शब्द ब्रम्ह आहेत. हे विश्वच ध्वनिनिर्मित शब्दांच आहे. जिथे शब्द संवाद साधतात, शब्द हास्य खुलवतात, शब्द गालावर ओघळतात, शब्द व्यक्त होतात, शब्द ठाव घेतात, शब्द चित्र रंगवतात, शब्द निःशब्द होतात. श्री. अनुप साळगांवकर यांचा ब्लॉग

Tag अनुभव

कृष्णाला विठ्ठल भेटला….

“आबा, आव यंदा इठ्ठलाला भेटाया जायचं कि नाय ….???” छोट्या कृष्णाने प्रश्न विचारला.शेतीच्या कामात एकाएकी कृष्णाचा प्रश्न ऐकून आबाचा चेहराच मावळला, कामाची रयाच गेली ….“बगू…” म्हणत कृष्णाकडे पाठ फिरवून आबा वितभर पाण्यात भात लावू लागला.डोक्यात तेच मागल्या संचारबंदिचे विचार. मागल्या… Continue Reading →

मनोमनी – भाग १

अद्वैत – नातं देव आणि मानवाचं

सुरुवातीला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक खूप जुनी आख्यायिका आहे. देवानेच निर्माण केलेला मानव जेव्हा स्वतःला सर्वश्रेष्ठ मानू लागला तेव्हा, हे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी मानवच देवांशी कडाक्याचं भांडण झालं. आपल्या सामान्य बुद्धीप्रमाणे देव हेच सर्वश्रेष्ठ. पण, या अहंकारी मानवाने आपल्या… Continue Reading →

अनुभूती – भाग २

दि. २८ सप्टेंबर २०२० आजचाच एक प्रसंग सांगतो. गेल्याच वर्षी माझी पहीलीवहीली श्री गिरिनार वारी झाली. मनाला अत्यंतिक, आत्मिक समाधान लाभलं. त्या यात्रेनंतर निर्माण झालेली ती त्या पवित्र स्थानाबद्दलची प्रचंड ओढ. मार्च पासून सुरू झालेल्या या लाॕकडाऊनमुळे यंदाचा या आध्यात्मिक… Continue Reading →

जय गिरिनारी – पुष्प ८

जय गिरिनारी – पुष्प ७ देवाप्रती श्रद्धा आहे, म्हणूनच जीवनात सौख्य, समृद्धी आणि शांतता आहे. ही शांतताच आपल्याला आपल्या इष्ट देवतेशी बांधून ठेवते. एक अनामिक नाद सतत ऐकू येतो, मन ईश्वरी उर्जेत एकसंग होते. प्रत्येक श्वास हा नामस्मरणात न्हाऊन निघतो………. Continue Reading →

जय गिरिनारी – पुष्प ७

जय गिरिनारी – पुष्प ६ परतीच्या प्रवासाची पावलं थोडी जड होतात. गुरुचरण सोडून कुठे जाऊच नये असंच वाटत राहतं. परतीच्या वाटेवर तो जन्मापासूनचा आपला प्रपंचाचा खेळ सतत आठवतो, मायेचा वारा कानात शिरु पाहतो….. म्हणूनच …..कदाचित् …… पावलं जड होत राहतात…..श्री… Continue Reading →

जय गिरिनारी – पुष्प ६

जय गिरिनारी – पुष्प ५ गुरुचरणांची ओढ लागली की, सगळं सगळं मागे पडतं….पंचेंद्रीय एकमुखी होतात…..आपण आपले रहातच नाही……त्या गुरु तत्वात लोप पावतो……पावलं झपझप चालत राहतात……अखंड…….आम्ही गुरु शिखर मंदिराजवळ पोहचलो. थोडीशी रांग होती. आम्ही पायातले चप्पल, बुट काढून रांगेत लागलो. रांग… Continue Reading →

जय गिरिनारी – पुष्प ५

जय गिरिनारी – पुष्प ४ अंबा मातेच्या मंदिराशेजारीच गुरु गोरक्षनाथ शिखराकडेजाण्यासाठी रस्ता आहे. पायऱ्यांपाशी कमरेएवढा कडा आहे. मी माझे सहप्रवासी येईपर्यंत चढून त्या कड्यावर जाऊन बसलो. खाली पाहीलं तर खोल, अंधारी दरी. थोडा टेकून बसलो…… एकाएकी डोळे बंदच झाले……सहप्रवाशाने उठवले…….. Continue Reading →

जय गिरिनारी – पुष्प ४

जय गिरिनारी – पुष्प ३ गिरिनार पर्वताच्या पायऱ्या चढणं हे शारीरिक कष्टाचं जरी असलं तरी ते कष्ट या यात्रेत फार जाणवत नाहीत, करण मनाच्या पायरीने एक वेगळाच ऊच्चांक गाठलेला असतो. आपल्या मनाने जो श्री. दत्त दर्शनाचा संकल्प केला आहे, तो… Continue Reading →

जय गिरिनारी – पुष्प ३

जय गिरिनारी – पुष्प २एकदा गुरुतत्वाची ओढ लागली की त्या तत्वापर्यंत पोहोचण्याचं बळ आपोआप मिळतं. मन प्रार्थनेत उतरतं आणि एकचं मागणं मागतं, “पंखात या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे..!!!”  हा ध्यासच… Continue Reading →

« Older posts Newer posts »

© 2024 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑