हे विसरू नका.
पाणी वाहता वाहता स्वच्छ होते. आरशावरील धुळीचे कण साफ केले तरच चेहरा नीट दिसतो. आपल्या मनाचेही असेच आहे. मनावर अनेक जन्माच्या दोषांचा ढीग साठला आहे. हा ढीग फक्त फक्त सत्कर्माने आणि ईश्वरी उपासनेनेच कमी करता येईल. जसजसा ढीग कमी होईल तशीतशी प्रगती होत जाईल. मग आपण उत्कर्षाच्या एका नव्या वाटेवरचे प्रवासी असू.
देव आहे आणि तो दयाळू आहे. आपल्याला मनुष्य जन्म मिळाला हि आपल्या गत जन्माचीच पुण्याई. जर आपण मनुष्य जन्माला येऊन धार्मिक किंवा पुण्य कर्म केले नाही, तर आपण एका मोठ्या कर्तव्याला मुकलो असे म्हणावे लागेल. त्याशिवाय पुढच्या पिढीसाठी पुण्याईची शिदोरी ठेवली नाही म्हणून म्हणून पुढच्या पिढीलाही दारिद्रयात खितपत पडावे लागेल. हे अपाय टाळण्यासाठी त्या विश्वकर्मा भगवंताचे समरण करा. वर्तनाला विनयची जोड द्या. म्हणजे अंधारातून इंद्रधनुष्याचे जसे सप्तरंग उलगडावे तसे आपले कर्तृत्व उजळून निघेल. यश हे सहसा मिळत नाही त्यासाठी ईश्वराची कास धरावी लागेल.
आता थोडा उत्तरार्ध पाहूया म्हणजे नाण्याची दुसरी बाजूही पाहूया. मरणोपरांत जीवन आणि देव यांच्यातील नातं. हा सर्व भाग जरा कल्पनाविलासातच मोडतो. वेद वचनानुसार आपले शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेले आहे, हे आपल्याला ठाऊकच आहे. मृत्यूनंतर या स्थूल देहाचे जेव्हा दहन केले जाते तेव्हा ते पुन्हा याच पंचतत्वात विलीन होते. अजून थोडा कल्पनाशक्तीवर जोर देऊया. आपल्या सामान्य बुद्धी नुसार आपले सत्कर्म स्वर्गात स्थान मिळवून देतात तर कुकर्म नरकात. या सर्वतोपरी सूत्रानुसार ईश्वराने निर्माण केलेला मनुष्यपर्णी हा शेवटी अनंतात म्हणजे त्या भगवंतात विलीन होतो. जशी कितीही वळणं घ्यावी लागली तरी नदी सागराला जाऊन मिळते.
शेवटी पुन्हा एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते. गोष्ट तशी खूप साधी आहे. स्वर्गात सुख का नांदते आणि नरकात दुःख? असं म्हणतात स्वर्गात आणि नरकात जेवणाची खूप मोठी भांडी असतात. आणि अन्नग्रहणासाठी खूप मोठे आणि लांब चमचे. मग या लांब चमच्याने एखादी व्यक्ती अन्नग्रहण कसे करणार? याच विचारात नरकातील व्यक्ती उपाशीपोटी समाधान शोधात आहेत. याउलट स्वर्गातील परिस्थिती सुखकारक आहे. तिकडे एकव्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला त्या लांब चमच्याने अन्न भरवते व नंतर ती दुसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीला अन्न भरवते, जेणेकरून दोघांचेही पोट भरते . हि चांगली बुद्धी होण्यासाठीच तर भाग्याचा ठेवा मोठा असावा लागतो. या आपल्या चांगल्या कर्माने स्वर्गात स्थान मिळवता येते. म्हणूनच सत्कर्म करा थोडेतरी पुण्य पदरात पाडून घ्या. संत सज्जनांचे विचार कायम ध्यानात ठेवा.
सत्कर्म योगे वय घालवावे |
सर्वामुखी मंगल बोलवावे ||
कृष्णार्पणमस्तू
@ अनुप साळगांवकर – दादर
April 4, 2021 at 9:54 pm
Khup chan bro
April 4, 2021 at 10:52 pm
Kupa Chan ahe
April 4, 2021 at 11:09 pm
अध्यात्म आणि आपण अतिशय मार्मिक सहज सुंदर शब्दामध्ये वर्णन केले आहे एवढा गहन विषय अत्यंत सोप्या समजेल अशा शब्दात सांगितलं आहे खूप खूप छान लेखनशैली धन्यवाद
April 4, 2021 at 11:10 pm
Sampurna maanav janma la arth dila Anup mitra.. tehi saral sadhya sopya shabdaat.. naam smaran ani niswarthi karma hve fkt.. parameshwara yogya tech deil ani bhar bharun deil..khatri patali tuzya ya lekha tun.. dhanyawad
April 5, 2021 at 11:59 am
या जन्मात सुखी रहायचे असेल तर अखंड ईश्वराचे नामस्मरण आणि त्या बरोबर चांगले विचार असणे गरजेचे आहे
फार सुंदर शब्दात मांडले आहे
वाचून मन फार प्रसन्न झाले
धन्यवाद
April 5, 2021 at 1:04 pm
Very nicely wrote by you the relation between humanbings and god. Keep writing…god bless you
April 5, 2021 at 10:50 pm
अद्वैत नातं देव आणि मानवाचं खुप छान शब्दात मांडले आहे 👌👌👌👌
April 7, 2021 at 8:55 pm
श्रीकृष्ण कुलकर्णी दि.7 एप्रिल 21
सत्कर्मयोगे वय घालवावे
सर्वांमुखी मंगल बोलवावे ।
ह्या समर्थ रामदास स्वामींच्या उक्ती प्रमाणे आपण अध्यात्म, ईश्वरनिष्ठा, भक्ती, प्रारब्ध, स्वर्ग, नरक ह्या सर्वांशीच परिचय करून दिला, चांगले समजून सांगितले आहे. वाचून आनंद वाटला
April 7, 2021 at 8:56 pm
सत्कर्मयोगे वय घालवावे
सर्वांमुखी मंगल बोलवावे ।
ह्या समर्थ रामदास स्वामींच्या उक्ती प्रमाणे आपण अध्यात्म, ईश्वरनिष्ठा, भक्ती, प्रारब्ध, स्वर्ग, नरक ह्या सर्वांशीच परिचय करून दिला, चांगले समजून सांगितले आहे. वाचून आनंद वाटला
November 18, 2024 at 7:18 am
Awaiting moderation
г‚·гѓ«гѓ‡гѓЉгѓ•г‚Јгѓ«гЃ®йЈІгЃїж–№гЃЁеЉ№жћњ – バイアグラ еЂ¤ж®µ г‚їгѓЂгѓ©гѓ•г‚Јгѓ«йЂљиІ©гЃ§иІ·гЃ€гЃѕгЃ™гЃ‹