एक नदी अनेक गावं , शहरं आणि प्रांतांचा प्रवास करत अविरत वाहत असते. खळखळ आवाज करून नाद करत असते. स्वच्छ, मधुर पाणी साऱ्यांना निस्वार्थ देत असते.
अनेक प्राणी, पक्षी आपली तहान भागवण्यासाठी नदी तीरावर येत असतं, पाणी पिऊन तृप्त होऊन परतत असतं. असेच एकदा झाडावरची रसाळ फळे खाऊन पोट भरल्यावर पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर येत असताना खूप साऱ्या पक्षांनी आपल्या चोचीतून अनेक फळझाडे आणि फुलझाडांच्या बिया आणल्या, पाणी पितापिता त्या साऱ्या बिया नदी पात्रात सांडून गेल्या.
नदीने आपल्या स्वभावानुसार त्या बियांचा स्वीकार केला, त्यांना आपल्या प्रवाह सोबत वाहत वाहत एका सुपीक प्रदेशात घेऊन गेली तिथे किनाऱ्यावर त्यांना रुजवलं. मऊसूद किनाऱ्यालगतची माती त्यांना आधार देऊ लागली, सूर्य किरणांच्या वर्षावात त्या बियांना अंकुर फुटले, त्याची रोपटी तयार झाली, ती वाढू लागली. वर्षामागून वर्ष सरू लागली, नदीच्या पाण्यावर मुळे खोलवर रुजू लागली, झाडे वाढून त्याचे भलेमोट्ठे वृक्ष तयार झाले. आता परिस्थिती बदलली हे मोठाले वृक्ष परोपकाराची परतफेड म्हणून सर्व पक्षी-प्राण्यांना सावली देऊ लागले, उन्हा -पावसाचं त्यांचं संरक्षण करू लागले, भूक भागवण्यासाठी आपली फळे देऊ लागले, घरटे बांधण्यासाठी आधार देऊ लागले. पण पक्षी किंवा प्राण्यांमार्फत घर बांधण्यासाठी वापरण्यात येणारे झाडाचे कोणतेही पान, कोणतीही फांदी, कितीही वजनदार
लाकूड पाण्यात पडल्यावर पाण्यात बुडत नव्हतं. ते तरंगून वर येई. दोस्तहो असं का होतं माहितीय ?
ज्या नदीच्या पाण्याने आईच्या मायेने अनेक वृक्षांना छोट्या बीजापासून मोठं केलं होतं तेच नदीचं पाणी त्या झाडाला, त्याच्या पानाला,त्याच्या कोणत्याही फांदीला कसं काय बुडू देईल म्हणूनच मित्रहो लहानपणापासून आपल्याला घडवणाऱ्या आपल्या आई-वडिलांना,शिक्षकांना आपल्या मित्रमैत्रिणींना कधीही विसरू नका कारण आपल्याला घडवणारे हात आयुष्यात परिस्थिती कोणतीही असो आपल्याला कधीच बुडवणार नाहीत. ते हात असेच आपल्यावर नदीसारखा अविरत कौतुकाचा वर्षाव करत राहतील.
**************************************************
Life-giving river
A river flows uninterruptedly, traveling through many villages, towns, and provinces. Makes a loud noise. Clean, sweet water makes everyone selfless.
Many animals and birds come to the river to quench their thirst, drink water and return satisfied. In the same way, after eating the juicy fruits of the tree and filling their stomachs, they came to the water for drinking water.
The river, by its very nature, accepted the seeds, carried them along its course to a fertile region, and rooted them on shore. The soil along the Mausud coast began to support them, the seeds sprouted in the rain of sun rays, its seedlings were formed, it began to grow. Year after year, the roots began to take root in the water of the river, and the trees grew and grew into big trees. Now that the situation has changed, these big trees have started providing shade to all the birds and animals in return for philanthropy, protecting them from the sun and rain, giving their fruits to satisfy their hunger, and providing support for building nests. But no leaf, no branch, no matter how heavy the wood used to build a house by birds or animals, fell into the water. It floated up. Do you know why this happens?
How can the water of the river which my mother loved to make many trees grow from a small seed drown the tree, its leaves, any of its branches, so friends, never forget your parents, teachers, your friends No matter what, they will never drown you. They will continue to shower admiration on us like a river.
October 31, 2024 at 3:11 am
Awaiting moderation
buy capecitabine generic – naprosyn pill capsules danazol 100 mg