एका घरात एक आजीबाई एकटाच राहत होत्या. कुणीही नातेवाईक नाही कि कुणी सांगे सोयरे नाहीत.
दिवसभर त्या घरात एकट्याच असायच्या. वेळ घालवण्यासाठी खिडकीपाशी उभं राहायच्या, खिडकीत येणाऱ्या प्रत्येक पक्षांशी बोलायच्या, त्यांच्या आवडीची फळे, खाऊ त्यांना खाऊ घालायच्या. कावळे दादांची आणि आजीची तर खूप छान गट्टी जमली होती. कावळेदादा नेहमीच ठरलेल्या वेळेवर यायचे, काव काव करून आपण आल्याची वर्दी द्यायचे,  आजीने ठेवलेला सगळं खाऊ फस्त करायचे आणि भुर्रकन उडून जायचे. आजीलाही या पक्षांचा खूप आधार वाटत होता.
त्या एकट्या राहतायत हे एका चोराच्या नजरेस पडलं, दुपारची कमी वर्दळ पाहून एक दिवस एका भुरट्या चोराने त्यांच्या घरी चोरी करायची ठरवली
दारावरची बेल वाजऊन पोस्टमन अशी हाक दिली. आजीबाईंनी ती हाक ऐकून दार उघडले तेव्हा क्षणाचाही विलंब न करता तो चोर घरात शिरला, आजी बाईंना धक्का बुक्की करून घाबरवू लागला. सगळे सामान अस्थाव्यस्थ करून काही मौल्यवान सापडते आहे का ते पाहू लागला. तेवढ्यातच आजीचे लाडके कावळेदादा भूक भागवण्यासाठी खिडकीपाशी आले. काव काव करून देखील आजी खाऊ देत नाही म्हणून घरात शिरले  तेव्हा पाहताक्षणी त्यांना आजी अडचणीत सापडलीय हे लक्षात आले. कावळे दादांनी जोरात काव काव ओरडून आपल्या सर्व सग्या-सोयऱ्यांना गोळा केले आणि एकाएकी त्या चोरावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या पक्षी हल्ल्याने चोर चांगलाच गांगरुन गेला. त्यात आजीच्या लाडक्या कावळ्याने आपल्या तीक्ष्ण चोचीने त्या चोराचा एक  डोळाचं  फोडला. वेदनेने विव्हळणाऱ्या चोराने मग त्या फुटलेल्या डोळ्यावर हात झाकून आजीबाईंच्या घरातून धूम ठोकली आणि पळून गेला. असे कावळे दादाच्या प्रसंगावधानाने आजीची चोराच्या तावडीतून सुखरूप सुटका झाली.
म्हणूच मित्रांनो प्राणी मात्रांवर दया करा. त्याची परतफेड ते आपल्यापरीने कशी करतील आपण कल्पनाही करू शकत नाही

********************************************************

A grandmother was living alone in a house. There are no relatives or friends.
I used to be alone in that house all day. To pass the time, we would stand by the window, talk to each of the parties in the window, eat their favorite fruit, feed them. The crows had a very good group of grandparents. Crow always came at the appointed time, used to give the uniform that he had come, used to grab all the food kept by his grandmother and flew away. Grandma also felt very supportive of these parties.
One day, a thief noticed that she was living alone, and one day a thief decided to break into her house.
The postman rang the doorbell. When the grandmother heard the call and opened the door, without a moment’s delay, the thief entered the house and started frightening the grandmother by pushing and shoving her. He started to see if he could find anything valuable by messing it up. Just then, Grandma’s darling crow came to the window to satisfy her hunger. When he entered the house, he noticed that his grandmother was in trouble because he would not let her eat. The crow crow shouted loudly and gathered all his friends and suddenly attacked the thief. A sudden bird attack made the thief cry. In it, Grandma’s darling crow pierced one of the thief’s eyes with her sharp beak. The pain-stricken thief then covered his torn eye with his hand, blew smoke out of his grandmother’s house and fled. With the help of such crows, Dada’s grandmother escaped from the clutches of the thief.
So friends, have mercy on the animals. You can’t imagine how they will reciprocate