दिनांक. २२ मे २०२०
अनेक विचारांच्या झंझावातात साधारण सायंकाळी ७. ३० वा. मांडी घालून, भिंतीला पाठ टेकून घरात बसलो होतो. एक अर्ध्या तासापूर्वीभाच ऑफिस मधल्या दोन सहका-यांचा फोन येऊन गेला. त्यांच्याशी बोलून झाल्यानंतरच या लॉकडाऊनच्या काळात पुढे काय वाढलंय याची प्रचंड चिंता आतून मन पोखरत होती. नोकरी सांभाळायची कशी ? आपली काळजी कशी घायची ? रेल्वे चालू होणार का ? मुंबईत प्रचंड गर्दीचा सामना कसा करायचा ? असे ढीगभर प्रश्न …… फक्त प्रश्नच. याच विचारात गर्क असताना अचानक त्यांचा फोन आला. परममित्र “श्री. किशोर.”
या लॉकडाऊनच्या पहिल्या प्रहरात पहिल्यांदा आमची फोनवरच ओळख झाली. माझं ” जय गिरनारी” हे पुस्तक वाचून त्यांनी मला फोन केला होता. पुस्तक आवडल्याचा त्यांचा अभिप्राय मला फार आवडला होता. सहासा अभिप्राय कळवला कि व्यक्ती पुन्हा फोन करत नाही, पण त्या दिवशी त्यांचा पुन्हा फोन आला, “कसे आहात ?” म्हणून चौकशी पासून सुरुवात झाली. मला म्हणाले, ” खूप दिवस झाले तुमची विचारपूस केली नाही. सध्या मुंबईचं वातावरण बरं नाही. तुम्ही फार नकारात्मक विचार करत असाल, मग म्हटलं तुम्हाला थोडी सकारात्मक ऊर्जा देऊया.” त्यांचं बोलणं मला फार आशावादी वाटलं. माझ्या घरातल्या माणसांची, माझ्या नोकरीची आणि एकूणच मुंबईच्या परिस्थितीची त्यांनी आपणहून आपलेपणाने चौकशी केली. “आपला देवावरचा विश्वासचं आपली इम्युनिटी आहे.” आणि “ज्या लोकांची कर्म चांगली आहेत तीच या महामारीत टिकून राहतील” हे त्यांचे शब्द माझ्या मन पटलावर कायमचे कोरले गेलेत.
मी ही त्यांची, त्यांच्या उपविजीविकेच्या साधनांची चौकशी केली. त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली त्यावर ते म्हणाले,” हो…. हो…. आपण नक्की भेटणार अनुपजी.” आपली काळजी आपल्यापेक्षा जास्त करणाऱ्या अशा व्यक्तीला भेटण्याचा मोह मलाही झालाय. पुढे म्हणाले, ” गेले अनेक दिवस तुम्ही एक गोष्ट करत नाही आहात …… ?” मला हा प्रश्न नीटसा कळलाच नाही. त्यावर त्यांनी मला एक मोलाचा सल्लाही दिला म्हणाले, ” उद्यापासून रोज कपाळावर अंगारा लावत जा. तुम्हाला नक्की प्रसन्न वाटेल.” मी त्यांना अंगारा नक्की लावेन म्हणून आश्वस्त केलं आणि फोनवर त्यांचा निरोप घेतला. त्यांच्याशी बोलून मनाला एक आत्मिक समाधान वाटलं. मन शांत झालं. सगळे प्रश्न मागे पडले. आता शरीराच्या प्रत्येक नसांमधून धावत होती ती सकारात्मक ऊर्जा. दिवस त्यांनी दिलेल्या देवावरच्या विश्वासाने संपला.
सकाळी ७. ०० वा. उठलो. “कराग्रे वसते …… ” करून हात चेहऱ्यावरून फिरवला आणि कालच्या श्री. किशोर यांच्या फोन वरच्या संभाषणाची त्यातल्या एक एक शब्दाची उकल झाली …… अगदी साक्षात्कार झाल्यासारखी. पहिली गोष्ट मी एकटा बसून नकारार्थी विचार करत होतो हे ते नाशिकला इतके दूर रहात असताना त्यांना कसं समजलं ? आणि दुसरी गोष्ट मी दादरला समर्थांच्या मठात लॉकडाऊन पूर्वी रोज जात होतो. त्यामुळे मठातून निघताना स्वामींचा अंगारा आपसूकच कपाळावर सकाळीच लागला जायचा. मन प्रसन्न व्हायचं. लॉकडाऊन सुरु झालं आणि अंगारा लागणं बंद झालं. माझ्याही लक्षात आलं नाही. पण मी अंगारा लावत नाही हे त्यांना कसं समजलं ? हे दोन प्रश्न …… हेच दोन प्रश्न माझा देवावरचा विश्वास अजून दृढ करून गेले. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं सापडली पाहिजेत असं नाही काही प्रश्न हे अनुत्तरीत राहीलेलेच चांगले असतात. मी ऋणी आहे श्री. किशोर यांचा आणि त्यांनी माझ्यात निर्माण केलेल्या विश्वासाचा कारण खरंच, “आपला देवावरचा विश्वास हीचं आपली इम्युनिटी आहे.”
शुभं भवतू… … कल्याणमस्तू
***************************************************
In the storm of many thoughts, in the evening 7. 30th I was sitting in the house with my knees bent and my back to the wall. About half an hour ago, two colleagues in the office got a call. After talking to them, I was worried about what would happen next during this lockdown. How to handle a job? How to take care of yourself? Will the train run? How to face the huge crowd in Mumbai? Lots of questions just questions. Suddenly, his phone rang. Parammitra “Mr. Arjuna.”
We first met on the phone during the first episode of this lockdown. He had called me after reading my book “Jai Girnari”. I really liked his feedback on the book. Sahasa commented that the person was not calling again, but that day he got another call, “How are you?” So began the inquiry. He said to me, “I haven’t thought about you for a long time. The atmosphere in Mumbai is not good at the moment. You may be thinking very negatively, so I said let’s give you some positive energy.” I found him very optimistic. He inquired about my family members, my job and the situation in Mumbai as a whole. “Our faith in God is our immunity.” And his words “Only those whose deeds are good will survive this epidemic” are etched on my mind forever.
I inquired about them, their means of subsistence. Asked to meet him, he said, “Yes हो. Yes…. We will definitely meet Anupji.” I am also tempted to meet someone who cares more than you do. He continued, “You haven’t been doing one thing for the last several days, have you?” I did not understand this question properly. He also gave me some valuable advice, saying, “Put embers on your forehead every day from tomorrow. You will definitely feel happy.” I reassured them that I would definitely light the embers and said goodbye to them on the phone. Talking to them gave me a sense of spiritual satisfaction. The mind became calm. All questions fell behind. Now that positive energy was running through every vein of the body. The day ended with their faith in God.
7 in the morning. 00 hrs. Got up He turned his hand away from his face and said, “Karagre vasate om”. One of the words of Arjun’s phone conversation was solved …… just like an interview. The first thing is that I was sitting alone and thinking negatively, how did he understand that he was living so far away from Nashik? And secondly, I used to go to Dadar every day before the lockdown at Samarth’s monastery. Therefore, when leaving the monastery, Swami’s embers would automatically fall on his forehead in the morning. I want to be happy. The lockdown started and the embers stopped burning. I didn’t even notice. But how did they know I wasn’t burning? These two questions …… these two questions further strengthened my faith in God. Not all questions need to be answered. Some questions are better left unanswered. I am indebted to Mr. The reason for Arjun and the faith he created in me is really, “Our faith in God is our immunity.”
Shubham Bhavatu…… Kalyanmastu
June 20, 2020 at 5:15 pm
Khup chan aahe vachun khup masta vatate masta mahiti aahe
November 22, 2024 at 8:11 am
Awaiting moderation
гѓ—гѓ¬гѓ‰гѓ‹гѓі её‚иІ© гЃЉгЃ™гЃ™г‚Ѓ – г‚ўг‚ёг‚№гѓгѓћг‚¤г‚·гѓі её‚иІ© гЃЉгЃ™гЃ™г‚Ѓ г‚ўг‚ёг‚№гѓгѓћг‚¤г‚·гѓі гЃ©гЃ“гЃ§иІ·гЃ€г‚‹