शब्द ब्रम्ह https://shabdbramh.com शब्द ब्रम्ह आहेत. हे विश्वच ध्वनिनिर्मित शब्दांच आहे. जिथे शब्द संवाद साधतात, शब्द हास्य खुलवतात, शब्द गालावर ओघळतात, शब्द व्यक्त होतात, शब्द ठाव घेतात, शब्द चित्र रंगवतात, शब्द निःशब्द होतात. श्री. अनुप साळगांवकर यांचा ब्लॉग Thu, 14 Mar 2024 03:03:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5 https://i0.wp.com/shabdbramh.com/wp-content/uploads/2021/11/cropped-cropped-cropped-img_20210630_131055_029.jpg?fit=32%2C32&ssl=1 शब्द ब्रम्ह https://shabdbramh.com 32 32 213563641 अनुभूती – भाग ६ https://shabdbramh.com/2024/03/11/narmada/ https://shabdbramh.com/2024/03/11/narmada/#comments Mon, 11 Mar 2024 10:50:44 +0000 https://shabdbramh.com/?p=1082 Continue Reading →]]>

नर्मदे हर…. !!!

या नामातच जादू आहे.

आणि माझी मैया आहेच जादूगार …

तिचं दर्शन जो कुणी घेईल …. तो तिचाच होऊन जातो.

“दर्शनमात्रे मन कामनापूर्ती” तुम्ही फक्त तिचं दर्शन घ्या …

ती तुमचं मन जाणते आणि न मागता तुमच्यासाठी जे योग्य आहे ते भरभरून देते.

नर्मदा पुराणात सांगितले आहे … गंगेच्या स्नानाने तर नर्मदेच्या नुसत्या दर्शनानेच मोक्ष प्राप्ती होते.

८ मार्चला महाशिवरात्री नंतरचा १० मार्चचा रविवार .. नर्मदा माईच्या दर्शनाचा पुन्हा योग जुळून आला.

उज्जैनला श्री महाकालेश्वराच्या दर्शनाला गेलो होतो. दर्शन, सौंदर्यस्थळ पाहून झाल्यावर दुसऱ्याच दिवशी ओंकारेश्वरला जाण्याचा प्लान ठरला.

मला श्री ओंकारेश्वराच्या दर्शनापेक्षा मैय्याला पाहण्याची आणि भेटण्याची ओढ जरा जास्तच लागली होती.

मैय्याला भेटण्याचा काळ खूपच थोडा होता … कारण संध्याकाळी आमची मुंबईला परतण्यासाठी इंदोरहून ट्रेन होती.

पण या थोड्याशा सहवासात तिने खूप काही दिलंय …आणि फक्त दिलयं …

तिच्या दर्शनानेच मी अंतर्बाह्य सुखावून गेलोय.

ओंकारेश्वरला या तिरावर श्री मामलेश्वर महाराज मंदिर आणि दुसऱ्या तीरावर श्री ओंकारेश्वर महाराज मंदिर …

या दोन्ही तिरांना जोडणारी …. भलं मोठं, ३०० फूट खोल पात्र असणारी, विस्तीर्ण पण काहीशी शांत अशी माझी … नर्मदा मैया …

पाहिलंत ” माझी“….. हा तिच्याविषयीचा आपलेपणाही माझ्यात तिनेच निर्माण केलाय  …

आपलं मन ….. ती किती…. आणि कसं… वाचते..?? आणि आपल्याला कसं जपते, याचा कालच तिच्या सोबत असतानाचा माझा मला आलेला अनुभव सांगतो …

श्री मामलेश्वर मंदिरापासून थोडं खाली उतरून, बोटीत बसून श्री ओंकारेश्वराच्या दर्शनाला आम्ही जाणार होतो.

उतरताना आजूबाजूला बरीच ढकलगाडीवर दुकानं आहेत … शीतपेयाची, फुलांची, प्रसादाची, रुद्राक्षांच्या माळांची …

जाता जात मला एक दुकान दिसलं …. आणि त्या दुकानात एक चप्पल जोड दिसली … आपली कोल्हापुरी असते ना … तशाच प्रकारची पण काही साधीशी ….

मला खूप आवडली … “येताना बघू ..!”  असा विचार करून पुढे झालो .. समोर नजर जाईल तिथे नर्मदा मैय्याचं पात्र डोळ्यांना सुखावत होतं . घाटावर बोट लागली होती, बोटीत बसलो …

मैय्याच्या पाण्यात हात बुडवला आणि विलक्षण समाधान झालं… तो थंडगार स्पर्श क्षणात माझी तिच्याशी नाळ जोडून गेला….

त्या पाण्यात माझी बोटं खेळत होती, की ती खेळवत होती … माझं मलाच कळेना …

बोट नदीत फिरत होती आणि माझी मैया मला तिच्या निसर्ग सौंदर्यात गुंतवत होती …

समोर दिसणारं ओंकारेश्वराचं मंदिर, मंदिरापाठी उभी भव्य जगतगुरु शंकराचार्यांची उभी मूर्ती, उजवीकडे उभं नर्मदेवर बांधलेलं धरण आणि आजूबाजूला उभे काळे खडक.

कुठेही नजर फिरवा .. तिच्या आजूबाजूचा निसर्ग आपल्याला भुलवत राहतो. जल तत्व इतकं आपल्या मनाला स्थिर करतं, त्याने सात्विक भाव वाढू लागतो.

मी ओळखीच्या सगळ्यांना विडिओ कॉल करून मैय्याचं दर्शन दिलं.

इतक्यात बोट समोरच्या किनाऱ्याला लागली … आम्ही श्री ओंमकारेश्वर जोतिर्लिंगाच्या दर्शनाला निघालो …

रविवार असल्याने जरा जास्त गर्दी होती … पण… चलता है … भोले बाबा हैं … तोह सब मुमकीन है ..!!!

आम्ही रांगेत लागलो … पण चप्पला काढायला विसरलो … रांगेतच एका दुकानाबाहेर चप्पला काढल्या ..

दर्शनाला दोन-अडीज तास लागले … गाभारा जरा लहान आहे … पण दर्शन छान झालं …

सगळ्यांना भूक लागली होती म्हणून मंदिर सोडून पटापट खाली उतरलो …. 

ज्या दुकानाबाहेर चपला काढल्या, त्या दुकानाबाहेर दर्शनाच्या रांगेत प्रचंड गर्दी झाली होती … 

चपला शोधण्यासाठी कसरत करावी लागणार होती… इतक्यात कळलं .. दुकानदारांनी सगळ्यांच्या चपला अजून खाली नेऊन टाकल्यात ..

आम्ही खाली पळालो … खाली एक खूप मोठ्ठा ढीग होता … सगळेच आपापल्या चपला शोधत होते …

सगळ्याच चपला इकडे-तिकडे झाल्या होत्या … खूपच शोध घेऊन मला माझी एकच चप्पल सापडली …

काही केल्या दुसरी सापडेच ना … मी थकून प्रयत्न सोडून दिला … अनवाणी पुन्हा बोटीत बसून किनारा गाठला

चपलेपेक्षा महत्वाचा पावलांना गुदगुदल्या करणारा त्या गारेगार पाण्याचा स्पर्श मला सुखावत होता…

घाटावर उतरल्यावर गोमुखाचं दर्शन घेऊन, मी श्री मामलेश्वर मंदिराच्या दिशेने चालू लागलो …

पुन्हा आजूबाजूची दुकान पाहताना मला तीच चप्पल दिसली, जी मी मंदिरात जाण्या आधी पहिली होती आणि मला आवडलीपण होती.

आता ती चप्पल विकत घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

त्या विकणाऱ्या बाईला विचारून कळलं माझ्या मापाची आणि या प्रकारची ही एकच जोड आहे. 

पैसे दिले .. चप्पल घातली … आणि परतीचा प्रवास सुरु झाला …

याच प्रवासात नर्मदा मैय्याने घडवून आणलेल्या चप्पल पुराणाचे सगळ कोडं सुटलं ….

आपल्या मनातले विचार ती कसे हेरते … ??

आपले लाड कसे पुरवते …???

त्यासाठी आपल्याही न कळत परिस्थिती कशी निर्माण करते …??

त्या परिस्थितीतून तिला हवं ते … हवं तसंच कस घडवून आणते ???

हे सगळं हळू हळू आपलं आपल्यालाच उलगडत जातं …

तिच्या प्रेमाचा बोध होतो …

आपल्यामुळे तिला उगा त्रास झाला, याचा थोडा खेदही होतो … 

पण ती आई आहे …. आणि ती आहे म्हणूनच, आपण आहोत …

पिता जरी विटे -विटो, न जननी कुपुत्रा विटे

आपले कळत, नकळत झालेलं असंख्य अपराध तिच्या पाण्यात विरुन जातील, अशी शक्ती तिच्यात आहे.

आपण फक्त शरणागती स्विकारायची …

तिच्या प्रार्थनेसाठी, तिच्याच परवानगीने, तिच्याच पाण्यात उभं राहायचं, तिचं जल ओंजळीत घ्यायचं आणि तिलाच अर्पण करताना सांगायचं…….

हे जे काही मी माझं माझं म्हणून मिरवतोय ना … हे सगळं तुझंच आहे आहे… जे काही दिलं आहेस… देणार आहेस … नेलं आहेस… .. नेणार आहेस ….ते निभावण्याची शक्तीही तूच दे …!”

कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे
त्वदिपादकजं नमामि देवि नर्मदे
!!

शुभं भवतू

कृष्णार्पणमस्तू

© अनुप साळगांवकर – दादर

दिनांक. १० मार्च २०२४

अनुभूती – भाग ५

नर्मदा घाट – ओंकारेश्वर

श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर

श्री मामलेश्वर महादेव मंदिर

]]>
https://shabdbramh.com/2024/03/11/narmada/feed/ 13 1082
प्रेम हे….. https://shabdbramh.com/2023/12/26/pream/ https://shabdbramh.com/2023/12/26/pream/#comments Tue, 26 Dec 2023 11:00:10 +0000 https://shabdbramh.com/?p=1067 Continue Reading →]]>

का जीव जडतो कुणावर  …? 

माहित नाही. …

हवी- हवीशी वाटणारी माणसं, कायम आयुष्यात रहात नाहीत. वाळू घट्ट धरुन ठेवलेली मूठ हळूहळू सैल पडावी, अन् हातची सगळी वाळूच गळून पडावी…. अगदी असंच होतं.

हे माहीतही असतं ना .. … आपलं … आपल्याला 

एक न एक दिवस ती निघून जाणार आहेत… कणभर देऊन…..नाहीतर मणभर घेऊन.
आपल्याला माहित नसलं तरीही … मनाला सगळं माहित असतं … सगळं जाणवत असतं … कळत असतं… फक्त समजून घ्यायचं नसतं….. नेहमीप्रमाणे.

काही वर्ष … काही महिने .. काही दिवस … काही क्षण … त्यांचं आपल्या आयुष्यात असणं आपल्याला आवडलेलं असतं … अगदी मनापासून. ….पण हवं हवंस इतक्या सहज सोडून देईल ते मन कसलं …

त्यांनी कायम आपल्याच सोबत राहावं … त्यांसोबत आपलंही आयुष्य समृद्ध व्हावं .. असं आपलं-आपलं आपणच ठरवून टाकलेलं असतं…. त्यांना स्वतःशी बांधून, त्यांना गृहीत धरून.

त्यांचा प्रत्येक शब्द नि शब्द झेलत, त्यांच्यासाठीच फूलत, त्यांच्या आनंदासाठी प्रयत्नांच्या तारेवरची आपलीच कसरत पेलत, आपलं बरं चालू असतं.

कापसाचं पीस वाऱ्यावर अलगत तरंगत राहावं … तसं. … सगळं अगदी हळूवार चालत असतं … अन् आपण चालत असलो तरीही जग थांबलेलं असतं.

आपला वेळ, आपले विचार, आपलं जग सगळं सगळं व्यापून टाकलेलं असतं … त्यांनी …. आपण, आपल्यात उरत नाही.

समरस होऊन जातो … त्या व्यक्तीशी.

आपल्याला आवडणारी माणसं आपल्या डोळ्यासमोर असणं हे भाग्यच … हो ना ???

माझंच काय ?… प्रत्येकाचं हे असंच असतं

प्रेम करून घेणारी समोरची व्यक्ती बदलेल कदाचित … पण, प्रेम… प्रेम बदलणार नाही. ती भावनाच इतकी शुद्ध आणि शाश्वत आहे ना …

ज्याला प्रेम कळलं तो तरला… नाहीतर… बुडाला.

ती भावना ननक्की काय करते ? तर भरभरून जगायला शिकवते, नवी उमेद निर्माण करते, स्वप्न बघायला प्रेरणा देते आणि ती पूर्ण करायला उर्जा देते.

तुम्ही कुणावर प्रेम केलंयत का ? तुमचंही हे असंच होतं का ??

म्हणजे …. बघाना …. 

आत्ता या क्षणाला ती व्यक्ती काय करत असेल … ? 

या प्रश्नाचं आपलं आपल्याला सापडलेलं उत्तर … खूप प्रयत्न करून आपण शोधलेलं असतं . 

आपल्याला आवडलेलं असतं …. आपल्याला सुखावत असतं … 

ते उत्तर काय माहितीय … 

आपण सतत त्या प्रिय व्यक्तीचा विचार करत असतो ना …. 

त्यामुळे आपल्याला कायम असंच वाटत असतं, ती व्यक्ती आपल्याच सारखं सतत आपलाच विचार करत असेल…. हो ना.

कुणीतरी आपला विचार करतं … आपल्यावर प्रेम करतं … एकदम भारी आहे नाही….

गुदगुदल्या होतात … हा हा हा हा ….

गालातल्या गालात आनंदाचे उमाळे फुटतात ….

डोळे उघडले तरी … तोच चेहरा

आणि डोळे बंद केले तरीही तोच. … 

त्या चेहऱ्यावरचे हसरे भावही बदलत नाहीत …. 

ते मोहात पाडत असतात आपल्याला.

आपल्या हृदयातला प्रेमाचा झरा हा असाच अविरत आपलंच मन भिजवत असतो.  

आपण काय करायचं ?

आपण फक्त भिजायचं …. चिंब व्हायचं ….

असे क्षण ….. त्या क्षणांनी होणारा आनंद … आणि .. तो आनंद देणारी ती माणसं … सहसा भेटत नाहीत.

ती दुर्मिळ झाली आहेत … पण आपण शोधायची …. शोधून जपायची ….. आपल्यासाठी … आपल्या आनंदासाठी.

हातची वाळू गळून गेली तरी त्या वाळूचे अनेक कण हाताला तसेच चिटकून असतात…. आपला हात घट्ट धरुन… आपण आपला हात झटकायचा नाही….. हाताच्या बोटांनीच जरा गोंजारायचं त्या कणांना आणि कणांसकट मूठ पुन्हा वळायची…. ते कण आपले म्हणून…. आपल्यासाठीच.

कारण एकाच … आपण प्रेमळ आहोत …. आपण निस्वार्थ प्रेम करू शकतो आणि करूनही घेऊ शकतो.

कधीही …

कुठेही ….

कुणावरही ….


शुभं भवतू ….. कृष्णार्पणमस्तु
©™ श्री. अनुप साळगांवकर-  मुंबई

]]>
https://shabdbramh.com/2023/12/26/pream/feed/ 7 1067
शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ https://shabdbramh.com/2023/08/18/elephant-2/ https://shabdbramh.com/2023/08/18/elephant-2/#comments Fri, 18 Aug 2023 11:08:02 +0000 https://shabdbramh.wordpress.com/?p=566 Continue Reading →]]> एक आटपाट नगर होतं. ऐश्वर्य संपन्न आणि निसर्ग समृद्ध. त्या नगरीच नाव सिद्धांचल . 

सिद्धांचल नगरीचा राजा सिद्धेश्वर आणि त्याची एकुलती एक लाडकी राजकन्या सिद्धी.
पराक्रमी राजा सिद्धेश्वरसारखी राजकन्या सिद्धीही लहानपणापासूनच फार हुशार, चाणक्ष आणि देखणी होती. सगळ्या राजकीय कला आणि क्रीडा तीला अवगत होत्या.
राजगृही सगळं अलबेल चालू होतं. हसती-खेळती राजकन्या हळूहळू मोठी होत होती. राजकन्येचं जसं जसं वय वाढत गेलं तशी राजाचीही काळजी वाढू लागली. 

आपल्या सर्वगुणसंपन्न राजकन्येला साजेसा जोडीदार मिळावा म्हणून त्याचे प्रयत्नही सुरु झाले.
लाडक्या राजकन्येला सुयोग्य वर लाभावा म्हणून राजाने दरबारात सहमताने स्वयंवराची घोषणा केली. स्वयंवराचा दिवस ठरताच; विविध राज्यातील योद्धे, राजपुत्र, पराक्रमी वीर, सर्वोत्तम कलाकार, आचार्य, पंडीत आदींना निमंत्रणे पाठवली गेली. राजमहालात स्वयंवराची जोरदार तयारी सुरु झाली. जागोजागी तांब्या-पितळेच्या मोठाल्या समया, शोभेची कारंजी,  फुलांची तोरणं, माळा, रंगीबेरंगी मखमली पडदे, उंची वस्त्र, उत्तम मिष्ठान्न सगळीकडे सगळ्यांची लगबग सुरु झाली.
राजकन्येच्या स्वयंवराचा दिवस उगवला आणि राजमहाल दुमदुमू लागला. महालाच्या दिशेने सजलेले रथ, अंबारी, बैलगाड्या धावू लागल्या. सगळ्या पंचक्रोशीतले रहिवासी सिद्धांचल नगरीत दाखल झाले होते.
जागोजागी दिव्यांची आरास, फुलांच्या रांगोळ्या, सुवासिक अत्तरे, झेंडूची तोरणे या सा-याने वातावरण आगदी प्रसन्न झाले. अनेक देशो- देशीचे शूरवीर योद्धे, राजपुत्र, कलाकार, आचार्य, पंडीत, क्षत्रिय, नर्तक राजदरबारात उपस्थित झाले. सुंदर रेशमी गुलाबी रंगाचे वस्त्र नेसून राजकुमारी सिद्धी सनईच्या सुरात दरबारात हजार झाली. तिचं सौन्दर्य पाहून सगळेच थक्क झाले. राजकुमारी अप्सरेसारखी अनुपमा दिसत होती.  स्वयंवराचा पण ऐकण्यासाठी सगळ्यांचे कान आतुर झाले. नगारे वाजवत राजगृहातील राजहत्तीला दरबारातील रिंगणात आणून अगदी मधोमध उभ करण्यात आलं  आणि “जो कुणी पुरुष राजघराण्याच्या राज हत्तीची सोंड आणि पुढचे दोन पाय वर करून दाखवेल त्याच्याशी राजकन्येचा विवाह होईल आणि त्याला अर्ध राज्य बक्षीस म्हणून दिलं जाईल.” अशी डंका वाजवून घोषणा करण्यात आली.
घोषणा ऐकून सगळे प्रेरित झाले, शक्ती परिक्षणासाठी सिद्ध झाले आणि स्वयंवर सुरु झालं.
प्रत्येकाला स्वसामर्थ सिद्ध करण्याची समान संधी देण्यात आली.
प्रत्येक वीर पुरुष येत होता आपल्या बाहुबळावर पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता पण राजहत्तीसमोर कुणाच काही चालेना आणि हत्तीची सोंड आणि पुढचे दोन पाय काही वर होईनात.
जसजसे उमेदवार कमी होत गेले, राजाच्या चेहऱ्यावरचे भाव चिंताक्रांत झाले. एकही वीर पुरुष या स्वयंवरात नाही अशी शंका मनात बळ धरू लागली. आपल्या वडिलांची अवस्था पाहून राजकन्येला रडू कोसळणार एवढ्यात एक सडपातळ शरीरयष्ठीचा शांत आणि संयमी तरुण सभामंडपी अवतरला. राजासमोर नतमस्तक झाला आणि एका संधीसाठी प्रार्थना करू लागला. त्या किरकोळ शरीरयष्टीच्या तरुणाला पाहून सभामंडपातले सगळेच वीर हसू लागले. “जे आम्हाला जमले नाही, ते याला कसे जमेल” अशी चेष्टा करू लागले. राजाने हात उंचावून सगळ्यांना शांत केले आणि मोठया जड मानाने त्या तरुणाची प्रार्थना मान्य केली.
संधी मिळताच तो तरुण हत्ती समोर जाऊन उभा राहिला. सभामंडपात शांतता पसरली. हत्तीचा रिंगणाला एक फेरी मारून हत्तीच्या पाठीमागे थांबला. सगळा राज दरबार आता काय होणार या प्रतीक्षेत असताना त्या तरुणाने हत्तीची शेपूट दोनी हातात धरून जोरात खाली ओढली. हत्तीला प्रचंड वेदना झाली, हत्ती बिचारा कळवळला, त्याने जोरात ओरडण्यासाठी आपली सोंड आणि पुढचे दोन पाय वर केले. दरबारात सगळ्यांच्या डोळ्यादेखत चमत्कार झाला. राजाने ठेवलेला स्वयंवराचा पण पूर्ण झाला, राजाला समाधान आणि राजकन्येला अपूर्व आनंद झाला. राजकुमारी सिद्धीला अत्यंत हुशार आणि चतूर जोडीदार लाभला होता. आगदी थाटामाटात राजकन्येचा त्या तरुणाशी विवाह झाला आणि त्याला अर्ध राज्य बक्षीस देण्यात आलं. मिळालेल्या अर्ध्या राज्यात तो तरुण आणि राजकुमारी सिद्धी आनंदाने राहू लागले.

राजकन्येच्या विवाहानंतर राजाचे लक्ष कही राजकारभारात लागेना म्हणून त्याने काही वर्षातच उरलेलं अर्ध राज्यही बक्षीस म्हणून देण्याचा निर्णय घेतला आणि राज्यभर तशी दवंडीही पिटवली.  पुन्हा राजसभेचं आयोजन झालं, राज हत्तीला रिंगणात उभ करण्यात आलं. ” राज हत्तीची मान जो होकारार्थी आणि नकारार्थी हालवून दाखवेल त्यालाच अर्ध राज्य बक्षीस दिल जाईल.” अशी घोषणा झाली. अनेक राजे, महाराजे, वीरपुरुष, शूरयोद्धे यांना संधी मिळूनही यावेळीही पराभव स्वीकारावा लागला आणि सुवर्ण संधीची माळ  सगळ्यात शेवटी राजाचा एकमेव जावई झालेल्या त्या शांत आणि संयमी तरुणाच्या गळ्यात येऊन  पडली तसा सगळा दरबार पुन्हा एकदा तरुणाकडे आशेने पाहू लागला. रिंगणाजवळ जाताच ब्राम्हण आणि हत्तीची नजरा- नजर झाली. तरुण आता सुदृढ आणि चपळ झाला होता. अत्यंत कुशलतेने तो  हळूच न कळत हत्तीच्या पाठीवर जाऊन बसला आणि हत्तीच्या कानात हळूच म्हणाला, ” मला ओळखलस ???” हत्ती म्हणाला’ ” हो.”, मग पुढे तरुण म्हणाला, “शेपूट ओढू” , हत्ती म्हणाला “नको”.  राजाच्या पण सांगितल्याप्रमाणे पूर्ण झाला, पुन्हा एकदा बुद्धिवादी तरुणाने अर्ध राज्य जिंकलं आणि शक्तीपुढे बुद्धीचं पारडं पुन्हा जड झालं.

म्हणूच मित्रहो, कुणाच्या दिसण्यावरून, असण्यावरून कधीही कुणाची निंदा करू नका. प्रत्येकाचं स्वतःच असं स्व-कौशल्य असतं. 

ज्याकडे बुद्धी आहे, त्याकडे शक्ती नसेल किंवा ज्याकडे शक्ती आहे त्याकडे बुद्धी नसेल. अपवादाने या दोन्ही गोष्टी एकत्र असतील तरीही आपल्याकडे त्या संभाळण्यासाठीची नम्रता हवी.


शुभं भवतू ….. कृष्णार्पणमस्तु
©™ श्री. अनुप साळगांवकर- दादर, मुंबई

]]>
https://shabdbramh.com/2023/08/18/elephant-2/feed/ 21 566
परीस https://shabdbramh.com/2023/05/08/parees/ https://shabdbramh.com/2023/05/08/parees/#comments Mon, 08 May 2023 11:02:49 +0000 https://shabdbramh.com/?p=1030 Continue Reading →]]> समोरच्याला आपलसं करतील, असे काही शब्द असतात.
त्या शब्दांनाही कोड पडावं अशी काही माणसं असतात,हे आपलं भाग्य …
जेव्हा ती फक्त आपली असतात …

“तू माझा आहेस  …. आणि  कायम राहशील” हे शब्द … फक्त शब्द नाहीतच ती अमृतवृत्ती आहे.
जी आपल्याला उभं करते, जगवते आणि त्याही पुढे जाऊन वाढवते …
आपल्या आनंदात सहभागी होते, दुःखात आधार देते, जग जिंकायला आत्मविश्वास देते.
हि गोष्ट आपली आहे … आपल्यापैकी प्रत्येकाची आहे.
जाणवत असते … माहित असते …. अगदी अशीच काहीशी घडली असते.
या आधी घडली आहे …  या पुढेही घडणार आहे.
कदाचित… आताही घडत असेल..
गोष्ट आपल्या ध्येयाची …
गोष्ट आपल्या प्रयत्नांची ..
गोष्ट आपल्या यशाची …
गोष्ट आपल्याला लाभलेल्या परीसाची …

आपल्याला ते जग फक्त अनुभवायचं नसतं … ते जिंकायचं असतं….. सिकंदरासारखं
पण, सगळ्यांनाच सगळं जमतं असं नाही ना ….
आयुष्यात बरंच काही करायचं असतं, पण काय करू तेच कळत नसतं
भेटणारा प्रत्येक जण आपापल्या परीने सल्ले देत असतो…. आपण किती ऐकून घ्यायचं … म्हणून आपण दोन्ही कानांवर हात ठेऊन कान बंद करतो, आपला संवादाशी संपर्क तुटतो.
पुढचे सगळे रस्तेही बंद असतात, आशेचे दिवे मंद असतात … आपण डोळे उघडे ठेऊन सुद्धा अंधारात चाचपडत असतो …
जे काही आपल्या हाताला लागेल ते आपल्यासाठी योग्य कि अयोग्य ते ठरवत असतो.
अंतर्मनाला साद घालून काय पडसाद उमटतायत … त्याचे अंदाज बांधत असतो.
दूर कुठेतरी दिसत असतात आपल्याला…..  आपल्याच वयाचे, आपलेच सगे-सोयरे ….
जे भाग्यवान ठरलेले असतात…
जे आधीच यशाच्या प्रकाशझोतात आलेलं असतात… 
तो प्रकाश आपल्या डोळ्यांना सहन होत नाही … म्हणून आपण आता डोळेही गच्च मिटून घेतो.
काय करावं कळत नाही … कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही.
तितक्यात एक हात पाठीवर पडतो … ” तुझा मार्ग जरा वेगळा असला तरी तो योग्य आहे.”

बस्स …. आपण तडत उठून १८०च्या कोनात मागे फिरतो …. बंद डोळे खाड्कन उघडतो
पण … आपल्याला तो चेहरा दिसत नाही … कारण आपण अजूनही अंधारातच असतो.
त्या आधाराच्या स्पर्शानं शरीरात ऊर्जेचा प्रवाह वाहू लागतो, आता नक्कीच काहीतरी चांगलं घडेल अशी आशा वाढत राहते. आपण निवडलेला मार्ग योग्य आहे, हि सकारात्मकता पायात त्राण देते, पुढे चालायचं बळ देते.
आता आपण फक्त चालायचं ठरवतो. चार पावलं पुढं गेल्यावर अंधार हळू हळू लोप पावतो.
झपझप चालत पुढे सरसावतो, इतक्यात समोर दिसतं ते प्रचंड वादळ
वायुवेगाने पडणारा पाऊस, गदागदा हलणारी झाडं आणि कानाला दडे बसतील, इतका सोसाट्याचा वारा … त्यात पायाखाली तोच आपला अवघड, अवखळ रस्ता. 
हे असं का होतंय ? सगळं कधी संपणार ? आता पुढे कसं जायचं?  हे मनात प्रश्नांचं एक वेगळंच वादळ सुरु असताना, तोच हात …
हो तोच हात .. पाठीवर पडतो … आता तो नुसता पडत नाही …. तो आपल्याला अक्षरशः पुढे ढकलतो .. पुढच्या प्रवासासाठी
“काहीही होत नाही … संकटाना सामोरं जा … तू सुखरूप इच्छित स्थळी पोहोचशील .”हे शब्द पुन्हा पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात … पुन्हा पुढचा प्रवास उमेदीनं सुरु होतो.
पाऊस अंगावर झेलत, वाऱ्याचे तडाखे सोसत आपण सुस्वरूप बाहेर पडतो.

आता थोडं स्थिर स्थावर होऊ..  म्हणून आपण त्याच रस्त्या शेजारी, एक छोटसं घर बांधतो, संसार थाटतो, उपजीविकेसाठी एक छोटसं दुकान टाकतो,
आपण टाकलेलं दुकान सुरु करण्याचा मुहूर्त ठरतो… नवा दिवस सुरु होतो इतक्यात पहाटे पहाटे आपल दार वाजतं.
पहाटेच्या अंधारात आपण दार उघडतो.  समोर उभी व्यक्ती आपल्याला सामानाची यादी देते … आपण “ग्राहकम सुखाय ” असं म्हणत आपण दुकान उघडायच्या आधीच घरात असलेलं सामान आणून देतो
ती व्यक्ती आपल्याला पैसे देते .. पैसे घेताना आपल्याला त्याच हाताचा स्पर्श जाणवतो … आपण भारावून जातो
हा … हात … हात तोच असतो …
जो सुरुवातीला आधार म्हणून पाठीवर पडतो,
संकटात मार्गदर्शक होतो,
आणि प्रयत्नांना आशिर्वाद देतो.

आता सकाळ झालेली असते, सूर्यही उगवलेला असतो … आपण नजर वर उचलून समोर बघतो.
त्या कोवळ्या सूर्य प्रकाशात आपल्याला आपल्या समोरच्या व्यक्तीचा चेहराही स्पष्ट दिसतो … आणि तो पाहून आपल्या चेहऱ्यावरची आडवी रेघ रुंदावते, आपण मनोमन सुखावतो.
तो पाठीवर पडणारा हात आधारासाठी, प्रोत्साहनासाठी वेळीच धपाट्यांसाठी का असेनात
तो हात तुझा आहे … तो चेहराही तुझाच आहे. तुझं  बोट धरून मी आज खंबीर उभा आहे.
मी आजन्म ऋणी आहे तुझा  … तू केलेल्या मार्गदर्शनाचा
हे सगळे शब्द असले तरीही त्यामागची भावना एकच आहे …  

हे ऋणानुबंध असेच कायम राहावे, आणि पापणी उघडता प्रत्येक क्षणी समोर तू असावे.

तुझे विचार…. तुझी शिकवण….. तुझी प्रेरणा….. तुझा विश्वास आणि त्याही पलीकडे जाऊन तू दिलेलं प्रेम….. या साऱ्याने माझं अवघ आयुष्य समृद्ध झालंय … संपन्न झालंय.
आणि….

आयुष्याला परीस स्पर्श झाला…
प्रयत्नांच्या वावटळीत, शब्द तुझे बरसून गेले
सारे जीवनच माझे बहरून आले
लोखंडासारखे आयुष्य माझे 
तुझ्या परीस स्पर्शाने सोने झाले

कृष्णार्पणमस्तू

]]>
https://shabdbramh.com/2023/05/08/parees/feed/ 10 1030
स्पर्श https://shabdbramh.com/2023/03/08/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6/ https://shabdbramh.com/2023/03/08/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6/#comments Wed, 08 Mar 2023 11:28:17 +0000 https://shabdbramh.com/?p=1026 Continue Reading →]]> का तुझा स्पर्श सुखावतो ? ….. माहित नाही.
तरंग उठतात प्रेमाचे….
तुषार उडतात हर्षाचे …
कुणालाही सांगता येत नाही …. कोणत्याही चौकटीत बांधता येत नाही
सांगितलं तर पटत नाही… हव्यास काही घटत नाही.  
तू आजूबाजूला असण्यानेच … त्या नकळत स्पर्शाने …. वेळ थांबते माझी.
हातातली कामं …  हातात रेंगाळत राहतात …
शरीरावर मनाचा ताबा सुटतो …
मन धावतं …. सुसाट … त्या स्पर्शसुखाकडे …
तुझं ते घुटमळत रहाणं …विचारपूर्वक नसेलही …..
मला आणखीन गुंतवत राहतं … तुझ्यात.
चालताना तू अचानक धरलेला हात …. कुरवाळताना … पायाने चालत … मानाने फुलत … प्रवास संपूच नये असं वाटतं.
आता कालचच बघ ना …..
काल होळी खेळताना, तुझा गालाला लागलेला हात ….  रंग नाही… जीव लाऊन गेला.
मी माझ्या गालाला अजूनही हात लावला ….. तरी ओठांची आडवी रेघ रुंदावते आणि गाल गुलाबी होतोच.
खरंय …. अगदी निर्विवाद
“स्पर्शाची जादूच निराळी.”
ती जागेपणी स्वप्न दाखवते …
खांद्याला गुदगुदल्या होतात … आणि तिथूनच पंख फुटतात…
फुलपाखरू होतं आपलं ….
बागडत राहतं …. एकटच  … भिर भिर भिर भिर ….
मज्जाय नाही ….
आपल्या जिवलगाच्या स्पर्शानं, अंग मोहरलं नाही … तर नवलच.
त्या मिठीत स्वर्ग जाणवला नाही … तर आपल्यासारखे अभागी आपणच.
हा स्पर्श साठवायला हवा…
आणि त्याहीपेक्षा तो जपायला हवा…
ती स्पर्शाची भाषाही शिकायला हवी … जी शब्दांपेक्षाही प्रभावी आहे.
बोलून मोकळं होण्यापेक्षा … गालावर अलवार हात ठेऊन … डोळ्यांत वाचता आलं पाहिजे.
त्या हातावर ओघळणारा थेंब … जास्त पारदर्शक असतो.
जो कोणताही नातं पारदर्शक करण्यासाठी मदतच करत असतो.
बरोबर ना ….
आपल्याला सगळं कळत असतं …..  पण प्रत्येकवेळी  शब्दात गुंफता येत नाही
प्रेमाची भाषा कळते … प्रत्येकाला …. फक्त लिहिता येत नाही.
पण मला एवढं मात्र नक्की कळतंय …
तुझा विचार जरी आला …
तरी आठवतो … तो स्पर्श
जो आहे सहर्ष….

कृष्णार्पणमस्तू

@ अनुप साळगांवकर – दादर

]]>
https://shabdbramh.com/2023/03/08/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6/feed/ 3 1026
निर्मिती https://shabdbramh.com/2023/01/04/bird/ https://shabdbramh.com/2023/01/04/bird/#comments Wed, 04 Jan 2023 10:02:16 +0000 https://shabdbramh.com/?p=1002 Continue Reading →]]> खळ-खळ वाहणाऱ्या नदीच्या किनारी, एका हिरव्यागार रानात, उंचपुरी टुमदार झाडावर, एका चिऊताईने बारीक काटेकुटे, सुके गवत, कापूस, पिसे गोळा करून एक छानसं घर बांधल होतं. नदीचं स्वच्छ पाणी, मोकळी हवा आणि रानातला रानमेवा खाऊन ती आणि तिची दोन पिल्ले त्या घरट्यात खूप आनंदाने राहत होती. दिवसा मागून दिवस सरत होते. पिल्ले हळू हळू मोठ्ठी होत होती. चिऊताई आपल्या पिल्लांना स्वसंरक्षण आणि स्वावलंबनाचे धडे देत होती. आकाशी झेप कशी घ्यायची, आपलं अन्न कसं शोधायचं, हवेचा अंदाज कसा घ्यायचा, आपलं आणि आपल्या सोबत असणाऱ्यांचं रक्षण कसं करायचं याची सगळी प्रात्यक्षिकासहित माहिती देत होती.  ती गोजिरवाणी पिल्लेही आपल्या आईचे अनुकरण करत होती, सगळं शिक्षण उत्सुकतेनं घेत होती.

एक दिवस पहाटे चिऊ आपल्या पिल्लांन सोबत अन्न शोधण्यासाठी घरट्या बाहेर पडली, अन्न-पाण्याची जमवाजमव करेपर्यंत फार उशीर झाला. चिऊ आणि तिची पिल्ले थकून गेली होती. अंधार होण्याआधी घराकडे परतू .. असा विचार करून निघाली.  सायंकाळी घरी परतताना पाहतात तर काय…… त्यांसमोर अचानक सा-या जंगलभर वणवा पसरलेला असतो. प्रत्येक झाड आगीत होरपळलेले असते. चहू बाजूंनी आगीचे नुसते डोंब उसलेले असतात. चिऊताईच्या राहत्या झाडाची आणि घरट्याची राखरांगोळी झालेली असते. पिल्ले हे सारं निसर्गाचं रुद्र रूप पाहून खूप घाबरून जातात, चिऊकडे केविलवाण्या नजरेने पाहू लागतात आणि ‘आता कुठं राहायचं’ या विचाराने चिऊला बिलगून रडू लागतात.

चिऊ आपल्या पिल्लांना पंखाखाली घेते, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवते, त्यांना धीर दिते. आपल्या मुलांना स्वावलंब शिकवण्याची हि खूप छान संधी आहे असा विचार करते आणि काहीही न बोलता पिल्लांनसोबत दुसऱ्या एका जवळपासच्या रानात निघून जाते. तिकडे गेल्यावर पिल्लांसोबत एका उंच, डेरेदार झाडाची आपल्या नवीन घरट्यासाठी निवड करते. रानोरान भटकून काटेकुटे, सुके गवत, कापूस, पिसे शोधण्याचा प्रयत्न करते. चिऊची उमेद बघून, पाठोपाठ पिल्लेही नवे घरटे बनवण्याच्या तयारीला लागतात. सामान गोळा करण्यापासून घरटे वीणेपर्यंत सर्वतोपरी सहकार्य करतात. आणि बघता बघता एक छानसं घरटं आकाराला येतं.  चिऊ आणि तिच्या पिल्लांना स्वतः बांधलेल्या घरट्याचा स्वनिर्मितीचा आनंद होतो, घरट्यात त्यांचा पुन्हा एकदा चिवचिवाट सुरु होतो.

चिऊताईला  घरटे बांधणीच्या कामात आपल्या पिल्लांनी केलेल्या मदतीचे फार कौतुक वाटते. पिल्लांनाही आलेल्या संकटाशी कसा धैर्याने सामना करायचा, ते समजतं.

म्हणूनच दोस्तहो, कितीही कठीण परिस्थिती असेल तरी घाबरून जाऊ नका. परिस्थिती आपल्या हातात नसली, तरी प्रयत्न करणे आपल्या हातात आहे हे कधीही विसरू नका. धैर्यने संकटाचा सामना करा. संकट आपल्याला कमकुवत नाही, तर कणखर व्हायला मदत करतात.

शुभं भवतू ….. कृष्णार्पणमस्तु

©™ श्री. अनुप साळगांवकर- दादर, मुंबई

]]>
https://shabdbramh.com/2023/01/04/bird/feed/ 13 1002
अनुभूती – भाग ५ https://shabdbramh.com/2022/12/08/dev/ https://shabdbramh.com/2022/12/08/dev/#comments Thu, 08 Dec 2022 09:31:48 +0000 https://shabdbramh.com/?p=971 Continue Reading →]]> कवडी न बांधू गांठ को,

माँगनेसे सब जाय,

मेरे पिछे मेरा हरी फिरे,

उसका भक्त न भूखा जाय !

संत कबरीरांची हि अमृतवाणी, काळाने कितीही धुरकट करण्याचा प्रयत्न केला तरीही अजून तितकीच अचूक आणि समर्पक आहे. जीवन प्रवासात हेच दोहे अनुभवायला मिळतात तेव्हा तो सुवर्णकांचन योग.

अध्यात्मिक प्रगती करणं, म्हणजे गुरूने आखून दिलेल्या मार्गावर अविरत चालत रहाणं ….

तुम्ही ज्या देवतेची उपासना कराल, आराधना कराल, साधना कराल … ती देवता आपल्या संपूर्ण शक्तिनिशी तुमच्या पाठीशी अखंड उभी राहते …. तुमच्यावर कृपा करते … तुम्हाला संरक्षण देते. 

साधना मार्गावर याची जाणीवही आपल्याला होते. अनुभव छोटे जरी असले, तरीही त्याचे अर्थ व्यापक असतात, आपल्याला या मार्गावर प्रोत्साहन देणारे आणि समृद्ध करणारेच असतात.

कधी कधी आपली आपल्याला लाज वाटते, ….. देवा …. का रे बाबा इतकं … तुला काय गरज पडलीय … तु का इतक्या छोट्या छोट्या गोष्टी सहज आणि सुकर करतोयस.

त्याने का करावं आपलं आयुष्य सोपं ? आपण असं त्याच्यासाठी इतकं जीव ओतून काय केलंय ?

याच मला समजलेलं कारण असं … की, देव हा भक्तीचा भुकेला आहे. आपल्याला येणारे आणि त्याहूनही आल्यावर समजणारे अनुभव ही, आपली भक्ती त्याच्यापर्यंत पोहोचते आहे, याच प्रतिक आहेत.

त्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी आपण निवडलेला मार्ग सुयोग्य आहे, जो भक्तीतून भगवंताकडे सुखरूप नेणारा आहे.

आपल्या छोट्या छोट्या गोष्टीही सहज आणि निर्विघ्न होणं… आपली अगदी छोटीशी इच्छा पूर्ण होणं, हे संकेत आहेत … त्याच आपल्यावर निरंतर लक्ष आहे.

मला सोमवार पासून म्हणजे …. गेली दोन दिवस बेसनाचे छान लाडू खावेसे वाटत होते. जे श्री. स्वामी समर्थांनाही आवडतात.

घरी सांगून झालं ….

वेळ काढून आपण स्वतः करू …. म्हणून यू-ट्यूबवर चांगले रवाळ लाडू कसे करायचे याचे विडिओ पाहून झालं …. पण वेळच मिळाला नाही

शनिवार – रविवारी बघू…. असा विचार करून मी विषय सोडून दिला. 

बुधवारी श्री. दत्तजयंती होती ….दादरच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात खूप गर्दी असेल म्हणून देवळातही जायचं राहील, आणि घरी माझ्या लहान मुलीला बघायचं होतं, म्हणून संध्याकाळी पालखीलाही जाता आलं नाही.

ऑफिस मधून घरी आलो … फ्रेश झालो … काहीतरी खाऊया म्हणून स्वयंपाक घरात गेलो, इकडे तिकडे पाहिलं, तर … फ्रिजवर बेसनाचे चार लाडू….. मी क्षणात प्रसन्न.

मी सांगितलं होतं  म्हणून बायकोने आणले असतील …..

लगेच एक उचलला .. अर्धा मी आणि अर्धा मुलीने खाल्ला …

समाधान … इच्छापूर्तीचा आनंद

आपल्याला खावीशी वाटणारी ती एक गोष्ट …. जी लगोलग मिळावी म्हणून आपण प्रयत्न करत असतो… ती अशी अचानक मिळाली, की कित्ती छान वाटतं नाई …..

जिभेला हवी असणारी चव तिला मिळाली की ती तृप्त होते. मनाची इच्छा पूर्ण झाली म्हणून ते शांत होते आणि शरीर समाधानाचा आनंद घेते.

आहो…….खरी गंम्मत पुढे आहे …

बायको घरी आल्यावर  तिला विचारले …’लाडू तू विकत आणलेस का ?… माझ्यासाठी ‘

तर ती म्हणाली, श्री. दत्तजयंती निमित्त ती आणि मुलगी श्री. स्वामी समर्थांच्या मठात दर्शनासाठी गेली होती …. फार गर्दीही नव्हती

देवाला फुले वाहिल्यावर गुरुजींनी मुलगी लहान म्हणून तिच्या हातात सहा बेसनाच्या लाडवाचं अक्ख पॅकेटच दिलं.

हे ऐकून …. माझं मलाच भरून आलं … जरा लाजही वाटली.

मला तर साधं दर्शनालाही जाता आलं नाही … तरीही …. देणाऱ्याने तरी किती … आणि काय काय द्यावं ???.

किती काळजी त्याला … मला लाडू खावेसे वाटत होते म्हणून अशी सोय केली त्यानं.

श्री. स्वामी समर्थांनाही बेसनाचे लाडू आवडतात … तेच त्यांनी प्रसाद म्हणून पाठवले.

आपल्या भगवत गीतेत सांगितलंय

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।। गीता ९/२२।।

जो अनन्य भावाने माझे स्मरण करेल, त्याचा प्रपंच मी चालवेन

जर तो आपल्यासाठी इतकं काही करणार आहे, तर आपल्याला त्याच्यासाठी काय करायचंय … हे ठाऊक पाहिजे.

या आलेल्या अनुभवातून मी काय शिकायचं … तर आपल्याला आवडणारी गोष्टही अशी सहज देता आली पाहिजे.

निस्वार्थपणे त्याचं स्मरण करता आलं पाहिजे

त्याच्या ऋणात राहता आलं पाहिजे.

प्रसाद म्हणून मिळालेल्या लाडवाचा गोडवा जिभेवर आणि सात्विकता मनात जपता आली पाहिजे.

शुभं भवतू

कृष्णार्पणमस्तू

© अनुप साळगांवकर – दादर

दिनांक. ०७ डिसेंबर २०२२ ( श्री. दत्तजयंती )

अनुभूती – भाग

अनुभूती – भाग ६

]]>
https://shabdbramh.com/2022/12/08/dev/feed/ 7 971
धूर्त गाढव https://shabdbramh.com/2022/11/03/kids/ https://shabdbramh.com/2022/11/03/kids/#comments Thu, 03 Nov 2022 04:17:40 +0000 https://shabdbramh.com/?p=960 Continue Reading →]]> एका खेडेगावात एक गरीब शेतकरी राहात होता. आपल्या छोटेखानी शेतात तो खूप कष्ट करून भाजीपाला पिकवायचा. रोज पहाटे उठून शेतीची सगळी कामं करून जी काही भाजी तयार होईल त्यातली थोडी कुटूंबासाठी ठेऊन उरलेली सगळी भाजी आठवड्यातून एकदा आठवडी बाजारात नेऊन विकायचा. भाजी विकून जी काही मिळकत येईल त्यावर इतर किरकोळ खर्च चालवायचा.  घर आणि शेत या व्यतिरिक्त त्याला काहीच सुचत नसे. शेतात पिकवलेली भाजी आठवडी बाजारात नेऊन विकण्यासाठी शेतकऱ्याला खूप कष्ट पडत. आपलं काम थोडं सोपं व्हावं म्हणून त्याने थोडे पैसे जमा करून आठवडी बाजारातूनच एक गाढव विकत घेतलं. शेतकरी गाढवाची सर्वतोपरी काळजी घ्यायचा, त्याला वेळेवर अन्न पाणी द्यायचा आणि आठवड्यातून एकदाच पिकवलेली सगळी भाजी गाढवावर लादून बाजाराला जायचा.  गाढव फार धूर्त होतं. त्याला कामाचा प्रचंड तिटकारा होता. नुसतं पडून राहायचं आणि खाऊन पिऊन टम्म झोपी जायचं, असा त्याचा दिनक्रम होता.         

शेतकरी आठवडी बाजारात जात असताना गाढवाच्या पाठीवर दोन्ही बाजूस सामान भाजी लादत असे, जेणे करून गाढवाला चालणे सोईचे होईल आणि भाजी न सांडता सुखरूप बाजारात पोहचेल. चालताना शेतकरी पुढे आणि गाढव मागे चालत असे. वाटेत शेतकऱ्याची नजर चुकवून गाढव  आळी -पाळीने बाजारात जाईपर्यंत दोन्ही बाजूची भाजी थोडी थोडी खात असे जेणेकरून पाठीवरचे वजन कमी होईल. गाढवाच्या या अप्रामाणिकपणामुळे दरवेळी बाजारात भाजी कमी भरत असे आणि शेतकऱ्याला कमी नफा होत असे. तुटपुंज्या मिळकतीत घर चालवणे शेत पिकवणे आणि गाढवाची  देखभाल करणे शेतकऱ्याला कठीण होऊन बसले. घरून वजन करून भरलेली भाजी बाजारात जाईपर्यंत कमी कशी होते याची चिंता शेतकऱ्याला दिवस-रात्र सतावत होती. सगळं विचाराअंती त्याला एक युक्ती  सुचली.      

एकदा बाजारात जाताना शेतकऱ्याने गाढवाच्या एका बाजूला भाजीचे गाठोडे आणि दुसऱ्या बाजूला तेवढ्याच वजनाचा पाण्याने भरलेला घडा बांधला. नेहमीप्रमाणे शेतकरी पुढे आणि गाढव मागे चालत होते. वाटेतून चालताना गाढवाने धूर्तपणे एका बाजूची भाजी खायला सुरुवात केली खरी पण त्याला दुसऱ्या बाजूला बांधलेल्या घड्यातले पाणी काही पिता येईना. जसजसे भाजीचे गाठोडे कमी होत गेले आणि घड्यातल्या पाण्याच्या वजनाने घडा एकाएकी जमिनीवर पडून फुटला. फुटलेला घडा पाहून शेतकऱ्याला गाढवाचा धुर्तपणा समजला. शेतकऱ्याने तसाच त्या गाढवाला आठवडी बाजारात नेऊन चढ्या किमतीत विकून टाकले. मिळालेल्या नफ्यातून शेतकऱ्याने स्वतःसाठी, बाजारात भाजी नेण्यासाठी, मुलांना शाळेत सोडण्यासाठी एक सायकल घेतली. एका सायकलीमुळे शेतकऱ्याचे सगळे काम सोपे झाले. इकडे मात्र गाढवाच्या नव्या मालकाने गाढवावर प्रमाणापेक्षा जास्त ओझी लादायला सुरुवात केली. ओझी वाहता- वाहता गाढवाची पाठ मोडून निघाली आणि त्याला आपली चूक समजली.     

म्हणूनच मित्रहो, आपले काम प्रामाणिकपणे करा. थोडा वेळ लागला तरीही चालेल, पण काम अचूक पूर्ण करा. आपण केलेल्या चांगल्या कामाचा आपल्याला आणि इतरांनाही फायदाच होत असतो.     

शुभं भवतू ….. कृष्णार्पणमस्तु    

©™ श्री. अनुप साळगांवकर- दादर, मुंबई

]]>
https://shabdbramh.com/2022/11/03/kids/feed/ 3 960
मानवतेचं झाड https://shabdbramh.com/2022/09/20/lovetree/ https://shabdbramh.com/2022/09/20/lovetree/#comments Tue, 20 Sep 2022 09:05:18 +0000 https://shabdbramh.wordpress.com/?p=570 Continue Reading →]]> उन्हाळ्यची सुट्टी संपून नुकतीच आराधनाची शाळा चालू झाली होती. वडिलांची नोकरी फिरतीची असल्यामुळे सतत दोन-तीन वर्षांनी तिची शाळा बदलायची. नवी जागा, नवे घर, नवीन शाळा , नवे वर्ग, नव्या बाई, मित्र-मैत्रिणी सुद्धा नवे, सगळेच नवे चेहरे पाहून ती नेहमीच गोंधळून जायची. लहानपणापासूनच तशी ती फार हुशार आणि चाणाक्ष होती, पण सततच्या या बदलामुळे स्वभावाने थोडी मितभाषी आणि बुजरी झाली होती. इतक्या लवकर नव्या शाळेत कुणी जिवलग मैत्रिणी नाहीत, घरी आलेल्या कुणा नातेवाईकांशी बोलणे नाही की, आपलेपणाने कुणा मित्रांकडे खेळायला ही जाणे नाही. ती, तिची आई आणि वडील आणि शाळा एवढंच तीच विश्व, त्यामुळे तिच्या आईला तिची खूप काळजी वाटायची. आईने एकदा हि काळजी शाळेतल्या बाईंना बोलून दाखवली. बाई खूपच समजूतदार होत्या, मुलांची मने ओळखण्यात तरबेज होत्या. त्यांनी आईला थोडा वेळ द्या, सगळं सुरळीत होईल, असं आश्वासन दिलं.
बाईंना आराधनाची अडचण चांगलीच समजली होती त्यामुळे त्या तिच्या कडे अधिक लक्ष देत होत्या. नव्या शाळेत शिकता शिकता त्या शाळेच्या बाई तिला फार आवडू लागल्या.

बाईंची शिकवणी आराधना लक्षपूर्वक ऐकत असे, आत्मसाद करत असे. बाईंच्या सांगण्यावरून सगळ्या क्रीडा आणि कला स्पर्धेत सहभागी होत असे. असाच एकदा शाळेत आषाढी एकादशी निमित्त वृक्ष रोपणाचा कार्यक्रम होता. सगळ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात एक छानसं  झाड लावण्याची संधी मिळणार होती
आराधना निसर्गदत्त असल्यामुळे तिला झाडे, वेली, रंगीबेरंगी फुले याच फार आकर्षण होत. घरातल्या वडिलांनी फुलवलेल्या छोटेखानी बागेत तासन-तास त्या फुलं पानांत रमायची, फुललेल्या लहान मोठ्या फुलांकडे बघून आनंदून जायची, स्वतःहून एखाद्या नवीन फुलाबद्दल आईकडून माहिती मिळवायची, एकूणच निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यायची.
वृक्षारोपणाच्या दिवशी तिच्या हातात  बाईंने पानफुटीचं झाड दिलं, जे तिने या पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. ते झाड पाहून तिला खूप आनंद झाला. किती वेगळं आणि नावीन्य पूर्ण झाड होत ते. त्या झाडाबद्दल अधिक माहिती मिळवण्याच्या उत्कंठेने तिने बाईंना अनेक प्रश्न विचारले बाईंनेहि साऱ्या प्रश्नांची तिला उत्तरे दिली आणि म्हणाल्या, “पानफुटीचं झाड हे वेगळं आहे … याला खोड नसतं … पानाला पानं येतात आणि हे झाड वाढत… जितकं वेगळं तितकंच औषधी ….. आयुर्वेदात याचा उपयोग होतो. आणि बरं का आराधना … प्रत्येक झाड, त्या झाडाचं प्रत्येक पान हे वेगळं आहे.  प्रत्येकाला आपला आकार आहे, रंग आहे, गंध आहे. आता या पानफुटीच्या झाडाचं पान एकमेकाला लागून उगवतं, परस्परांना आधार देतं. आपल्या वर्गातल्या मित्र मैत्रिणींच, आजूबाजूच्या लोकांचंही असंच असतं प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येकाला आपला स्वभाव आहे. आपण सगळ्याशी मैत्री केली पाहिजे, सगळ्यांना आपलसं करून घेतलं पाहिजे. “
आराधनाच्या मनावर बाईंच्या शब्दांची अशी काही जादू झाली, लवकरच तिने वर्ष संपायच्या आत सगळ्यांची मैत्री केली आणि जेव्हा तिने वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला तेव्हा तीच कौतुक करायलाही सगळ्या वर्गाने टाळ्यांच्या गजरात तीच अभिनंदन केलं.
म्हणूनच मित्रहो सगळ्यांशी मैत्री करा, प्रेमाने वागा, आदराने बोला, सगळ्यांना आपलसं करा आणि आयुष्य सोपं करा.

पानफुटी
]]>
https://shabdbramh.com/2022/09/20/lovetree/feed/ 1 570
Karthikeya 2 – Movie Review (मराठी ) https://shabdbramh.com/2022/08/22/karthikeya2/ https://shabdbramh.com/2022/08/22/karthikeya2/#comments Mon, 22 Aug 2022 09:01:43 +0000 https://shabdbramh.com/?p=937 Continue Reading →]]> धर्मो रक्षति रक्षितः
धर्माचं रक्षण करणाऱ्याचं रक्षण धर्म करतो.

ग्रीसच्या एका वाचनालयात पुस्तकातून प्रो. रघुनाथ राव, जे पुरातत्व विभागात संशोधक आहेत, ते भगवान श्री कृष्णाच्या रत्नजडित, सोन्याच्या कृष्णवळ्याच्या शोधात काही संदर्भ चोरतात आणि भारतात परतात.
द्वारकेच्या एका अरण्यात श्री कृष्ण एका उंच अशा झाडावर बासरी वाजवत आहे.
बासरीच्या प्रत्येक सुरांत न्हाऊन निघणारी सृष्टी, नवचैतन्यात आकंठ बूडाली असताना, पारधी एका पक्षाचा वेध घेतो, पक्षी हूलकावणी देतो आणि तोच बाण कृष्णाच्या उजव्या पायाच्या अंगठ्याचा वेध घेतो.
श्री कृष्णाच्या मानव अवताराची सांगता होते आणि तक्षणी समुद्रात स्थित व्दारकेचा पाण्यात लय होतो.

भागवत पुराणानुसार ५,००० वर्षांपूर्वी श्री विष्णूंच्या आठव्या, श्री कृष्ण या अवताराची समाप्ती आणि द्वारका समुद्राधीन होणं या गोष्टीने चित्रपटाची सुरुवात होते.

हा अवतार संपणार आणि द्वारका बुडणार हे विधिलिखित ठरलेलं असलं तरीही येणाऱ्या कलियुगात मोठ्या महामारी पासून लोकांचं रक्षण करण्यासाठी श्री कृष्ण, उद्धवाला (कृष्णसखा) ज्ञानाचा उपदेश करतात आणि पायातलं एक कृष्णवळ जपून ठेवण्याची सूचना करतात.

उद्धवने जपून ठेवण्यासाठी, लपवून ठेवलेलं ते कृष्णवळे, त्या शोधण्यासाठी पुरातन काळापासून चांगल्या आणि वाईट शक्तींचा आणि व्यक्तींचा शोध, हा या चित्रपटाचा मुख्य विषय आहे.

सुरुवातीपासून शोधकथा कुठेही रेंगाळत नाही, कंटाळवाणी वाटत नाही. कृष्ण आणि त्याचं रत्नजडित  कृष्णवळ्याच्या शोधात पुढे जात राहते, याचं एकमेव कारणच “कृष्ण ” आहे. सर्वार्थाने पूर्णावतार असणारा कृष्ण हा शक्ती, बुद्धी आणि युक्ती यांचा त्रिवेणी संगम आहे. 

एका रहस्याने सुरु झालेला हा चित्रपट, अगदी शेवट पर्यंत ती उत्कंठा वाढवत रहातो, ती उत्कंठा टिकून ठेवणं हे दिग्दर्शकाचं यश आहे.
दिग्दर्शक हेच चित्रपटाचे लेखक सुद्धा असल्याने, आपल्याला नक्की काय पोहोचवायचं आहे, हे त्यांना बरोबर माहित आहे. चित्रपटाची मांडणी खूपच रंजक आहे. नायकासोबत आपलाही रहस्यमयी प्रवास सुरु होत. प्रेक्षक खुर्चीशी बांधला जातो, आपल्याकडे सतत पिनपॉईंट करणारा मोबाईल आहे याचाही विसर पडतो.   

पुराणकथा आणि इतिहास यातला फरक अगदी मुद्देसूद मांडला आहे. भारतीय पुराणकथा या फक्त दंतकथा नाहीत तर त्या बद्दल संशोधन होऊन अनेक पुरावेही सापडले आहेत.

भारतीय पुराणकथा ह्या सत्य कथा आहेत. त्यातूनच पूर्णावतार असलेल्या प्रेमाचा संदेश देणाऱ्या श्री कृष्णाच्या अवताराची गोष्ट सिद्ध होते.

चित्रपटाची सगळ्यात महत्वाची आणि जमेची बाजू ही, कृष्ण कथा आहे. कथेसाठी दृष्य वापरण्यात आलेलं ऍनिमेशन अफलातून आहे.

कल्पनाशक्तीचा पुरेपूर वापर करून Visualize Effect तर्कशुद्ध वापरले आहेत त्यामुळे आपण पडद्यावर कार्टून बघत आहोत असं अजिबात वाटत नाही. द्वापारयुग चित्रातून जिवंत होतं आणि आपण कृष्णाशी समरस होतो.

चलचित्रनिर्माण कला ( Cinematography) अतिशय उत्तम आहे. वर्तमानातून भूतकाळात जाताना वापरण्यात येणारी रंगसंगती, चित्रकथा, पार्श्वसंगीत आपल्याला या दोन्ही काळाशी समांतर ठेवतात.

सेट छोटे असले तरीही खूप विचार करून, अत्यंत प्रभावी बनवले आहेत. “तमसो मा ज्योतिर्गमय” अंधार आणि प्रकाशाचा वापर प्रभावी केला आहे. एक -एक फ्रेम अगदी कथानुरूप गोष्टीसाठी पूरक वापरण्यात आली आहे.

चित्रपटाचं संगीत  Kaala Bhairava (Music Director) यांनी  खूपच सुंदर दिलंय. एका रहस्याच्या शोधात, जो काही प्रवास होतो संगीत त्या प्रवासाचा अजिबात कंटाळा येऊ देत नाही.

चित्रपटाची गाणीही अगदी मोजकीच म्हणजे दोन आहेत. ती अगदी बॅकग्राऊंडला वाजत राहतात. प्रवासाचा आनंद द्विगुणित करतात.

नायक आणि नायिका एकही आयटम सॉंग करत नाहीत, उगाच एकमेकांना मिठ्या मारत नाहीत, प्रेमाचे नको ते चाळे करत नाहीत. त्यामुळेच चित्रपट कथेला कुठेही Speed Break लागत नाही. 

सगळ्यात महत्वाचा मुद्द्दा चित्रपटाचं बजेट फक्त २५-३० करोड एवढंच आहे. आजच्या बॉलीवूड चित्रपटांचं बजेट हे १००-३०० करोड पर्यंत पोहोचलेलं असताना, इतक्या कमी बजेटमध्ये उत्कृष्ट चित्रपट बनवता येतो हे Chandoo Mondeti (दिग्दर्शक) आणि Abhishek Agarwal Arts People Media Factory ( Production ) यांनी पटवून दिल आहे.

कृष्णवळ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा सोपा नाही. सुगावा लागण्यासाठी सुरुवाती पासूनच काही छोटे शोध लागत जातात आणि आता पुढे काय? याची उत्कंठा वाढवत राहतात.

नायक ( Nikhil Siddhartha ) हा अतिशय उत्सुक स्वभावाचा आहे. दिसणाऱ्या परिणामांची कारणं आहेत आणि ती शोधून काढली पाहिजेत, यावर त्याचा  विश्वास आहे. सुरुवातीला दिसणाऱ्या प्रो. राव यांची नात ( Anupama Parameswaran) ही या प्रवासात नायकाला प्रामाणिक मदत करते. द्वारकेपासून सुरु झालेला हा प्रवास पुढे कृष्ण जन्मभूमी मथुरा, कृष्ण तपोभूमी चंद्रशिला असा करत कैलासा पर्यंत पोहोचतो. प्रवासाचा नकाशा दाखवण्यासाठी सप्तर्षी ताऱ्यांचा करण्यात आलेला उपयोग वाखडण्याजोगा आहे.  कृष्णाशी निगडित स्थळं गोवर्धन पर्वत, कृष्ण तलाव, बेट द्वारका,  भौगोलिक गोष्टी यांचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे.  मंत्रशक्ती, हृदयाची गती आणि श्वास यांचा मनशक्तीसाठी  वापर आपण किती चांगल्या प्रकारे करू शकतो यावर विश्वास ठेवायला हा चित्रपट भाग पाडतो.

चित्रपटात अभिरा नावाची एक हिंसक जमात दाखवण्यात आली आहे. कृष्णाची संबंधित कोणत्याही वस्तुधारकाला ती जमात जीवे मारते. हिंसक असूनसुद्धा त्यांचंही कृष्णावर निरतिशय प्रेम आहे. माणूस चांगला-वाईट कसाही असो, तो कृष्ण आणि त्याने दिलेलं उपदेश यांच्या अजूनही प्रेमात आहे, हे दाखवण्यासाठी या जमातीचा केलेला वापर अधोरेखित झाला आहे.

“सत्कर्म करणाऱ्यालाच निसर्ग सहकार्य करतो.” “चमत्कार आहेत म्हणून देव आहे असं नाही, देव आहे म्हणून चमत्कार आहेत.”  “देव ही कुणी शक्ती नाही ती व्यक्ती आहे.” “आपण कुणाची निवड करत नाही, प्रकृती आपली निवड करते.” असे देव किंवा निसर्गशक्ती यांचे समर्थन करणारे मोजकेच पण लक्षात राहणारे संवाद आहेत.

रत्नजडित सोन्याच्या  कृष्णवळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन सुगावे (Clue) आहेत. पहिल्या सुगाव्यासाठी नंदीबैलाचा करण्यात आलेला वापर अंगावर शहारे आणतो. त्यापुढे जाऊन दुसऱ्या सुगाव्यासाठी करण्यात आलेला प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेचा आणि सूर्य ऊर्जेचा वापर आपल्याला विज्ञानाशी बांधून ठेवतो. दोन्ही सुगाव्यांच्या शोधात ज्ञान, अध्यात्म आणि विज्ञान यांची सुरेख सांगड घातलेली दिसते.

चित्रपटाला एक महत्वाचा सीन  Dr. Dhanvanthri Vedpathak ( Anupam Kher) नायकाला मार्गदर्शन करतात. डॉ. धन्वंतरी नायकाला समजावून सांगतात कि, देवाचा अंश जरी असला तरीही कृष्ण ही मानवी देह धारण केलेली या ग्रहावर जन्मलेली आणि वाढलेली व्यक्ती आहे, ज्याने जन्मतः विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली. धर्माला अनुसरून आयुष्य किती सुंदर पद्धतीने जगता येऊ शकतं हे एका आंधळ्या शास्त्रज्ञाने दृष्टी देण्याचं केलेलं काम अनुपम खेर यांनी खूपच कमी वेळात उत्कृष्ट केलं आहे. पूर्णावतार असणाऱ्या श्री कृष्णाला देव म्हणून न पाहता माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून बघा हा संदेश देताना खेर यांच्या तोंडी जे काही संवाद आहेत ते संवाद आपल्याला कृष्णाच्या आणखीन जवळ घेऊन जातात आणि प्रत्येक संवादाबरोबर कृष्ण चित्रांची उघडणारी फ्रेम बघणं हे दिव्य दृष्टी मिळाल्यासारखंच आहे.

प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका अगदी चोख केली आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा इकडे नमूद करावासा वाटतो, तो  म्हणजे हिंदू कथेसाठी करण्यात आलेला एका मुसलमान पत्राचा प्रवेश. कोणत्याची वादात, किंवा धर्मबंधनात न अडकता एख्याद्या पात्राला पुरेपूर न्याय देऊन ते पात्र जिवंत करून, प्रेक्षकांच्या पसंतीस आणण हे शिवधनुष्य लेखक आणि लेखक असणाऱ्या दिग्दर्शकाने लीलया पेललं आहे.

चित्रपटाच्या शेवटी श्री कृष्णाचं अस्थित्व आणि देवत्व  फक्त अरबी समुद्रापर्यंत मर्यादित नसून ते अटलांटिक महासागर आणि इतरही देशांमध्ये पोहोचलं आहे हे दाखवण्यासाठी नायकाला विदेशात एक चावी सापडते आणि रहस्याने बंद असलेला एक दरवाजा दूर कुठेतरी समुद्रात आहे असं दिसतं . … म्हणजे या चित्रपटाचा पुढील भागही अपेक्षित आहे.

कृष्णवळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुरु झालेला हा प्रवास सफळ होतो कि नाही ? त्यासाठी नायकाला अजून किती संघर्ष करावा लागतो ? बुद्धी आणि उत्सुकता माणसाला कशा घडवतात ? कृष्णकथा ह्या पुराणकथा आहेत कि इतिहास ? पाण्याखाली बुडालेल्या द्वारकेत अजून किती रहस्य बुडीत आहेत ?

या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधायला “कार्तिकेया २” ( IMDb Rating 8.9/10) हा तेलगू भाषेत प्रदर्शित  (हिंदी अनुवादित) चित्रपट एकदा पाहायलाच हवा. 

शुभं भवतू …
कल्याणमस्तू
श्री. अनुप साळगांवकर

Director: Chandoo Mondeti

Distributed by: Zee Studios

Cinematography: Karthik Gattamneni

Language: Telugu, HINDI

Music director: Kala Bhairava

]]>
https://shabdbramh.com/2022/08/22/karthikeya2/feed/ 1 937