शब्द ब्रम्ह आहेत. हे विश्वच ध्वनिनिर्मित शब्दांच आहे. जिथे शब्द संवाद साधतात, शब्द हास्य खुलवतात, शब्द गालावर ओघळतात, शब्द व्यक्त होतात, शब्द ठाव घेतात, शब्द चित्र रंगवतात, शब्द निःशब्द होतात. श्री. अनुप साळगांवकर यांचा ब्लॉग

Author anup

चारोळी – भाग २

अनुभूती – भाग ३

मत्सखा रामचन्द्रः          सध्यातरी रामाने मनात घर केलय…..  का कुणास ठाऊक…. पण राम फार आवडायला लागलाय …. अगदी मनापासून …. भौतिक जगात काही गोष्टीही घडतायत … मला आपसूक रामाशी जोडतायत …. अवती भोवती सगळ्याच अगदी पोषक घटना. म्हणूनच तर त्यांना… Continue Reading →

चारोळी – भाग १

निसर्ग नियम

गोष्ट जुनी असली तरी विचार आजही झालाच पाहिजे. आपल्या चूका मान्य करुन त्या सुधारण्याचा प्रयत्न आपण नेहमीच केला पाहीजे. यातच संपूर्ण सजीवसृष्टीचं भलं आहे. प्राणी आणि पक्षी यांच्या पाठीवर निसर्गाने पृथ्वीवर कल्पक “मनुष्यप्राणी” जन्माला घातला. सगळ्या सजीवांत अत्यंत हुशार आणि… Continue Reading →

दोन कळ्या

एका तळ्याकाठी एक सुंदर बगीचा होता. विवधरंगी फुलांनी बहरलेल्या या बगीच्यात माळीकाकांनी एक नवीनच गुलाबाचं छोटुसं रोपटं लावलं होतं.  माळीकाका संपूर्ण बगीच्याची खूप काळजी घेत, झाडांना वेळेवर पाणी देत, जमिनीची छान मशागत करत, विशेषतः या नवीन गुलाबाच्या रोपट्याची. दिवसागणिक गुलाबाच्या… Continue Reading →

पिंपळ – गूढ कथा – भाग २

पिंपळ – गूढ कथा – भाग १ आज दिवसभरात अधीरचा सूर काही लागत नव्हता. त्याच्या अस्वस्थ मनाची प्रचंड चिडचिड होत होती. आजीने जे काही सांगितले त्याचा आणि “मला वाचवं” या विनवणीचा काहीच संबंध लागत नव्हता. “घरातून बाहेर पडायचं नाही,” असं… Continue Reading →

पिंपळ – गूढ कथा – भाग १

घाटाच्या शंभर-दिडशे पायऱ्या उतरून अधीर चर्णावतीच्या पाण्यात पाय बुडवून बसला. मुंबईहून नुकताच प्रवास करून आल्यामुळे थोडा थकला होता. गावात जाताना वाटेवरच्या नदीच्या घाटाच्या सौंदर्याने त्याला मोहीत केलं होतं. पाण्यात पाय घातल्यावर पायाला जाणवणारा थंडगार पाण्याचा स्पर्श त्याला सुखावत होता. पायाच्या… Continue Reading →

शर्यत मैत्रीची…!!!!

एक घनदाट जंगल होत वृक्ष-वेलींनी वेढलेलं, पाना-फुलांनी बहरलेलं. निसर्गाच्या अप्रतिम सौदर्याने सजलेलं. अनेक पक्षी प्राणी या जंगलात आपलं घर बांधून राहत होते. अशा जंगलात राहत होता एक शुभ्र ससा. साश्याशेजारीच नवीन घर थाटलं होत, ते एका कासवानी. ससा होता गोब-या… Continue Reading →

कष्टाचे बळ , मिळते फळ

एक आटपाट नगर होते. त्या नगराचे नाव स्वप्ननगरी. या स्वप्नगरीवर राज्य करीत होता, राजा स्वप्निल आणि त्या राजाची लाडकी राजकन्या होती तिचे नाव स्वप्नाली. या नगरात अनेक स्वप्न वास्तव्याला होती. काही शूर, काही शांत, काही हसरी, काही रडवी, काही चांगली,… Continue Reading →

उडे परी …. अधांतरी

फार जुनी गोष्ट आहे. खूप खूप वर्षांपूर्वी जेव्हा जगाची उत्पत्तीच झाली नव्हती.जेव्हा पृथ्वीवर कोणत्याच प्राण्याचं अस्थित्व नव्हतं.मानवाने तर या जगात पाऊलंच रोवलं नव्हतं, तेव्हाची हि गोष्ट.तेव्हा सगळ्या सुंदर पऱ्या पृथ्वीवर रहायच्या. पृथ्वीच्या निसर्ग सौंदयाने भारावलेल्या त्या दिवसभर इकडे – तिकडे… Continue Reading →

« Older posts Newer posts »

© 2024 शब्द ब्रम्ह — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑