शब्द ब्रम्ह आहेत. हे विश्वच ध्वनिनिर्मित शब्दांच आहे. जिथे शब्द संवाद साधतात, शब्द हास्य खुलवतात, शब्द गालावर ओघळतात, शब्द व्यक्त होतात, शब्द ठाव घेतात, शब्द चित्र रंगवतात, शब्द निःशब्द होतात. श्री. अनुप साळगांवकर यांचा ब्लॉग

Author anup

जय गिरिनारी – पुष्प ६

जय गिरिनारी – पुष्प ५ गुरुचरणांची ओढ लागली की, सगळं सगळं मागे पडतं….पंचेंद्रीय एकमुखी होतात…..आपण आपले रहातच नाही……त्या गुरु तत्वात लोप पावतो……पावलं झपझप चालत राहतात……अखंड…….आम्ही गुरु शिखर मंदिराजवळ पोहचलो. थोडीशी रांग होती. आम्ही पायातले चप्पल, बुट काढून रांगेत लागलो. रांग… Continue Reading →

सुखाची झोप

एका घनदाट जंगलात, टुमदार मोठ्या झाडावर खारूताई आणि पोपटराव दोघे राहत होते. दोघे एकमेकांचे खूप छान मित्रही होते. दोघांचीही घरे छान मोठ्ठाली होती. खारूताई जमिनीवरून उचललेल्या डहाळया, पाने, कापूस आणि इतर मउ वस्तूंनी बनवलेल्या घरट्यात राहायची. पोपटरावांची एक मस्त ढोली… Continue Reading →

जय गिरिनारी – पुष्प ५

जय गिरिनारी – पुष्प ४ अंबा मातेच्या मंदिराशेजारीच गुरु गोरक्षनाथ शिखराकडेजाण्यासाठी रस्ता आहे. पायऱ्यांपाशी कमरेएवढा कडा आहे. मी माझे सहप्रवासी येईपर्यंत चढून त्या कड्यावर जाऊन बसलो. खाली पाहीलं तर खोल, अंधारी दरी. थोडा टेकून बसलो…… एकाएकी डोळे बंदच झाले……सहप्रवाशाने उठवले…….. Continue Reading →

जय गिरिनारी – पुष्प ४

जय गिरिनारी – पुष्प ३ गिरिनार पर्वताच्या पायऱ्या चढणं हे शारीरिक कष्टाचं जरी असलं तरी ते कष्ट या यात्रेत फार जाणवत नाहीत, करण मनाच्या पायरीने एक वेगळाच ऊच्चांक गाठलेला असतो. आपल्या मनाने जो श्री. दत्त दर्शनाचा संकल्प केला आहे, तो… Continue Reading →

जय गिरिनारी – पुष्प ३

जय गिरिनारी – पुष्प २एकदा गुरुतत्वाची ओढ लागली की त्या तत्वापर्यंत पोहोचण्याचं बळ आपोआप मिळतं. मन प्रार्थनेत उतरतं आणि एकचं मागणं मागतं, “पंखात या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे..!!!”  हा ध्यासच… Continue Reading →

जय गिरिनारी – पुष्प २

जय गिरिनारी – पुष्प १ आपल्याला एखाद्या गोष्टीचे वेध लागले की, आपण आपल्या मनातल्या मनात अगदी आदी पासून अंता पर्यंत सगळंच ठरवून मोकळे होतो. हे असं होईल……..ते तसं होईल…… पण ते सगळं तसंच होईल की नाही…….हे ठरवणारे आपण पामर कोण?………. Continue Reading →

मोतीमाळ – कविता

उमलत्या नव्या क्षणांनाआहे आधार भावनेचाबांधलीही मोतीमाळजी सांधणारा हात तुझा एक मोती लाख सुखाचाएक अतीव दुःखाचाधागा जोडू पाहतोएक बंध प्रेमळ मनाचा सगळे तुझ्याच आवडीचे मोतीकसे एकसंग नांदत राहतीतुझ्या स्पर्शाच्या रंगातदुधाळी शुभ्र रंगून जाती स्वतंत्र आहे प्रत्येक मोतीआपुलकी ही जपू पाहतीहेवे-दावे, रुसवे… Continue Reading →

जय गिरिनारी – पुष्प १

” विश्वास ” हा आंतरमनाचा पाय आहे. शब्द जितका सोपा आहे, अनुभव घ्यायला तितकाच कठीण. याच विश्वासावर आपण अशक्यही शक्य करू शकतो. आजकाल देवावरचा आणि स्वतःवरचा विश्वास कुठेतरी कमी होत चालला आहे, असे जाणवते. देव हा दगडात नसून ती एक… Continue Reading →

भेट तुझी-माझी – कविता

भेट तुझी माझीकारण नसतानाच घडलेली ….माझ्याशी बोलतानातू मात्र आवघडलेली ….त्यानंतर ……….ते रोजचंच तुझं दिसणंआवडलं होतं मलाते तू सोबत असणं ….भेटीच्या गाठी पडाव्यातअसं राहून राहून वाटतं होतं ….क्षण क्षण जपतांआठवणींच तळं साठतं होतं ….जन्म बांधता आला नाहीमन माझं बांधलं गेलं ….का… Continue Reading →

मल्लमा – गूढ कथा – भाग २

मल्लमा- गूढ कथा – भाग १ कोसळणा-या धबधब्याचा आवाज कानाला दडे बसवणारा होता. गुहेतला अंधूक प्रकाश शरण्यला आत गुहेत आकर्षित करत होता. त्या प्रकाशाकडे पाहून गुहेबद्दल वेगळंच कुतूहल त्याच्या मनात निर्माण झालं. त्या प्रकाशाचाच मागोवा घेण्याची दुर्दम्य इच्छा त्याच्या मनात… Continue Reading →

« Older posts Newer posts »

© 2024 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑