पहाटे माजघरातल्या उंची फळीवर हळदीच्या कापडात गुंडाळलेली तीन शेंदूर फासलेली लिंबा सापडली तसो म्होरक्या गावभर बोंबलत फिरलो, “तात्यांच्या वाड्यावर कुणीतरी करणी केली.” तात्यांची जरब इतकी कि, सगळ्या गावात शांतता पसरली. भल्या पहाटे ह्या काय कानावर पडला म्हणून गाव नि:शब्द झालो. इकडे सगळो वाडो पटदिशी माजघरात गोळां झालो. हळदीच्या मांजरपाट कापडावरली फळीवरची ती लाल भडक लिंबा बघून घरच्यांची तोंडा पार सुकून गेली. तात्यांच्या उभ्या जन्मात वाड्यात असां काही अभद्र घडूक नव्हता. लागलीच आजीच्या झरझरणा-या डोळ्याक पदर लागलो.सगळे आजेक धीर देत होते. “काय होना नाय गे…… ” तेवढ्यात तात्यांनी आरोळी फोडली, त्यापुढे कुणाच्या तोंडून ब्र निघालो नाय. परसदाराच्या दिशेनं चार पावला टाकून, तात्यांनी जोराची हाक मारली, ” दिगू SSS ….. !!!!” केळीच्या बागेतून परसाआड लागलीच दिगू धावत इलो. तात्यांची भेदक नजर दिगूवर पडली. त्यांनी काहीही बोलूच्या आत दिगूनं माजघरात जाऊन पहिला आन पटदिशी ता हळदीचा कापड लिंबासकट गुंडाळला आणि दूर माळावर चालत सुटलो. सूर्य माथ्यावर येऊच्या आधी ती करणी माळावर जमिनीत खोल पुरूची होती. सगळा घर निपचित पडला.
कोकणच्या समुद्र किना-यावर कायरकरांचो ह्यो मोठ्ठालो वाडो, खाली- वर मिळून दहा खोल्ये. उठ-बस करुक पंधरा -वीस माणसां, दोन गडी, परसदारी तुळशीचा मोठ्ठा वृंदावन, त्या तुळशीत पाणी घालून भल्या पहाटे आजेनं श्रद्धेनी खोवलेली आगरबत्ती वाडाभर दरवळूची. सगळो वाडो सांजेला दिव्यांनी मंदिरासारखो उजळून जाऊचो. दिसभर आडावर कुणी ना कुणी पाणी काढत असायचा. कळशी पाण्यात पडूची तेव्हा धबकन पाण्याचो आवाज होऊचो. केळीच्या बागेक पाणी दिला कि तांबड्या मातीचो सुवास नाकात घर करून रवचो. तात्या इले कि व्हरांड्यात झोपाळ्यावर पाय सोडून झुलत रवचें. झुल्याचो कर्रर्रर्रर्रर्रर्र……. कर्रर्रर्रर्रर्रर्र…… आवाज कान पोखरुचो. वाड्या भोवतालची नारळी पोफळीची झाडे वाड्यावर सावली धरूची…… दिसभर सळसळ करुची. गौरी – गणपती, दिवाळ सणांका वाड्यात हि वर्दळ उचंबळूची. गावातली कोण न कोण सतत वाड्यावर येऊंची. सण असो नसो आजेनं कुणाक गोडधोड कधी कमी पडून दिल्यानं नाय. आजीचो देवाधर्मावर खूप विश्वास. सगळा आपणहून करुची, देवघरातली रोजची पूजा, मूळपुरुष – राखणदाराचो मानपान …… सगळाच थोरल्या पोराबाळांकडून करून घेऊंची. दर अमावस्येक मूळपुरुषाचो मान कधी चुकलो नाय. त्या दिवशी तिन्हीसांजेक आजी आठवणीनं तात्यांच्या हातात शेंडीवालो नारळ ठेऊची. तात्या थोरल्याक सोबत घेऊन वेशीवर जाऊन पूजा करून, नारळ अर्पण करून यायचे. आजीक देवाधर्माचं करण्यास कुणी पोरानं नकार दिलो की, “पूर्वापार पिढ्यान पिढ्या चलत इला सगळा … करुकच लागतला. त्याशिवाय पूर्वजांचे आशिर्वाद मिळूचे नाय…… “ असं दामटवून म्हणायची. कुणी न सांगता आपणहून देवाक एक फुल जरी वाहिला तर “शाणा माझा बाळ ता ” असं म्हणून डोक्यावर हात फिरवून खडखडे लाडू हातावर ठेवची. अशा या पुर्वजांच्या वास्तव्यानं पवित्र झालेल्या वाड्यात, भरल्या घरात ही अशी दळभद्री घटना घडली ज्याने सगळे अस्वस्थ झाले. प्रत्येकाच्या डोळ्यांत ती लिंबावरली लाल भिती दाटून रवली.
श्री. भगवान दामू कायरकर हे गावातील प्रतिष्ठित उंचपुरी व्यक्तिमत्व. पांढरा हातासरशी धोतर, पांढरो शर्ट त्यावर काळो कोट, डोक्यावर काळी टोपी. पायातली कोल्हापुरी चर्रर्रर्र ….. चर्रर्रर्र…. आवाज करायची. त्या आवाजाने दुरूनही तात्या येत असल्याची वर्दी मिळायची. कुणी वाटेत त्यांच्या समोर उभो रवचो नाय. यांच्या करारी स्वभावामुळे गावात वाड्याकडे वाकड्या नजरेने बघूची आजतागायत कुणाचीही हिम्मत होऊक नाय. या एका घटनेने वाड्यातील वातावरण पार ढवळून निघाला होतां या मात्र खरां. दिनूला काम सांगून घराबाहेर पडलेले तात्या त्या दिवशी दुपार झाली तरी जेवूक इले नाय. दुपारची उन्हं पार अंगणात इली. आजी काळजी करूंक लागली. सकाळी जा पहिला त्याची भीती आणि तात्यांची काळजी तिच्या डोळ्यांतून ओसंडून वाहत होती. इतक्यात अंगणात तात्यांच्या चपलेचो आवाज इलो चर्रर्रर्र ….. चर्रर्रर्र…. आजी लगबगीनं दारात उभी रवली. तात्या चप्पल काढून घरात पाऊल टाकताच आजी पदरानं डोळे पुसून म्हणूक लागली “ह्या कायता बघूक व्हया…. पोराबाळांनी भरलेल्या घरात ह्या असा अभद्र घडलां ……. तां उतरवूचा लागतलां….. मनातली मळभ गडद होऊच्या आधी वेळीच साफ करुक व्हई. माका ह्या काय सादा दिसना नाय….. पोरा पण भेदरली हतं …… कुणाचा जेवणात लक्ष नाय …… .. कुणाचो तरी डोळो हा …….. या वाड्यावर …. … आपल्या सुखावर. ”
आजीच्या शब्दाक प्रमाण मानणारे तात्या एकाएकी गरजले ”कुणाचे डोळे फिरले हत …….. !!! कुणाचा मरण जवळ इला हा ….!!!! तां मी बरोबर बघतयं……. ” तात्या गरजून आल्या पावली न जेवताच घराबाहेर पडले. वेशीवरल्या गूरवाक बखोटीला धरून घेऊन इले. सामानाच्या पोतडीसकट गुरव तातडीनं इलो, सगळो वाडो निपचित पडलो होतों…. … घरचो वासों न वासों शांत उभो होतों…… घरची कुत्री आडाजवळ जाऊन बसली होती…… कुणी कुणाक एक शब्द बोलूक नाय….. गुरवानं घरभर फिरुन अंगारे फुंकून कसलोतरी मंत्र पुटपुटलो. आजीकं कायतां सांगून माडीवच्या फळीवर केळीच्या पानात मूदभर भात, हळद पिंजर भूकटी आणि मुठभर अभिर लावून शेंडीवालो नारळ ठेवलो. सगळ्यांका परसात बोलावणा घाडलां. वाड्यातले सगळेच जिवाच्या भीतीनं परसात जमले. गुरव तात्यांजवळ कयो बोलत होतो. सगळ्यांका परसात बघान म्हणालो “आज सांजेपातूर कुणी घराबाहेर जाऊचा नाय……. ह्यो फेरो फार वाईट हां…… सगळा परतून लावूक लागतला…… सांज झाली की दार लावून घेवा…. कितीपण महत्वाचा झाला तरी उद्या पहाटे कोंबडो आरवल्या शिवाय दार उघडूचा नाय.” अशी सक्त ताकिद देवून गेलो. गुरवाची पाठ फिरल्यावर तात्या आवेगाने आजीला म्हणाले, “सकाळ पातूर धिर धरा…….ज्या कुणी ह्या केला हां…….ही करणी त्यावरचं उलटतली…… तळतळाट होतलो……मेलो जिवानीशी जातलो…….”
सांजेच्या आधी थोडं लवकरच जेवणांवळ आटपून वाड्याचा दार टर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र……. बंद झालां. सकाळपातूर सगळी घरातच होती पण, तात्यांचो विश्वासातलो नोकर दिगू माळावरुन परतलोच नव्हतो. सकाळपातूर ती करणी पुरूचा नि दुसरा तां माडावरुन नारळ उतरवूचा काय तां काम काढलां होतां. आज्येपाठी सगळ्यांका त्याची काळजी. आजेक तर पोरांसारखोच दिगू. दीड दोन वर्षाचो होतो. तात्यांचो हात घट्ट धरून ह्या वाड्यात इलो. काळो सावळो, अंगात फाटकी बंडी, कमरेतल्या करगोट्याक घट्ट केलेली छोटी पॅन्ट. आजेक पोराचो लळो लागलो. लहानाचो मोठ्ठो ह्याच वाड्यात झालेलो. तात्यांचो त्याच्यावर लई जिव. सगळी कामां अगदी न सांगता वेळच्या वेळी करुचो, तात्यांका कसल्याच कामाची कधी आठवण करुन देऊची गरज पडूक नाय. सकाळी परसातली झाडलोटीची सगळी कामा, वाणसामान, गुरां- ढोरां, पत्रा-पोचपावते सगक्याकडे कटाक्षान लक्ष असायचां. वाड्याचो कामाचो भार त्या एकट्यामुळे अगदी हलको होऊन जाऊचो. पायाक नुसती भिंगरी लागलेली. त्याका कधी कुणी शांत बसलेला बघितला नाय. आज वाड्यावर हि भयाची सावली असताना घरात त्याच्या या न येण्यांन आजीक कसासा झाला. कुणाचा कशात लक्ष नाय. तात्यांचो पण रातभर डोळ्याक डोळो नाय. आजी तर नुसती अंथरुणार पडून , “दिगू….. दिगू….. दिगूक घेऊन यवां….. दिगूक शोधा……” म्हणून पुटपुटत रवली. घरातले सगळे आजीक शांत करी होते. ही रात्र सहजा सहजी सरुची नाय, घड्याळाकं तर काय धाड भरली होती जाना कोनं…..???? घड्याळ बाराचे ठोके देवून जा थांबला तां पुढे चालूकचं नाय, त्या ठोक्यां पाठोपाठ मांजरा दात विचकावत रडू लागली तशी घरच्यांच्या आंगावरुन ही शिरशिरी धावली…… व्हरांड्यातल्या झुल्याचो कर्रर्रर्रर्रर्रर्र……. कर्रर्रर्रर्रर्रर्र…… आवाज…. शांतता चिरून डोळे मिटूक देत नव्हतो ……. तेवढ्यात धाड … धाड … धाड … धाड …दारावर थाप पडली. “माझो दिगू इलो . … ” म्हणान आजी दाराकडे धावली. आजेपाठी तात्या धावले. त्यांनी आजेक हाताक धरून मागे खेचले आणि जोरात खेकसले “कायो झाला तरी दार सकाळ पातूर उघडूचा नाय …… ” तात्यांकडे बघान आजेन कपाळावर हात मारलो. भिंतीक टेकून जमिनीवर धबकंन बसली.
रातभर सगळ्यांचे डोळे सताड उघडे….. पंख्याची घरघर -हदयाचे ठोके मोजीत व्हती…… रातभर ह्योच खेळ….. म्हणता म्हणता अचानक झुल्याचो कर्रर्रर्रर्रर्रर्र……. कर्रर्रर्रर्रर्रर्र…… आवाज कानाजवळ येईनासो झालो …. पंख्याची घरघर थांबली …… घड्याळ चालू झाला …… चारचे चार ठोके पडले ट्यंग …… ट्यंग …… ट्यंग …… ट्यंग …… तेवढ्यात कोंबडो , ” काँ.. क…काँक…. कँक……” एवढ्या जोरानं ओरडलो की सगळे दचकान अंथरुणातून ताडकन उठान बसले. तात्या आणि आजी पाठोपाठ अख्खो वाडो दारापाठी जमलो. तां सागवानी दार, त्यावरची लाकडी कडी, त्या पाहाटेच्या अंधारात आजीनं हाती घरलेल्या कंदिलाच्या उजेडात तात्यांकां स्पष्ट दिसली, तात्यांनी नजरेचो एक कटाक्ष आजीकडे टाकलो…… एक जोराचो श्वास उरात भरलो ….. आन दाराची कडी सरकवून दार जोरान बाहेर ढकललां. टर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र……. जस्सा दार उघडला ……… तशी थंड वा-याची झुळूक सर्रर्रर्रर्रर्रर्र……. सर्रर्रर्रर्रर्रर्र……. करत वाड्यात घूसली…..वाऱ्याचा वेगानं सगळ्यांचे डोळे मिटले….. इतको त्या वा-याचो वेग…. ठापकन कंदिल पडून जागीच फूटून विझलो…….. डोळे किलकिले करून सगळ्यांनी पहिला .. …. सगळीचं मंडळी जागीच थबकली …… कुणाचोच पाय उंबरठ्या बाहेर पडूक नाय……. इतक्या थंड वाऱ्यावर तात्यांच्या कपाळातून घामाचे टप …… टप …… दोन थेंब जमिनीवर पडले……..आजीनं पदराचा बोळकां तोंडात कोंबला…….डोळे विस्फारुन सगळी परसात पाहू लागली……सुन्न नजरेनं ……… नि:शब्द देहानं…… परसात आक्रीत घडला होतां…. तुळशी शेजारचा अंगण लाल रंगानं रंगला होतां….. करणी उलटली होती……. गुरवाचा म्हणणा खरा ठरला होता …… ह्यो परसात रक्ताचे उलटे करुन …… त्या रक्ताच्या थारोळ्यात …… डोळे हे आभाळात चढवून….. एका हातात अभिर फासलेल्या नारळाची शेंडी धरुन……मान मोडून…… तोंडाचो आ वासून…….दिगू पडलेलो होतो. निश्चल……. निपचित…….
****************************************************
As three lemons wrapped in a yellow cloth were found on the high floor of the toilet, Mhorakya wandered around the village, bombing, “Someone did something to Tatya’s house” The mouths of the people here were very dry. In Tatya’s vertical birth, there are some indecent incidents like this in the house. Grandma’s teary-eyed eyes widened. The whole family was packed in the toilet.
This is a big mansion of cowards on the beach, get up and take 15-20 people, Vrindavan of the backyard Tulsi, the agarbatti that was dug with faith in the morning by pouring water in that Tulsi is burning all over the mansion. The whole palace was lit up in the evening like a temple. In the palace, which was sanctified by the presence of such ancestors, in a crowded house, such a violent incident took place which filled everyone’s eyes with red fear.
Due to the contractual nature of Mr. Damu Kayarkar, no one would dare to look at the house with a crooked eye. It is true that this incident had shaken the atmosphere in the palace.
Grandmother began to say, “Let’s look at this work, if this kind of indecent thing happened in a house full of children, we had to get down, we had to clean our minds in time before it got dark.” Assuming her grandmother’s words, “Someone’s death is near … !!!! I see you right” Tatya rushed out of the house. I dared to call the Gurav at the gate.
Gurav immediately fell down with the luggage, the whole house members were gathering on the ground, the house was standing quietly. The house dog was sitting nearby. Someone say a word. Gurav walked around the house, blew embers and muttered mantras. After telling the story, we put a handful of rice, reddish-yellow powder and a handful of abhir in a banana leaf on the Madi plate and put a handful of coconut. Everyone was shouting in the backyard, “No one is going out of the house this evening. It’s too bad. Yes, in the evening, close the door. No one can open the door without the rooster crowing.” We went with such a strong warning.
After turning her back on Gurav, Tatya impulsively said to Aji, “Be patient in the morning ……. whoever did this ……. this deed was reversed on it …… I went he should die ……. “
The door slammed shut before dinner. However, Tatya’s faithful servant Digu did not return from the hill. What was the point of unloading coconuts from tree in the morning? Everyone cares about him. The little one grew up in this house. Lives on Tatya. Let’s do all the work on time without even mentioning it, Tatya never needs any remembrance of God. In the morning, I used to pay close attention to all the work in the backyard, goods, cattle, letters. The workload of the house would be lightened by that alone. His absence did not last long. Just lying in bed, “Digu ….. Digu ….. Let’s take Digu ….. Find Digu ……”
Tonight is a very easy time, why should the clock be full ….. ???? The clock struck twelve and stopped, then Chaluk’s hero started chasing after those beats, just like a cat started gnashing its teeth and started running from the body of the family ……
Everyone’s eyes were wide open ….. The fan was humming – the heartbeat was counting …… All night long, while playing the same game, all the sounds suddenly came to my ears …. At that moment, the cock, “Kaan .. K … Kank. … Kank …… “I shouted so loudly that everyone sat up in bed. Tatya and Aji followed the whole gathering at the door. The teak door, the wooden latch on it, in the darkness of that morning, in the light of the lantern that Aji held in her hand, Tatya was clearly visible, Tatya glanced at Aji and pushed the door hard and ………
As soon as the door was opened, a gust of cold air crept into the castle …..
The fast lantern of that wind burst on the spot ……..
Everything stumbled on the spot, no one’s feet fell out of the threshold ……. Two drops of sweat fell on the ground from Tatya’s forehead …….. ……
dry eyes ……… empty body ……
It would have happened in the backyard ….
The courtyard would have been red …..
The deed was reversed …….
By inverting this blood, in that pool of blood, by raising the eyes to the sky ….. holding the coconut shend in one hand …… breaking the neck …… licking the mouth ……. digu Was lying.
Immobile
Absolutely …….
Karmanya Gati Bodhavyam .. !!!
© श्री. अनुप अनिल साळगांवकर salgaonkar.anup@gmail.com
January 14, 2025 at 11:37 pm
Awaiting moderation
amoxil pill – amoxicillin without prescription ipratropium 100mcg without prescription