नुकतेच काही कलाकारांचे इंटरव्हू घेतले होते. इंटरनेटवर प्रसिद्धही झाले होते. रोजच्या रडगाण्याला कंटाळून संध्याकाळी मी एका प्रेसच्या पार्टीत गेलो. कदाचित् माझं असं अचानक जाणं आणि “ते” भेटणं विधीलिखीतच होतं. त्या दिवशी पार्टीत “ते” अगदी सहज भेटले, समोर येऊन हॕण्डशेक करत म्हणाले, “क्या अनुपजी…. कैसे है….!!”
“बहोत खुशनसीब” मी लागलीच उत्तरलो.
मी कधीही ह्या असल्या…. असल्या काय कसल्याच ……..पार्ट्या अटेंड करत नाही. मन रमत नाही हो …….दूसरं काय ? पण अशा एखाद्या पार्टीत ऋषी स्वतः येवून तुम्हाला हात मिळवतात……. तुमच्याशी आपलेपणानं बोलतात….. म्हणजे आपलं नशीबचं……नाही का ??
आमच्या थोड्या इकडच्या -तिकडच्या गप्पा झाल्यावर सहज म्हणाले, “माझा इंटरव्हू साधारण कितव्या नंबरवर आहे तुमच्या यादीत??” मी अकस्मात त्यांच्या या प्रश्नानं खुपच गांगरुन गेलो, अगदी मिश्किलपणे हसलो आणि म्हणालो, “हे काय… आत्ता करुया.”
मी प्रसंगावधान राखत हाताची मुठ बनवून तयार केलेल्या माईकवर त्यांना प्रश्न विचारला, “तुम्ही नक्की कोण आहात.??” त्यावर दिर्घ श्वास घेऊन त्यांनी एक उसासा सोडला, माझ्याकडे क्षणभर निरखून पाहीलं, माझा हा प्रश्न यांना नक्कीच समजला नसणार म्हणून मी समजवून सांगणार इतक्यात त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य पसरलं आणि म्हणाले, “मी….. मी एक चैतन्य…….त्याच चैतन्याचं सत्य आहे….. बाकी सर्व भास……..स्वप्न…. स्वप्नातील स्वप्नच……” या त्यांच्या एका ओळीनेच मी चमकलो, गारुड झाल्यासारखा मनाचे कान करुन ऐकू लागलो, ते पुढे म्हणाले, ” मी त्या परमेश्वराच्या पिच्चरमधला एक साधासा नट आहे, त्यानं लिहीलेल्या संहीतेतील एक छोटं पात्र, जे संवाद वाट्याला आले तेच म्हणायचे, उत्तम अभिनय करायचा, सगळ्यांची मनं जिंकायची, हश्या- टाळ्या घ्यायच्या आणि पडद्यावर द ऐंड झळकलं की निघून जायचं. यात सगळ्यात महत्वाचं काय…? यात महत्त्वाचं जर काही असेल तर तो आहे उत्तम अभिनय मग तुमच्या वाट्याला आलेली ती भुमिका कोणतीही असो…..पडद्यावर कृष्ण कंसाला छातीवर मुष्ठी प्रहार करुन बेदम मारत असेल, पण पडद्यामागे कंसच कृष्णाचा सख्खा बाप असेल, पातिव्रत्य सिद्ध करण्यासाठी सीतेनं अग्नीपरीक्षा दिली खरी, पण पडद्याआड सीतेचं रावणावर निस्वार्थ प्रेम असेल, दुश्शासनाची मांडी फाडून त्याच्या रक्ताने द्रौपदीचे केस धुणारा भिम हा पडद्याआड दुश्शासनाचा एकमेव जिवलग मित्र असेल…….हा मधला पडदा फार महत्वाचा. ज्ञान आपल्या प्रत्येकात आहे. फक्त हा अज्ञानाचा पडदा जरा सरायला हवा. तो सरला की, आपल्या आतला लख्ख प्रकाश आपल्याला आतून हजारो सुर्य तळपल्याचा अनुभव देईल….. तो अनुभव गाठीशी असणं महत्वाचं”
“अभी आया…. मिलेंगे जरुर” कुणीतरी आवाज दिला तसे ते समोरुन निघूनही गेले. मी मात्र तसाच काही क्षण…. स्तिमित…..भारावलेला….
मला असे अचानक भेटलेले “तुम्ही नक्की कोण आहात ??” या माझ्या प्रश्नाचं, माझ्या सगळ्या अपेक्षांना छेद देणारं उत्तर मला देणारे तुम्ही….. म्हणजे नक्कीच ……… “ऋषीमुनी.”
© श्री.अनुप साळगांवकर
Some artists were interviewed recently. Some of them were even published on the internet. Tired of the daily cries, I went to a press party in the evening. Maybe it was legal for me to go and meet * “them” all of a sudden. That day at the party * “they” * met very easily, came forward and shook hands and said, “Kya Anupji …. kaise hai …. !!”
“Very happy,” I replied immediately.
I never attend parties, no matter what. I don’t like it ……. what else? But in such a party, * Rishi Kapoor * comes himself and gets his hands on you ……. he talks to you with affection ….. I mean your luck …… isn’t it ??
After a few chats, he simply said, “What is my interview number on your list?” I was overwhelmed by their sudden question, smiled mischievously to pass the time and said, “What the heck … let’s do it now.”
I asked him a question on the mic, which was made by making a fist, * “Who exactly are you. ??” * He took a deep breath and let out a sigh. Suddenly a smile of satisfaction spread on his face and he said, * “I ….. I am consciousness ……. the same consciousness is true ….. Dreams …….. Dreams …. Dreams in a dream …… “* I shined with one of his lines, I started listening with my mind’s ear as if it was a garuda, he further said, “I am one of the pitchers of that Lord He is a simple actor, a small character in the code he wrote, he used to say whatever dialogue was shared, he used to act well, he used to win the hearts of everyone, he used to laugh and clap and when *The End * flashed on the screen, he would leave. What is the most important thing …? If there is anything important in it, it is * excellent acting * then whatever the role you are assigned to ….. on the screen, Krishna is punching Kansa in the chest, but behind the screen, Kansa is probably Krishna’s father. It is true that Sita passed the fire test to prove her integrity, but behind the curtain, Sita will have selfless love for Ravana. Tearing Duryodhana’s thigh, Draupadi of blood behind the curtain of hair wash, Bheem is the only middle of the screen pal ……. duryodhana very important. * Knowledge * is in each of us. Only this veil of ignorance should be removed. He said that the light inside you will give you the experience of thousands of suns shining inside you ….. It is important to have that experience with the knot ”
“Abhi aaya …. milenge jarur” I was just a few moments …. stunned ….. overwhelmed ….
All of a sudden I met * “Who exactly are you ??” * The answer to my question, the one that pierced all my expectations, the one that gave me a smile ….. I mean, of course ……… * “Sage.” *
© Mr. Anup Salgaonkar
salgaonkar.anup@gmail.com
January 18, 2025 at 6:37 am
Awaiting moderation
order accutane 20mg pills – order zyvox pill buy zyvox without a prescription