इंद्र देवाच्या दरबारात दोन गंधर्व गायक होते. दोघेही आपापल्या सुरांचे पक्के आणि गाण्यात तरबेज. दोघांकडे सुरांची अशी काही जादू जी समोरच्याला मंत्रमुग्ध करेल, इंद्र दरबारी दोघे अप्रतिम गाणं सादर करायचे. दरबारातीलच नाही तर स्वर्गलोकीचे सर्व देवही भान हरपून त्यांचं गाणं ऐकायचे दोघांचाही देवलोकी भरपूर कौतुक व्हायचं.
त्या दोघांत फक्त एक फरक होता, तो असा कि एक गंधर्वगायक रंगाने कळा आणि एक गोरा. त्यातल्या गोऱ्या गायकाला स्वतः च्या दिसण्याचा, मिळणाऱ्या सन्मानाचा फारच अभिमान झाला. हाच अभिमान हळू हळू गर्वात बदलला. स्वतःपुढे तो सर्वाना कमी लेखू लागला, पदोपदी सर्वांचा अपमान करू लागला. याउलट काळ्या रंगाचा गायक फारच शांत आणि सुस्वभावी होता. एक दिवस इंद्रदेवाने त्या दोघांची एकदा परीक्षा घ्यायची ठरवलं. राजगायकाच्या पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी दोघांनाही दरबारात बोलावून घेण्यात आलं. जो गायक आपल्या गाण्याने धरती मातेला प्रसन्न करेल त्याला राजगायकाचे पद, सन्मान आणि इच्छित वर देण्यात येईल अशी घोषणा झाली.
सुरांची मैफिल सजली आणि या दोघात स्पर्धा रंगली. तबल्यावर थाप पडली, सतारीवर साज चढला तसे दोघांचेही सूर लागले. दोघांपैकी कुणीच माघार घेईना.
गोऱ्या रंगाच्या गंधर्व गायकाच्या गळ्यातून अहंकाराने बाहेर पडलेले उग्र सूर धरतीवर वणव्या सारखे पसरले, अनेक झाडे जळून खाक झाली, वृक्ष उन्मळून पडले आणि धरतीला तडे जाऊ लागले.
या उलट काळ्या रंगाच्या गंधर्व गायकाचे शांत सूर आभाळाला भिडले, आभाळ दाटून आले आणि पावसाच्या सरींनी धरती सुखावली.
निर्विवाद काळ्या गायकाला राजगायकाचा सन्मान मिळाला आणि गोऱ्या गायकाचा अहंकार धुळीला मिळाला. इंद्रदेवाने धरतीची विडंबना केलेल्या गोऱ्या गायकाचे पांढरे ढग तयार केले. जे आजही उन्हात उभं राहून आपल्या अहंकाराचं प्रायश्चित करत आहेत. याउलट काळ्या गायकाचे देवाने काळे ढग तयार केले जे आजही आभाळी दाटून येतात, गडगडून सूर छेडतात, मनसोक्त बरसतात आणि सृष्टीला शीतलता प्रदान करतात.
म्हणूनच मित्रहोआपल्या दिसण्याचा किंवा असण्याचा कधीही गर्व करू नये. आपल्या जवळ असलेली कोणतीही विद्या आणि कला ही विनयेन शोभते.
******************************************************
Black clouds- white clouds
There were two Gandharva singers in the court of Lord Indra. Both of them are good at their tunes and skill in singing. Both of them have some magic of melody that will enchant the front, Indra Darbari used to perform an amazing song. Not only in the court, but also all the gods of the heavens lost their consciousness and listened to their songs.
The only difference between the two was that a Gandharva singer was a key and a blonde. The white singer was very proud of her appearance and the respect she got. This pride gradually turned into pride. He began to underestimate everyone before himself, gradually insulting everyone. The black singer, on the other hand, was very quiet and good-nature. One day Indra decided to test the two of them once. Both of them were invited to the court for the competition for the post of singer. It was announced that the singer who will please Mother Earth with his song will be given the title of Rajagaika, honor and desired.
Suran’s concert was decorated and the competition between the two was colorful. The drums were beaten, the strings were played and both of them started playing. Neither of them backed down.
The ego-ridden tone emanating from the throat of the white Gandharva singer spread like wildfire on the earth, many trees were burnt to ashes, trees were uprooted and the earth began to crack.
On the contrary, the calm tone of the black Gandharva singer hit the sky, the sky became thick and the rain showers dried up the earth.
The undisputed black singer got the honor of the royal singer and the ego of the white singer got dusted. Indra created a white cloud of white singers mocking the earth. Who are still standing in the sun today to atone for their ego. On the other hand, the black singer’s god created black clouds that still thunder, thunder, rain, and cool the world.
That’s why friends should never be proud of their appearance or being. knowledge and wisdom suit well those who are humble and polite.
January 12, 2025 at 7:30 pm
Awaiting moderation
cheap amoxil generic – ipratropium medication buy generic ipratropium