भेट तुझी माझी
कारण नसतानाच घडलेली ….
माझ्याशी बोलताना
तू मात्र आवघडलेली ….
त्यानंतर ……….
ते रोजचंच तुझं दिसणं
आवडलं होतं मला
ते तू सोबत असणं ….
भेटीच्या गाठी पडाव्यात
असं राहून राहून वाटतं होतं ….
क्षण क्षण जपतां
आठवणींच तळं साठतं होतं ….
जन्म बांधता आला नाही
मन माझं बांधलं गेलं ….
का ?? कळेना तुझ्या विरहात
जगणं नशिबी आलं ….
आजही दूर तुला
नजर शोधत राहते
तू न दिसता
पापणी माझी भिजत राहते ….
ओलावल्या नजरेतून
जग दिसतं धूसर
सोपं का गेलं असेल
तुला म्हणणं ……
“आता मला विसर”
April 24, 2025 at 8:23 am
Awaiting moderation
nexium order online – buy generic nexium cost sumatriptan 25mg