आपलं नातं म्हणजे
आहे चवदार पाणीपुरी
तिखट, गोड, आंबट, तुरट
जिभेला चव येते न्यारी
जास्त पाणी भरता जशी
कोलमडून पडते पुरी
नात्याचंही तसंच काहीसं
ते जपण्याचीच कसरत खरी
उतावीळपणे घाई करता
तिखटाचा हा जातो ठसका
भांडण, तंटा, रुसवे, फुगवे
नात्यात थोडा मारू मस्का
सगळे जिन्नस प्रमाणात असता
जिभेवर चव रेंगाळते भारी
आपलेपणाने वाद घालायलाही
संवादाचीच गरज खरी
“अरे, तिखा कम करो !”
भैयालाही देऊ दम
तुझ्या माझ्या नात्यात राहूदे
थोडी ख़ुशी, थोडा गम
नात्यात नसतं तुझं माझं
वाटून खाऊ मसाला पुरी
एकमेकांना समजून घेतले
तरच टिकेल नाते निरंतरी
© अनुप साळगांवकर
May 18, 2025 at 6:59 am
Awaiting moderation
ondansetron for sale online – buy zocor 10mg online cheap zocor for sale online