उमलत्या नव्या क्षणांना
आहे आधार भावनेचा
बांधलीही मोतीमाळ
जी सांधणारा हात तुझा
एक मोती लाख सुखाचा
एक अतीव दुःखाचा
धागा जोडू पाहतो
एक बंध प्रेमळ मनाचा
सगळे तुझ्याच आवडीचे मोती
कसे एकसंग नांदत राहती
तुझ्या स्पर्शाच्या रंगात
दुधाळी शुभ्र रंगून जाती
स्वतंत्र आहे प्रत्येक मोती
आपुलकी ही जपू पाहती
हेवे-दावे, रुसवे फुगवे
ज्यांना स्पर्धा माहितच नाही
तुझ्या नजरेची जादू होते
माळ ही चमकत राहते
वेधून घेते सगळ्या नजरा
घायाळ मनाचा ठाव घेते
काय म्हणू या माळेला… ?
जी गळा घातली
कि श्वास होते
तु असण्याचा भास होते
एकटेपणी साथ होते
दुःखाचा आधार होते
कधी सांडलाच…..
मोती डोळ्यातून
कि टिपणारा
तुझाच हात होते.
Leave a Reply