एक आटपाट नगर होतं. ऐश्वर्य संपन्न आणि निसर्ग समृद्ध. त्या नगरीच नाव सिद्धांचल . सिद्धांचल नगरीचा राजा सिद्धेश्वर आणि त्याची एकुलती एक लाडकी राजकन्या सिद्धी.पराक्रमी राजा सिद्धेश्वरसारखी राजकन्या सिद्धीही लहानपणापासूनच फार हुशार, चाणक्ष आणि देखणी होती. सगळ्या राजकीय कला आणि… Continue Reading →
खळ-खळ वाहणाऱ्या नदीच्या किनारी, एका हिरव्यागार रानात, उंचपुरी टुमदार झाडावर, एका चिऊताईने बारीक काटेकुटे, सुके गवत, कापूस, पिसे गोळा करून एक छानसं घर बांधल होतं. नदीचं स्वच्छ पाणी, मोकळी हवा आणि रानातला रानमेवा खाऊन ती आणि तिची दोन पिल्ले त्या… Continue Reading →
एका खेडेगावात एक गरीब शेतकरी राहात होता. आपल्या छोटेखानी शेतात तो खूप कष्ट करून भाजीपाला पिकवायचा. रोज पहाटे उठून शेतीची सगळी कामं करून जी काही भाजी तयार होईल त्यातली थोडी कुटूंबासाठी ठेऊन उरलेली सगळी भाजी आठवड्यातून एकदा आठवडी बाजारात नेऊन… Continue Reading →
उन्हाळ्यची सुट्टी संपून नुकतीच आराधनाची शाळा चालू झाली होती. वडिलांची नोकरी फिरतीची असल्यामुळे सतत दोन-तीन वर्षांनी तिची शाळा बदलायची. नवी जागा, नवे घर, नवीन शाळा , नवे वर्ग, नव्या बाई, मित्र-मैत्रिणी सुद्धा नवे, सगळेच नवे चेहरे पाहून ती नेहमीच गोंधळून… Continue Reading →
पाऊस आणि धरणी एकमेकांचे खूप छान आणि जुने मित्र होते. मित्र म्हटलं कि, आपलेपणा, मनमोकळेपणा, रुसवे-फुगवे, हक्क, जबाबदारी या सगळ्या गोष्टी आल्याच. पावसाचं आणि धरणीचं मैत्रीचं नातंही असंच सुंदर आणि निरागस होतं. पाऊस दूर आभाळाच्या देशातून दरवर्षी, अगदी न चुकता… Continue Reading →
वार्षिक परिक्षा संपून नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. सुट्या म्हणजे मुलांसाठी पर्वणीच. दे धम्माल ….!!!मित्रांची भेट, खेळणं, बागडणं, धिंगाणा करणं ही रोजची ठरलेली कामं. अभय आणि त्याचे पाच-सहा मित्र सुट्टी पडल्यापासून रोज सकाळ संध्याकाळ शेजारच्या बागेत खेळायला जायचे. त्यांच्या परिसरात हीच एकमेव… Continue Reading →
मर्कटेश्वर राज्यात मर्कट नावाचा एक शूर राजा राज्य करीत होता. राजा आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम करीत असे. सर्व सुखसोई उपलब्ध असल्याने प्रजाही खूप सुखी होती. प्रजा होती सुखी पण राजा होता दुःखी. त्याच्या दुःखाचे कारण काय ? तर जन्मत:च राजाला… Continue Reading →
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऋतू कोणताही असो, अर्णवला निसर्ग खूप आवडायचा. अगदी लहान असल्यापासूनच घरच्या छोटेखानी बागेत त्याचा वेळ खूप छान जायचा. तो फुला- पानांमध्ये तासनतास रमायचा. फुलांच्या नवनवीन रंगांचं त्याला फार आकर्षण. नानाविध फुलं, त्यांचे सुगंध या साऱ्यांचच त्याला फार… Continue Reading →
दूर आभाळाच्या देशात परीस्थानात अनेक सुंदर प-या राहत होत्या. सगळ्याच अगदी सुंदर, प्रसन्न आणि सदैव आनंदी. या सगळ्यांत आपलं वेगळेपण जपत होती, ती सोनेरी केसांची परी. सगळ्यांची आवडती आणि सगळ्यांचीच लाडकी. पांढरा शुभ्र पायघोळ झगा, गुलाबी गाल, लाल चुटूक ओठ, डोक्यावर… Continue Reading →
गोष्ट जुनी असली तरी विचार आजही झालाच पाहिजे. आपल्या चूका मान्य करुन त्या सुधारण्याचा प्रयत्न आपण नेहमीच केला पाहीजे. यातच संपूर्ण सजीवसृष्टीचं भलं आहे. प्राणी आणि पक्षी यांच्या पाठीवर निसर्गाने पृथ्वीवर कल्पक “मनुष्यप्राणी” जन्माला घातला. सगळ्या सजीवांत अत्यंत हुशार आणि… Continue Reading →
© 2025 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑