गोल गरगरीत
माव्याचा गोळा
रंग दुधाळी
दिसायला भोळा

पिठ मळताना
थोडं घालू दूध
पाकाला साखर
फक्त चार मुठ

मंद अलवार
परतू तुपात
गुलगुलेल गोळा
बदामी रुपात

पाकात घालू
जायफळ वेलदोडा
मूरु दे सावकाश
धीर धरा थोडा

इतर मिष्ठान्नावर
याचाच धाकटया
याला पोहायला
एकतारी पाक

विसरु डाएट
करु क्लुप्ती
खाऊ मनभर
मिळवू तृप्ती

चवीने चाखून
विसराल दाम
नाव तयाचे
गुलाबजाम
©अनुप साळगांवकर