पावसाची नुकतीच सुरवात होती. शाळा सुरु व्हायला अजून अवकाश होता. ढगां आडून सुर्य किरणांनी डोके थोडे वर काढले म्हणून आस्था आणि तिची आई नेहमीप्रमाणे बाहेर फेरफटका मारायला निघाली. अवघ्या दहा वर्षाच्या कोवळ्या वयात आस्थाची प्रश्न मालिका काही केल्या संपत नव्हती. तिचा प्रत्येक प्रश्न तिला समाधान आणि आईला संयम शिकवत होता. अचानक आभाळ दाटून आले. गार वा-याची प्रत्येक झुळूक मनाला नवी उभारी देत होती. आस्थाने आईचा हात घट्ट धरला होता. एक थेंब माथ्यावर पडला आणि आईने छत्रीला लगेच हात घातला. छत्रीची मूठ उघडेपर्यंत थेंबानी सरींचं रुप धारण केलं. आस्था प्रत्येक थेंबाचा आनंद घेत होती. काही थेंब डोक्यावर पडत होते, काही गालावर, काही हातांवर. आस्थाला पावसाची फार गंमत वाटत होती. एक हात आईच्या हातात आणि दुसरा छत्रीवरून ओघळणार पाणी स्वतः च्या गालावर उडवण्यात रमून गेला होता. तिला स्वतःला त्या पावसात चिंब भिजायचं होतं. पण छत्री अडथळा ठरत होती. त्यात एक हात आईनच्या हातात होता आणि तिने तो घट्ट धरला होता. आस्थाने एक प्रश विचारला, आईने आस्थाकडे थोडं हसून प्रेमाने पाहिलं आणि हात सोडून तिला भिजण्यासाठी मोकळा केलं, ” आई, आयुष्य म्हणजे काय गं ?” हा प्रश्न विचारून आस्था आभाळातून पडणाऱ्या पावसाचा आनंद घेत होती आणि आईच्या मनात उत्तराची जुळवा-जुळव सुरु होती. घरी आल्यावर आईने टॉवेलने तिचे केस कोरडे केले. तिच्या हातात गरम दुधाचा ग्लास देत आई तिला म्हणाली, “आयुष्य … हे या पावसा सारखं असतं, काही थेंब छत्रीवर पडतात , काही अंगावर तर काही जमिनीवर. याच थेंबांसारख्या अनेक संधी आपल्या समोर येतंच असतात. आपण आलेल्या संधीचा सुयोग्य वापर करून स्वतःला सिद्ध करायचं, एखादी संधी हुलकावणी देऊन गेली तर वाईट वाटून घ्यायचं नसतं. आपण घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर आपलं आयुष्य आकार घेत असतं. संधी येते, संधी जाते आलेल्या संधीला जपायचं असतं, गेलेल्या संधीला कधीच आठवायचं नसतं. आयुष्य असं जगायचं असतं.” आस्था मनाचे कान करून ऐकत होती, तिला आईचे विचार पटले, “आई, कित्ती छान समजावून सांगतेस गं तू. ” असं म्हणत ती आईच्या गळ्यात पडली आणि आईला घट्ट मिठी मारली.
********************************************
Rain Drops
The rains had just begun. There was still time to start school. Astha and her mother went for a walk outside as usual as the sun’s rays lifted their heads a little under the clouds. At the tender age of ten, the series of questions of faith did not end. Her every question was teaching her satisfaction and mother patience. Suddenly the sky became dark. Every gust of cold wind was giving a new impetus to the mind. Faith was holding her mother’s hand tightly. A drop fell on the head and the mother immediately put her hand on the umbrella. Thembani took the form of a sari until the handle of the umbrella was opened. Astha was enjoying every drop. Some drops were falling on the head, some on the cheeks, some on the hands. Astha was enjoying the rain. One hand was in mother’s hand and the other was dripping water from the umbrella on her own cheek. She wanted to soak herself in the rain. But the umbrella was a hindrance. One of the hands was in Ain’s hand and she was holding it tightly. Aastha asked a question, mother smiled a little and looked at Aastha with love and let go of her hand and let her soak, “Mom, what is life?” Asking this question, Astha was enjoying the rain falling from the sky and the answer was starting to match in the mother’s mind. When she got home, her mother dried her hair with a towel. Giving her a glass of hot milk in her hand, her mother said to her, “Life is like this rain, some drops fall on the umbrella, some on the limbs and some on the ground. There are many opportunities like these drops in front of us. We want to prove ourselves by using the opportunity.” You do not want to be frustrated if you cannot get the right pitch so invest in a good capo. Astha was listening to her mind, she understood her mother’s thoughts, “Mother, how well you explain.” Saying this, she fell on her mother’s neck and hugged her tightly.
January 17, 2025 at 2:19 pm
Awaiting moderation
brand isotretinoin 40mg – linezolid usa order zyvox 600 mg for sale